ल्याओनिंग (देवनागरी लेखनभेद: ल्यावनिंग; सोपी चिनी लिपी: 辽宁; पारंपरिक चिनी लिपी: 遼寧; फीनयीन: Liáoníng) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे. याच्या दक्षिणेस पीत समुद्र व बोहाय समुद्र, आग्नेयेस उत्तर कोरियाशी संलग्न आंतरराष्ट्रीय सीमा, ईशान्येस चीलिन प्रांत, पश्चिमेस हपै प्रांत, तर वायव्येस आंतरिक मंगोलिया वसले आहेत. षन्यांग येथे ल्याओनिंगाची राजधानी आहे.

ल्याओनिंग
辽宁省
चीनचा प्रांत

ल्याओनिंगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
ल्याओनिंगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी षन्यांग
क्षेत्रफळ १,४५,९०० चौ. किमी (५६,३०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,३०,६०,०००
घनता २८९ /चौ. किमी (७५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-LN
संकेतस्थळ http://www.ln.gov.cn/

ल्याओनिंगाचे एका चिन्हातले लघुरूप "辽" (फीनयीन: liáo, ल्याओ ;) हे या प्रदेशाचे ऐतिहासिक काळापासून रूढ असलेले नाव आहे. इ.स. ९०७ ते इ.स. ११२५ या काळात या प्रदेशावर राज्य केलेल्या ल्याओ वंशावरून हे नाव पडले. आधुनिक काळात इ.स. १९०७ साली फंगथ्यान (चिनी लिपी: 奉天 ; फीनयीन: Fèngtiān ;) नावाने या प्रांताची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२९ साली फंगथ्यान हे नाव बदलून ल्याओनिंग असे नवीन नाव ठेवण्यात आले. दुसऱ्या महायुद्धकाळात जपान-प्रभावित कळसूत्री मांचूकुओ राजवटीत पुन्हा इ.स. १९०७ सालातले नाव स्वीकारण्यात आले; मात्र महायुद्ध संपताच इ.स. १९४५ साली पूर्ववत ल्याओनिंग हेच नाव ठेवले गेले.

बाह्य दुवे

संपादन