हेनान
हेनान (देवनागरी लेखनभेद: हनान; चिनी लिपी: 河南 ; फीनयिन: Hénán) हा चीन देशाच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रांत आहे. सुमारे ३२०० वर्षांचा इतिहास असलेला हा प्रांत चिनी संस्कृतीचे उगमस्थान मानला जातो. चीनच्या ८ प्राचीन राजधानीच्या शहरांपैकी ४ शहरे ह्याच प्रांतात स्थित आहेत. शाओलिन मंदिर तसेच जगातील सर्वाधिक उंच असलेला पुतळा स्प्रिंग टेंपल बुद्ध याच प्रांतात आहेत.
हेनान 河南省 | |
चीनचा प्रांत | |
हेनानचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | झेंगचौ |
क्षेत्रफळ | १,६७,००० चौ. किमी (६४,००० चौ. मैल) |
लोकसंख्या | ९,९३,६५,५१९ |
घनता | ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-HA |
संकेतस्थळ | http://www.henan.gov.cn/ |
आजच्या घडीला हेनान प्रांत चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत असून २०२० साली येथील लोकसंख्या सुमारे ९.९३ कोटी इतकी होती. झेंगचौ हे हेनानच्या राजधानीचे व सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
राजकीय विभाग
संपादनहेनान प्रांत एकूण १७ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.
Administrative divisions of Henan | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील हेनान पर्यटन गाईड (इंग्रजी)