स्प्रिंग टेंपल बुद्ध
स्प्रिंग टेंपल बुद्ध (चीनी: 中國武術 / इंग्रजी : Spring Temple Buddha) हा चीनच्या लुशान कौंटीमधील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. डोंगरावर असलेला हा पुतळा इ.स. २००८ मध्ये पूर्ण झाला. इ.स. १९९६ मध्ये ही मुर्ती घडवण्यास सुरू झाली होती आणि इ.स. २००२ मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले.
स्प्रिंग टेंपल बुद्ध | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | पुतळा |
ठिकाण | हेनान, चीन |
बांधकाम सुरुवात | इ.स. १९९६ |
पूर्ण | १ सप्टेंबर २००८ |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय |
१५३ मीटर (५०२ फूट) आधारासह: २०८ मीटर (६८२ फूट) |
स्प्रिंग टेंपल बुद्ध हा पुतळा १२८ मीटर (४२० फुट) उंच आहे, ज्यात २० मीटर (६६ फुट) उंच कमळ-सिंहासन सुद्धा आहे, तसेच मुर्तीच्या २५ मीटर (८२ फुट) उंच आधार/भवनाला यात एकत्रित मोजले तर या मुर्तीची एकूण उंची तब्बल १५३ मीटर (५०२ फुट) होते. स्प्रिंग टेंपल बुद्ध ही जगातील सर्वात उंच मुर्ती आहे.[१] ऑक्टोबर २००८च्या स्थिती नुसार ज्या डोंगरावर हा पुतळा बांधण्यात आला आहे, त्याला पुनःआकार देऊन चौथरा बनवला. त्यामुळे पुतळ्याची एकूण उंची २०८ मीटर (६८२.४ फुट) झाली आहे.[२][३] या बुद्ध मुर्तीच्या खाली बौद्ध मठ किंवा विहार आहे.
चिनी सरकारने स्प्रिंग टेंपल बुद्धाच्या निर्मीतीच्या योजनेची घोषणा अफगाणीस्तानमध्ये तालिबान द्वारा बामियान मधील बुद्ध मुर्तींच्या ध्वंसाच्या लगेच नंतर केली गेली होती. चीनने अफगाणीस्तान बौद्ध धरोहरच्या योजनाबद्ध विनाशाचा निषेध केला होता.
छायाचित्रे
संपादन- close up
- Fodushan scenic area Archived 2009-04-12 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- ^ (चिनी) 中国佛山金佛-153米卢舍那佛 - 墨宝斋 Archived 2008-09-01 at the Wayback Machine.
- ^ (चिनी) 世界第一大佛鲁山大佛 Archived 2008-12-28 at the Wayback Machine.
- ^ स्प्रिंग टेंपल बुद्ध ची एकूण उंची - २०८ मी (६८२ फुट) [१]