विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २१
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
Family Tree
संपादन{{en:Template:Familytree}} हा इंग्रजी विकी वरील साचा मला मराठीत एक दोन ठिकाणी वापरायचा आहे. तो मराठीत कसा आणावा ? Dakutaa ०६:२२, १४ फेब्रुवारी २००९ (UTC)
Input Box/Text Box
संपादनAll the text boxes or input fields are sized for Roman writing, for Devanagari it always starts from middle (vertically) so it becomes difficult to see ऊकार & पायमोडी अक्षरे. Can we do something about it? Either move the text vertically up or increase the size of input boxes
लोकसभा
संपादनलोकसभा निवडणुक लवकरच येत आहेत. माझ्या मते आपण सर्वांनी नव्या जोमाने प्रकल्प:लोकसभा वर काम करावे. आपले मत येथे मांडावे. प्रकल्प खूप मोठा आहे पण सर्वांनी एकत्र काम केल्यास तो लवकर संपेल. सुभाष राऊत १२:०२, २४ मार्च २००९ (UTC)
नक्कीच; महाराष्ट्रातील उमेदवारांचा संदर्भ वर्तमानपत्रांमधून घ्यावेत असे आपणास अपेक्षित आहे काय? Dakutaa १७:२४, २४ मार्च २००९ (UTC)
- मुख्य पानावर काम सुरू केले आहे. उमेदवारांचा संदर्भ वर्तमानपत्र किंवा तत्सम उद्धृत करतायेण्यासारख्या संदर्भावरुन घ्यावा.
- अभय नातू १७:४९, २४ मार्च २००९ (UTC)
रिकामे लेख
संपादनमराठी विकिपीडियावरील अर्ध्याहून अधिक लेख पुर्णपणे रिकामे आहेत (केवळ विस्तार विनंती आहे). असे असताना नवीन (व काही अंशी असंबद्ध) रिकामे लेख तयार करण्यात काय अर्थ आहे? नवीन विकिचे पान तयार केल्यानंतर त्यात १-२ वाक्यांचा तरी मजकुर लिहीला जावा असे मला वाटते.
अभिजीत साठे २३:२८, २५ मार्च २००९ (UTC)
- तुमच्या मुद्द्याला अनुमोदन! दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. पण लोकांना जे काही करायाचे आहे ते करू देणे जास्त महत्त्वाचे आहे, त्यांच्यावर कोणतेही बंधन घालू नये. कन्नड विकिपीडियावर अशी बंधने घातल्याने त्याच्यात कोणतीच प्रगती झालेली नाही. -- कोल्हापुरी ०८:१७, २६ मार्च २००९ (UTC)
- अभिजीत,
- तुमचे मत रास्त आहे. रिकामे लेख तयार करणार्यांत माझा नंबर पहिला (दुसरा/तिसरा तरी नक्कीच) आणि त्यामुळे मी माझे मत येथे मांडतो.
- ही बाब थोडी किचकट आहे. लेखसंख्या कि लेखदर्जा हा वाद पूर्वीही अनेकदा येथे झाला आहे. लेखदर्जाचा हट्ट धरणार्यांचा (रास्त) मुद्दा बव्हंशी तुमच्या मताशी जुळतो -- नुसतीच पाने असून उपयोग काय? त्याने वाचणार्याच्या न ज्ञानात भर पडत वा विकिपीडियाच्या दर्जात.
- लेखसंख्या वाढवायला बघणार्यांचा (रास्तच) मुद्दा आहे -- जरी रिकाम्या लेखांनी विकिपीडियाच्या ज्ञानात भर पडत नसली तरी वाढलेल्या लेखसंख्येमुळे मराठी विकिपीडियाला प्रसिद्धी मिळण्याला जास्त वाव आहे. शिवाय, [लेखसंख्येत हिंदी, तमिळ, बंगाली, इ. भारतीय भाषांच्या मागे पडल्यास मराठी विकिपीडिया मार्जिनलाइझ[मराठी शब्द सुचवा] होण्याची शक्यता आहे.
- माझे मत दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. दोन्हीही परिमाणे महत्वाची आहेत. एक लाख नुसतेच रिकामे लेखांचा उपयोग नाही तसेच एक हजार पूर्ण लेखांचाही तितका उपयोग नाही. अशी मर्यादित माहिती असलेली अनेक संकेतस्थळे आहेत. शिवाय शासकीय व लक्ष्मणशास्त्र्यांचा विश्वकोश आहेच!
- मराठी विकिपीडियाने आपल्या सदस्यावर अगदी पहिल्यापासून कमीतकमी नियम व बंधने घालण्यात आलेली आहेत. बंधने घालून नियम पाळण्यापेक्षा काही निकष व नियमांकडे प्रोत्साहित करणे हे अधिक चांगले motivator आहे असे मला वाटते.
- लेखसंख्या वाढवण्यामागची माझी कारणे देतो --
- विकिपीडियाचा ड्रॉ आहे तो प्रत्येक सदस्याला आपण स्वतः काही तरी योगदान देण्याचा. मी माझ्या गावाबद्दल, शाळेबद्दल, विषयाबद्दल काहीतरी लिहून ठेवतो आणि इतर ते वाचतील. या साठी येथे येणार्यांना जर पहिल्यापासून लेख लिहायला लागला तर तो उत्साह मावळण्याची शक्यता दाट आहे. जर लेखाचा सांगाडा असेल तर त्यात भर घालणे कधीही सोपे -- उदा. पारनेर, अमळनेर, इ.
- रिकाम्या लेखांत वर्गीकरण आणि इंग्लिश (तरी) आंतरविकि दुवा असणे महत्वाचे आहे आणि शक्य तेथे ते काटेकोरपणे पाळले जाते. वर्गीकरणामुळे इतर सदस्यांना आणि प्रबंधकांना लेखावर नजर ठेवणे सोपे जाते, तसेच लिहिलेल्या मजकूराला context मिळतो. आंतरविकि दुव्यांमुळे नंतर येणार्या लेखकाला मोठा संदर्भ मिळतो, ज्यावरुन नुसते भाषांतर केले असता येथील लेखात मोठी भर पडते. तरी रिकामे लेख नुसतेच रिकामे नसतात (नसावे).
- विकिपीडियाचा दर्जा २-३ प्रकारे मोजला जातो या पानावरील शेवटचा रकाना आहे Depth. हा आकडा साधारणपणे प्रत्येक विकिपीडियाचा दर्जा दाखवतो. इंग्लिश विकिपीडियाचा आकडा आहे ४१५, हैशियन ०, नेपाळ भाषा ४, हिंदी ८, कन्नड १३. मराठी विकिपीडियाचा दर्जा आहे १४. तरी येथील लेख अगदीच टाकाऊ नाहीत :-) जसजसे लेख वाढतात तसतसे हा आकडा वर ठेवणे कठीण होत जाते. कोल्हापुरींनी म्हणल्या प्रमाणे बंधने घातल्याने कन्नड विकिपीडियाचा दर्जा तर वाढला नाहीच (या निकषानुसार), तर लेखसंख्याही मर्यादितच राहिली.
- २०,००० लेख झाल्यावर (त्यामुळे) मराठी विकिपीडियाला इंग्लिश (व इतर) विकिपीडियांवर थेट दुवा मिळाला. याने इतर मराठीभाषकांना मराठी विकिपीडिया सापडणे सोपे झाले. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, इ. दैनिकांतून विकिपीडियावर लेख लिहिले गेले असता त्यात मराठी विकिपीडियात इतके लेख असून तो सध्या अमक्या क्रमांकावर आहे असे लिहिले गेले, ज्याकारणे अधिकाधिक मराठी भाषकांना येथे येउन वाचण्याचा (तरी) उत्साह आला असावा.
- आता सगळ्यात मोठे कारण -- मराठी विकिपीडियावर मोजके सदस्य झटतात. गेल्या ३-४ वर्षांत ही संख्या ५-७च्या वर गेलेली नाही. असे असता या मर्यादित मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेणे अतिमहत्वाचे आहे. त्यादृष्टीने लेखसंख्या तसेच दर्जा दोन्हीही वाढवणे जास्त सुज्ञपणाचे वाटते.
- असो, हे लांबलचक मत/उत्तर तुम्हाला पटेल अशी आशा आहे. शंका किंवा प्रश्न असल्यास विचारालच.
- अभय नातू १६:०७, २६ मार्च २००९ (UTC)
- लेखसंख्या वाढवण्यामागची माझी कारणे देतो --
मित्रांनो, ( माझे मत)
- लेखसंख्या वाढवण्यास हरकत नसावी, पण नवीन लेख (फक्त विस्तार विनंती असलेले) लेख तयार करताना, मराठी भाषिकांची पोहोच लक्षात घेउन तयार करावा. उदा: जपान मधील एखाद्या खेळाडूचा/लेखकाचा/राजकारण्याचा लाल दुवा तयार असेल तर त्याचा लेख नुसतेच विस्तार विनंती म्हणून तयार करण्यात काहीच पॉइंट नाही. कारण त्या व्यक्ती विषयी जाणणारे फारच थोडे असतील व त्याची माहीती मराठी विकीवर येणे जवळपास अशक्य असेल.
- मराठी विकीवर लेखकांची संख्या का वाढत नाही हा प्रश्ण आहेच. परंतु, जेवढे सद्य लेखक आहेत त्यांनी त्याची काळजी न करता आपले योगदान देणे चालू ठेवावे. परंतु माझ्या मते, लेखांना भेट देणार्यांची संख्या बरीच असेल. परंतु सम् हाउ लोक स्वयंप्रेरणेने संपादन वरती क्लिक करुन लेखात भर टाकण्याचे काम क्वचितच करतात. जर इंग्लिश विकीपीडियात मराठीचा दुवा असेल मराठी वाचक नक्कीच भेट देतात असे माझ्या पहाण्यात आले आहे. म्हणून नवीन लेख नक्कीच करावेत.
अजयबिडवे १०:४१, २७ मार्च २००९ (UTC)
How about adding more burocrats Marathi Wikipedia
संपादनAs given below we do have indipendant bot policy,Since now a days I am not visiting mr wiki frequently enough and I am not aware if Abhay is busy in some thing there seems to be quite a few bot requests pending and need burocrat approval.And it is quite a long time we have not added new admins and burocrats.So please do have a discussion and see at least how we can support this bot activity tracking also.I belive this is important. Thanks and Regards Mahitgar १५:५९, १३ एप्रिल २००९ (UTC)
- First off, I have no problem adding another bureaucrat.
- As you can witness from my daily edits, I am here. Almost every day. I have become busier than usual over the last few days, but I have been prioritizing my wiki-time on tasks I believe are important.
- Secondly, there is not a huge backlog of such requests. If you look on wikipedia:Bot, you will find that more than 60% have been granted. Of the rest, some had oppose votes and concerns not addressed by the requestor. Then there are some that are genuinely pending.
- My modus operandum in dealing with bot requests has been to contact the operator on his/her home wikipedia and request a set number (usually 50) test edits on w:mr. Once the bot fulfils this requirement, I grant the bot status and contact the operator again, letting him/her know that the flag has been granted. After that, I keep an eye on that bot for a few days to ensure no funny business is going on.
- Most of the pending bot requests fall into one of the following categories --
- Fly-by request. Someone operating a bot blasts a bot request to all wikipedias, regardless of whether they intend to work on w:mr or not. These do not respond to my request of test edits. I do not believe these should be granted.
- No response. There is no response, positive or negative from the operator.
- Opposition from local users and/or failure to address concerns and answer questions.
- There are also some other bots that have been editing here without requesting a bot flag. Unless requested, an account must not be flagged as a bot.
- Anyways, I put this down so that if we decide to add another bureaucrat, s/he can have some guidelines to work with.
- Regards,
- अभय नातू १८:११, १३ एप्रिल २००९ (UTC)
Thanks Abhay for putting forward facts,I support your view and actions very much, In fact it seems some bot thought that we do not have enough activity supporting bots so he had flagged messages there by they could have bot flag directly from meta stewards.I did put up our case at meta and made changes to relevant pages on mr wiki and When I saw that I took up the subject.
I am adding up Some of the points you have written above as our bot policy.
BTW I would recomond to promote user kolhapuri and/or sankalpdravid as burocrat to support Abhay as they are experienced and matured users of our wiki.
Besides I wish all indic wikipedias should support forward user ukesh and/or user shibu alex from nepal bhasha and malyalam wikipedia respectively for their consistent support at meta and else where for Indic wikipedias.
Marathi Language wikipedia has indipendant Bot policy needs local approval
संपादन- en: Requests for the bot flag should not made be made on community page. Marathi Language wiki :mr: does not use the standard bot policy, and does not allows global bots and automatic approval of certain types of bots. All bots should apply at Marathi Wikipedia Local Bot Request, and then request access from a local burocrat if there is no objection.
Policy for Non Marathi Bots convey it prominently to all old and new bots
- Policy page governing non-marathi bots should be conveyed at
- All non-Marathi Bots please do register yourself with bot name, controllers User name, talkpage, with brief info the work Bot carrying out; source of Marathi words reffered by the bot etc. at Marathi Wikipedia Local Bot Request.
- Other than interwiki linking,prior permission from Marathi wikipedia Burocrats or sysop is must.
- Non-Marathi Bots are requested, to not to carry out any spellcheck/spellchange in Roaman or Devanagari script in Marathi Language wikipedia or wictionary; except in cases of specific request comming from a Marathi Wikipedia Sysop after due consensus at Marathi Wikipedia.
- Where bots or non Marathi wikipedia want to request spell change shall do so first at mr:Wikipedia:Embassy in a separate subsection.
- Non-Marathi Bots shall not carry out any change in any images and pictures or shall not upload any images and pictures without express permission or request to and from Sysops or Burocrat from Marathi Wikipedia with due consnsus and/or requirement.
- Note for Hindi language bots संस्कृत, हिंदी तथा किसीभी भारतीय भाषासे मराठी व्याकरण और मराठी शब्द लेखन भिन्न हो सकता है इस लिए अमराठी भाषायी बॉट/बॉट नियंत्रक (मराठी भाषी बॉट के अलावा और किसी भाषा के बॉट नियंत्रक) द्वारा मराठी भाषा विकिपीडियामे शुद्धीचिकित्सा या शब्द '"शुद्धीकरण प्रतिबंधीत है।।
Thank you and regards
Yes, I realize that. I was proposing a change to that system because you have a number of requests that have been sitting there for awhile so it appears you do not have the activity or interest to keep up with bot requests on your own. I did not mean any harm by it. -Djsasso १६:०३, १२ एप्रिल २००९ (UTC)
साचा विनंती
संपादनसाचा:Harvard reference कोणी हा साचा मराठीत आणू शकेल काय ? धन्यवाद Dakutaa १४:२४, १३ एप्रिल २००९ (UTC)
- Harvard reference हा साचा आता वापरात नाही. त्याऐवजी citation हा साचा वापरावा असे त्या साच्यावरच लिहिण्यात आलेले आहे.
- तरीसुद्धा हा साचा पाहिजे का?
- अभय नातू १७:२२, १८ एप्रिल २००९ (UTC)
- साचा discontinue झाला असला मी बघितललेया / भाषांतर करत असलेल्या अनेक लेखांवर हा साचा दिसतो. जेव्हा मजकूर मी मराठी विकीसाठी उचलतो तेव्हा तो लाल होतो. मूळ Havard reference ला citation करणे मला थोडे (खरे तर बरेच)जिकिरीचे व वेळखाऊ वाटते. त्यामुळे मूळ साचा जसाचा तसा ठेवणे (माझ्यासाठी) सोईचे राहिल. व हा साचा मराठीत आल्यास माहिती असूनही साचा नसल्याने रविन्द्रनाथ टागोर मध्ये लाल दुवे दिसत आहेत ते निळे होतील.
Havard Reference -> citation हा बदल करण्याचे वाचल्याने तो वेळ इतर लेखांवर वापरता येईल. Dakutaa १०:२१, २० एप्रिल २००९ (UTC)
- येथे साचा:Citation आहेच. Havard Reference -> citation हे पुनर्निर्देशन तयार केल्याने बहुतेक काम होईल. एकदा टागोरांबद्दलचा लेख नजरेखालून घालून कळवा.
- अभय नातू १४:४३, २० एप्रिल २००९ (UTC)
आजचे छायाचित्र
संपादनमुखपृष्ठवरील 'आजचे छायाचित्र' या सदरात त्या छायाचित्राबद्दल संक्षिप्त माहिती देता येईल काय? इंग्रजी विकी मधे 'Today's featured picture' या सदरात माहिती असते.
- होय, स्वयंसेवी संपादनाने योगदानाने तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे
Please translate templates for Media of the Day:
And you may edit commons:Template:Potd/name/mr for change Picture of the Day text.
संस्कृत विकिपीडियाकडून मदतीचे आवाहन
संपादनMahitgar १५:३९, १२ मे २००९ (UTC)
मराठी विकिपीडिया २५००० टप्पा आणि वाचक आणि वाचन आढावा
संपादनमराठी विकिपीडिया अजून नजीकच्या काही काळात २५००० लेखांचा टप्पा पार पाडेल.तुम्ही मराठी विकिपीडियाचे व निव्वळ वाचक असाल तर काय आवडले.मराठी विकिपीडियावरापल्याला सर्व विषयांबद्दल वाचणे आवडते का केवळ मराठी संदर्भातील गोष्टी प्रामुख्याने वाचण्यास आवडतात का सर्व विषय वाचण्यास आवडतात? आपली मराठी विकिपीडियास भेट साधारणपणे किती दिवसांनी होते? Mahitgar १०:०४, २१ मे २००९ (UTC)
लेखनातील अडसर/अडचणी कोठे कोठे आहेत ?
संपादनमराठी विकिपीडीयातील सहाय्य लेखांचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला आहे असे वाटते.सहाय्य पानांसदर्भारत या पुढील योगदान करण्यापूर्वी आतापर्यंतची कोणती सहाय्यपाने उपयोगी पडली किंवा तुम्ही वापरली आहेत का? सहाय्य पानांवरील माहिती वापरताना काही अडचणी आल्या का अडचणी आल्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या. मराठी विकिपीडियातील लेखन आणि दर्जा वाढवण्या करिता नवीन लेखकांना/संपादकांना काही अडचणी जाणवतात का आणि त्या कोणत्या हे कळाले तर पुढील कामाची दिशा ठरवणे सोपे जाईल.त्याकरिता आपला दृष्टीकोन आवर्जून व्यक्त करावा ही विनंती ?
- सहाय्य पानांच्या पुढील टप्प्यात चित्रे आणि (commons) वरील सहाय्य पानांच्या भाषांतरणास प्राधान्य द्यावे काय ?
सुट्टीवरील संपादक
संपादनमराठी विकिपीडियावर आपण पूर्वी संपादन केले असेल आणि बराच कालावधी पासून विकिरजेवर असाल तर तूमच्या दृष्टीकोणातून मराठी विकिपीडियाची पुढील दिशा कशी असावी?
माझी निरिक्षणे
संपादन- विविध इसवीसनातील लेख वर्ग:इ.स. १९७१ मधील चित्रपट या एकाच वर्गीकरणात आढळत आहेत
नवीन दालन प्रस्ताव
संपादनमराठी विकिपीडियातील खालील दालन चालू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. ज्या प्रमाणे इंग्रजी विकिपीडियात featured content च स्वतंत्र दालन तेही सुचालन विभागात खास नमुद केले गेले आहे त्याप्रमाणेच दालन:विशेष लेखन चा प्रस्ताव मांडत आहे.त्या प्रमाणेच क्रिडा विषयांबद्दल बर्यापैकी लेखन होत आहे तर एक क्रिडा विषयाला वाहीलेले दालन असावे.
- पाठिंबा
- पाठिंबा Maihudon ०४:०१, ११ जून २००९ (UTC)
- यात कोणत्या प्रकारचे लेख, मजकूर असेल?
- en:Portal:Featured contentची मराठी आवृत्ती .इंग्रजी विकि याचा दुवा आजकाल सुचालन खिडकीत देते.Mahitgar १६:२९, २१ मे २००९ (UTC)
- पाठिंबा
- अभय नातू १५:२०, २१ मे २००९ (UTC)
कोण हा मराठी माती कार?
संपादनकुणी एक ’मराठी माती’ या संकेत स्थळाचे दुवे कोणत्याही विकिपीडिया लेखात संबध असो अथवा नसो देत सुटले आहे. आणि हा प्रकार मी तब्बल गेली काही महीने बघतो आहे. या सदगृहस्थास मराठी विकिपीडियात दुवे टाकण्यात का वेळ दवडतोस असे कुणी विचारावयास हवे या पेक्षा इतरत्र अधिक चांगल्या पद्धतीने जाहिरात केली तर त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल. Mahitgar १३:५६, २१ मे २००९ (UTC)
- जर सदस्यांची मंजूरी असेल तर एखादा सांगकाम्या चालवून हे दुवे काढता येतील.
- अभय नातू १५:१९, २१ मे २००९ (UTC)
इतर निर्वाह
संपादनमला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
विकिपीडिया:निर्वाह या विकिपीडियातील आवश्यक नित्य कामांची माहिती देण्याचा प्रयत्न चालू आहे. पहिल्या दोन विभागात साचा {{पृष्ठपर्याय}} वापरून पहा चर्चा संपादन आणि इतिहास हे साचा नामविश्वा करिता उत्कृष्ट पणे बनले आहेत.
असाच माझा प्रयत्न इतर नामविश्वातील माहिती {{पृष्ठपर्याय नामविश्व निर्वाह}} साचा वापरून किंवा इतर काही बदल करून करावा असा हेतू आहे. या लेखाचा उर्वरीत भाग पाहिलात तर मी कुठे अडतो आहे ते लक्षात येईल. माझे साचे तयार करण्याचे बद्दल माहिती मर्यादित आहे. कुणी यात मला मदत केले तर नंतर जेव्हा केव्ह हा लेख अपडेट केला जाईल तेव्हा वेळ कमी लागेल.
धन्यवाद Mahitgar १६:२६, २२ मे २००९ (UTC)
शीर्षक लेखन संकेत
संपादनमाहितगारांनी जुन्या चर्चा व इतर संदर्भ शोधून विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत हा लेख लिहायला घेतला आहे. यात (विशेषतः) नवीन सदस्यांना अत्युपयुक्त माहिती आहे/असेल. यातील संकेतांवर तुमचे मत कळवा.
अभय नातू १७:२६, २२ मे २००९ (UTC)
चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण चर्चा
संपादननमस्कार,
चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण या लेखावरील चर्चा सुरळीत रहावी तसेच त्यात व्यक्तिगत आरोप/प्रत्यारोप येऊ नयेत म्हणून तेथे सदस्यप्रवेश करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. निनावी खोडसाळ विधाने यापुढे होत राहिल्यास हा लेख व चर्चा पान निनावी लेखकांना बंद करण्यात येईल.
सहसा विकिपीडियावर निनावी लेखन करू नये. तसे करण्यास बंदी नाही (मराठी विकिपीडियावर कधीच हे बंधन नव्हते/नाही), पण बेजबाबदार संपादने झाल्यास नाईलाजाने प्रबंधकांना हे पाउल उचलावे लागेल. ही वेळ येऊ देऊ नये ही विनंती.
अभय नातू १२:५७, २७ मे २००९ (UTC)
सुचालन खिडकीत स्थान विनंती
संपादनइंग्रजी विकिपीडियाने वाचकांच्या सोयीकरिता आपल्या या लेखा प्रमाणे असलेल्या Portal:Contents या पानास डावीकडिल सुचालन खिडकीत स्थान दिले आहे. असेच डावीकडिल सुचालन खिडकीत स्थान मराठी विकिपीडियाने विकिपीडिया:सफर लेखास द्यावे असे मला वाटते. कृपया आपले मत व्यक्त करा. Mahitgar ०६:०९, १ जून २००९ (UTC)
- या लेखाला विकिपीडिया:सफर असे शीर्षक का आहे?
- अभय नातू १७:२९, १ जून २००९ (UTC)
- बरे झाले तुम्ही हा प्रश्न विरचारलात ते मलाही हा प्रश्न पडला पण,दुसरा शब्दही सुचला नाही. इंग्रजी कंटेंट शब्दाला मराठी शब्द मजकुर असा आहे.पण प्रत्यक्षात वापरताना तो चपखल बसत नाही.विकिपीडिया:सफरकरिता 'भ्रमंती' किंवा इतरही शब्द कदाचित वापरता येतील. तुम्ही विषय काढल्यामुळे मी पानाचा इतिहास काढून तरी पाहिला आणिसदस्य:Vivek.nirkhe यांनी हा लेख या नावाने सप्टेंबर २००५ मध्ये सुरू केल्याचे दिसते.
- Mahitgar ०४:३५, २ जून २००९ (UTC)
- विकिपीडिया:सफरएवजी [[विकिपीडिया:वाटाड्या]] शब्द कसा राहील ? बरिच मराठी संकेतस्थळे sitemap page करिता वाटाड्या हा शब्द वापरतात.
Mahitgar ०४:४३, ३ जून २००९ (UTC)
फ्रान्स
संपादनफ्रान्स हा शब्द मराठी विकीपीडिया वर वारंवार फ्रांस असा लिहीला जातो. शाळेमध्ये इतिहास व भूगोलात फ्रान्स असे वाचल्याचे स्पष्टपणे आठवते. तसेच सर्व मराठी वृत्तपत्रांमध्ये (लोकसत्ता, मटा, सकाळ) हा शब्द फ्रान्स असाच लिहीला जातो. In fact, मराठी विकीपीडिया सोडुन इतर कोठेही मराठीमध्ये फ्रांस असे वाचल्याचे आठवत नाही. असे असताना फ्रांस लिहिण्याचा अट्टाहास का? अभिजीत साठे ०३:३५, २ जून २००९ (UTC)
- [जुनी चर्चा]
- सदस्य चर्चा
- अभय नातू ०३:५९, २ जून २००९ (UTC)