च्यांग्शी

(ज्यांग्शी या पानावरून पुनर्निर्देशित)

च्यांग्शी (देवनागरी लेखनभेद: ज्यांग्शी; चिनी: 江西 ; फीनयिन: Jiāngxī ; ) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या उत्तरेस आंह्वी, ईशान्येस च-च्यांग, पूर्वेस फूच्यान, दक्षिणेस क्वांगतोंग, पश्चिमेस हूनानवायव्येस हूपै हे प्रांत वसले आहेत. च्यांग्शीच्या उत्तर भागात यांगत्झे नदीचे खोरे पसरले असून दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. नानछांग येथे च्यांग्शीची राजधानी आहे.

च्यांग्शी
江西省
चीनचा प्रांत

च्यांग्शीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
च्यांग्शीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी नानछांग
क्षेत्रफळ १,६६,९०० चौ. किमी (६४,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,४०,००,००० (इ.स. २००९)
घनता २६४ /चौ. किमी (६८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-JX
संकेतस्थळ http://www.jiangxi.gov.cn/

बाह्य दुवे संपादन