विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ११


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा









शब्द


- Spanish Conquest of Mexico ह्यास काय म्हणावे? कारण इंग्लिश लेखांत pre-Conquest, post-Conquest असे शब्द बरेचवेळा वापरले जाते. तचेच मूळ लेखातील (Spanish Conquest of Mexico) एक वाक्य पहा - The Spanish conquest of Mexico was one of the most important campaigns in the Spanish colonization of America. The most important conquistador in this conquest was Hernán Cortés. तेव्हा Spanish Conquest of Mexico ह्यास काय प्रतिशब्द द्यावा? + Aztec warfare

- तसेच Late Post-Classic ला काय म्हणावे? + Pulque :- +

- Aniruddha Paranjpye ०४:१७, ११ सप्टेंबर २००७ (UTC) - - <edit2> - - तसेच Aztec warfare ला काय म्हणावे? - - The Shorn Ones ह्याला मरठीत काय शब्द द्यावा? - - Aniruddha Paranjpye ११:०५, ११ सप्टेंबर २००७ (UTC) - - <edit3> - - Pulque ?? - - Aniruddha Paranjpye १५:२२, ११ सप्टेंबर २००७ (UTC)

हे शब्द चालतील?


Heliacal rising  : सूर्याबरोबर उगवणे.(खाली केलेली दुरुस्ती पहावी.)

Spanish Conquest  : स्पेनचा दिग्विजय.

Spanish Conquest of Mexico : स्पेनचा मेक्सिकोवर कब्जा.

Pleiades : कृत्तिका(पुंज), बहुलिका, कात्या, सुरैया.

Late Post-Classic : अभिजातोत्तर(काळाचा, कलेचा, वाङ्‍मयाचा)उत्तरार्ध.

Aztec warfare : अझ्‌टेक संग्राम.

Pulque : पुल्का(एक मेक्सिकन मद्य).

The Short ones :एक छोटासा किंवा छोटासा एक.

---J--J १८:४८, २१ सप्टेंबर २००७ (UTC)


दुरुस्ती


Heliacal Rising : सूर्याबरोबर उगवणारी तारका आपल्याला दिसू शकत नाही. परंतु पृथ्वी आपल्या भ्रमणमार्गावरून पुढे सरकताच ती तारका सूर्योदयाच्या किंचित अगोदर उगवायला लागते व दिसायला लागते. याला त्या तारकेचा उदय झाला किंवा तिचे Heliacal Rising झाले असे म्हणतात. --J १२:५०, २३ सप्टेंबर २००७ (UTC)

ऑक्टोबर २००७ चे मुखपृष्ठ सदर

नमस्कार ऑक्टोबर २००७ चे मुखपृष्ठ सदर म्हणून अशोक सराफ या लेखाचा विचार व्हावा. सदस्य मराठीप्रेमी यांनी या लेखावर काम केले आहे व मा.स म्हणून चित्रपट विषयक लेख असावा असे मला वाटते. कृपया लेखावर सम-समीक्षा अपेक्षित आहे तर ती सदस्यांनी करावी ही विनंती. मराठीप्रेमी यांचे अभिनंदन व आभार. महाराष्ट्र एक्सप्रेस १२:५१, १२ सप्टेंबर २००७ (UTC)

Needs work

Good start for the article. However, I believe it needs work to be a featured article. Right now, most of the text is list(s) of movies and such. Not enough information. I'm sure we can work on it.

Abhay Natu १७:२३, १२ सप्टेंबर २००७ (UTC)

But we dont have enough sources to add information. The article is based on 3 websites. महाराष्ट्र एक्सप्रेस ०४:२८, १३ सप्टेंबर २००७ (UTC)

Members please join स्वागत आणि साहाय्य चमू

Even while Marathi Wikipedia is equiped with minimum level of help pages, new users find warm personalised attention very usefull and encouraging.

While Marathi Wikipedia admins Abhay and Sankalp have been carrying out this work almost single handedly ,I wish and request other members to come ahead in assisting them in this task.Now it is time Marathi Wikipedia new membership and their edits are increasing very fast.

Please, please, please think over my sincere apeal and share following tasks if possible.

Marathi Wikipedians who are interested in welcoming new logged in or anonnymous users and support them with personalised attention and help ,please do add in this[[वर्ग:Helpdesk]] on your own user talk page.

The purpose of this Category is to co-ordinate help activities requiring personal attention by Marathi Wikipedians.

One of Helpdesk objective is to reach new users and anonymous users with a welcome message in shortest possible time, i.e. within 5-10 minutes , after you observe such activity on अलीकडील बदल.

We have three types of welcome messages in our kitty :

  • {{Welcome}} for users who created a new user log in account.
  • {{Fasthelp}} for anonymous users who seem to be posting messages/writing in Romanised Marathi,many times at wrong page.
  • {{Fonthelp}} can be used along with {{Fasthelp}} where specific request is made for help in respect of Marathi fonts usage.
  • {{सूचना अनामिक सदस्य}} This template is for people who are posting/writing in proper articles but either did not create log in account or did not notice that they are not logged in.
  • Another Category Wikipedians looking for help usual help requirements coming from any logged in user who posts a Template {{Helpme}} on any of talk pages.After providing help on such pages please do not forget to remove the Template{{Helpme}} from said page.
  • {{Copyright?}} Please do use this template if you feel guiding a new memebr about importance of copy right aspects is usefull.

Hope to you will share above tasks a little wherever possible

Thanks and regards

Mahitgar १७:२६, १२ सप्टेंबर २००७ (UTC)

Good idea Mahitgar. Count me in. महाराष्ट्र एक्सप्रेस ०४:२९, १३ सप्टेंबर २००७ (UTC)

शब्द 2

didn't know anyone प्रतिशब्द of my words which I gave above?

Aniruddha Paranjpye ०६:२५, १३ सप्टेंबर २००७ (UTC)

http://www.avakashvedh.com/ अवकाश संबधात येथे काही प्रतिशब्द उपलब्ध असतील तर पहावे.



Login केले नाही तरी प्रत्येकवेळी प्रत्येक पानावर क्लिक केल्यानंतर ~ त्या पानापाशी पोहचल्यानंतर सतत संदेश येतो!

Aniruddha Paranjpye ०६:३४, १३ सप्टेंबर २००७ (UTC)

बहुधा साचा {{Fasthelp}} मुळे येणारी सुचना असावी. हा संदेश वाचला तर त्यातच त्या संद्शाचे उद्दीष्ट नमुद कले आहे.प्रवेश केलेला असो अथवा नसो संबधीत सद्स्य किंवा अंकपत्त्याच्या सद्स्याने संदेश वाचे पर्यंत नविन सुचना संदेश दिसत रहावा हि विकिपीडिया प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.

खास करून नवागत अनामिक सद्स्यांकडून चूकां कमीत कमी व्हाव्यात म्हणून {{Welcome}}, {{Fasthelp}} इत्यादी साचांचा उपयोग सयुक्तिक वाटतो.या संदर्भात वरच्या परिच्छेदात माहितगार यांनी काही उपयूक्त माहिती दिलेली दिसते. विजय १५:३९, १३ सप्टेंबर २००७ (UTC)


आता तसे होत ना ही हे खरे!
Aniruddha Paranjpye ०४:५७, १४ सप्टेंबर २००७ (UTC)

Greetings

Happy Ganeshutsab / Ganesh chaturthi to all Marathi wikipedians. --Eukesh ११:४१, १५ सप्टेंबर २००७ (UTC)

Compliments to मराठी विक्शनरी सदस्य श्रीहरि is now a sysop (administrator) on Marathi Wiktionary,Marathi Wiktionary looks forward to your continued support.

Mahitgar १०:३३, १६ सप्टेंबर २००७ (UTC)

अहमदाबाद

I have moved this discussion to चर्चा:अहमदाबाद with section title "अहमदाबाद v/s अमदावाद". It is more useful there as a reference without having to hunt in chaawadi archives later.

केदार {संवाद, योगदान} १८:३९, २२ सप्टेंबर २००७ (UTC)

अहमदाबादच

गावांच्या किंवा व्यक्तींच्या नावांचे स्थानिक उच्चार ग्राह्य धरायचे ही कल्पना मला कधीच पसंत नव्हती. विशेष नावांची रूपांतर-वजा-भाषांतरे होतात हे आपण मान्य करायलाच पाहिजे. ज्याप्रमाणे मराठीत जपानला निप्पॉन आणि जर्मनीला डॉइश्लॅन्ड कधीही म्हटले जाणार नाही, त्याचप्रमाणे अहमदाबादला अम्दावाद. गुणतिलकेच्या बाबतीत माझे ठाम मत होते की इंग्रजीत किंवा सिंहलीत ते नाव कसेही लिहीत असले तरी जोपर्यंत ते मराठीत गूणतिलके लिहीत नाहीत तोपर्यंत आपण 'ग'ला पहिला उकारच दिला पाहिजे. गूण या शब्दाला काहीही अर्थ नाही, आणि प्रत्येक विशेष नामाला साधारणपणे एक चांगला अर्थ असतोच. पॅरिस स्थानिक उच्चाराप्रमाणे लिहायचे म्हटले तर पार्‍‍र्ही असे लिहूनसुद्धा खरे नाव लिहिले जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक बिगरमराठी नावाचे मराठीत जे रूपांतर अस्तित्त्वात आहे ते, किंवा नव्याने करून तसेच नाव मराठीत लिहायला पाहिजे. आता तामीळमधे 'ब', 'द' ही अक्षरेच नाहीत, त्यामुळे त्या भाषेत बहुधा अहमतापात असे लिहीत असले तर काही आश्चर्य नाही. मराठी विकिपीडियावर फक्त मराठी माणसे जसे लिहितात तसेच लिहिले गेले पाहिजे. स्थानिक लोक कसेही उच्चारतील, लिहितील किंवा दर वर्षी त्यात सुधारणा करतील, तर त्याचा आपल्या लिहिण्या-उच्चारण्यावर काहीही परिणाम होता कामा नये. --J---J १७:१२, २१ सप्टेंबर २००७ (UTC)


विशेष नावांची रूपांतर-वजा-भाषांतरे होतात हे आपण मान्य करायलाच पाहिजे
How do you address Mumbai/Bombay? Are you ok with Bombay, Poona, Cawnpore, Madras?
प्रत्येक विशेष नामाला साधारणपणे एक चांगला अर्थ असतोच
Says who? I can cite a hundred examples of names that have absolutely no meaning. It is only the wielder of the name that can/should dictate if the name has any meaning and if so, what. By the same token, the wielder of the name must dictate how that name is pronounced. As I asserted earlier (perhaps with more than a bit of brashness), mangling given names to suit our own (wrong and/or misguided) assumptions/precedents is insulting to the person/place.
मराठी विकिपीडियावर फक्त मराठी माणसे जसे लिहितात तसेच लिहिले गेले पाहिजे
Which Marathi maaNuus? Someone from Pune/Mumbai? Or somone from Nagpur? Or the 'shaasakiya' version? How about the significant minority that lives in Mauritius? Even within Maharashtra, there are many names that have regional nuances. सीताबर्डी, a part of Nagpur, is spelt as Sitabuldi in English. Which one is correct?
As for Paris, Nippon, Deutchland *I* would certainly like to address them as Nippon, Deutchland, etc. This point was addressed in earlier exchanges - in summary, the *as far as possible* rule holds. There can be no deterministic rule on this issue, however, the closer to the 'truth' we are, the better.
To reiterate, the existing policy does not rule out creating redirects from the accepted forms of names, rather encourages it. So, Japan will still redirect to Nippon and when redirected, the page will say redirected from Japan.
Abhay Natu १७:४१, २१ सप्टेंबर २००७ (UTC)
p.s. :I have not proposed naming Ahmedabad/Amadavad article as Karanavati (yet) :-)
What does Japan call itself in English? If they are not mandating using Nippon (in English or any other language) why should we use Nippon in Marathi? Redirecting Nippon to Japan is fine but redirecting Japan to Nippon makes no sense to me.
केदार {संवाद, योगदान} १८:५५, २२ सप्टेंबर २००७ (UTC)
BTW, can you explain the confusion caused by "सीताबर्डी, a part of Nagpur, is spelt as Sitabuldi in English.". For me the page name in Marathi wikipedia will be सीताबर्डी if that is what people living there (including govt there) write in Marathi. Title of English wikipedia page would be Sitabuldi if that is what people living there (again including govt there) write in English.
केदार {संवाद, योगदान} १९:०३, २२ सप्टेंबर २००७ (UTC)

How do you address Mumbai/Bombay? Are you ok with Bombay, Poona, Cawnpore, Madras? बॉम्बे हे पोर्तुगीजांनी मुंबईला दिलेले मूळचे नाव. त्याचा मुंबादेवीशी संबंध जोडून मुंबई हा शब्द फार उशीरा जन्माला आला, हा इतिहास आहे. Beijing चा उच्चार चिनी भाषेत पीकिंग असाच करतात. तसाच Bombay चा उच्चार मुंबई करता आला असता. 'पुणे'चे स्पेलिंग Poona याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही होऊ शकत नाही हे मी यापूर्वी सिद्ध करून दाखवले होते. Poona चा उच्चार पुणे असा होऊ शकतो, नव्हे तो तसाच आहे. आपल्या राज्यकर्त्यांना इंग्रजी नीट येत नसल्यामुळे ते 'पूना' उच्चार करतात हा इंग्रजी भाषेचा दोष नाही. Cawnpore हे कानपूरचे सर्वात जवळचे स्पेलिंग आहे, हल्लीच्या स्पेलिंगचा उच्चार कॅन्पर्‌ असा होतो. इंग्रजी भाषा आपली नाही, तिच्या स्पेलिंगमधे ढवळाढवळ करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. Omar Khayyam चे जर Umar Khayyam करता येत नाही तर Osmanabadचे Usmanabad(अस्मानाबाद किंवा यूस्मानाबाद) करणे चुकीचे आहे. उच्चाराप्रमाणे Osmanabad हे सर्वात योग्य स्पेलिंग आहे. राज्यकर्त्यांची लहर फिरली की बदलले स्पेलिंग हे सुशिक्षित जनतेने मान्य करता कामा नये. सीताबर्डी ला जगातला कुठलाही मराठी माणूस सीताबर्डीच म्हणेल, मग भले स्पेलिंग सीताबुल्डी असेल. मुंबईतले एक उपनगर (Sion)शींव(शी वर अनुस्वार). याचे स्पेलिंग आपल्या राज्यकर्त्यांनी Sheenv(शीन्व्ह)असे केले असते आणि शींव हा खरा उच्चार बदलला जाऊन तो शीन्व्ह झाला असता. इंग्रजी स्पेलिंग करताना इंग्रजी लिपीच्या त्रुटी लक्षात घेऊन त्या अनुसार स्पेलिंग केले तर त्याचा उच्चार जगभरची इंग्रजी समजणारी माणसे जवळजवळ मुळाबरहुकूम करतील. --J--J १९:३१, २१ सप्टेंबर २००७ (UTC)

महत्वाची घोषणा: ई.स. -> इ.स.

सर्व विकिपीडियन्स,

आपणास कळवण्यास आनंद होत आहे की, सर्व ई.स.क्षक्षक्षक्ष अशा अशुद्ध शीर्षकांची वर्षांची पाने इ.स.क्षक्षक्षक्ष अशा संबंधित शुद्ध शीर्षकांच्या पानांकडे स्थानांतरीत/पुनर्निर्देशित झालेली आहेत. अनेक दिवसांपासून आमचे यासाठीचे प्रयास चालले होते; ते आज पूर्णत्वास गेले आहेत.

यापुढे कोणीही कृपया ई.स. अशा अशुद्ध शीर्षकांमध्ये काहीही योगदान न करता संबंधित इ.स. अशा शुद्ध शीर्षकांच्या लेखांमध्येच योगदान करावे, ही नम्र विनंती. (अन्यथा आम्हास पुन्हा आताप्रमाणेच शुद्धीकरणासाठी सक्रीय व्हावे लागेल :D !)

बाकी हे काम हुऽऽऽऽश्श म्हणण्याएव्हढे होते, हे मात्र खरे. त्यासाठी लागलेला वेळ व संपादनांची संख्या पाहता, सुरूवातीला हे काम हातात घेताना प्रबंधक अभय नातू यांनी म्हटल्याप्रमाणे कोठे हे अर्धवटच राहाते की काय, अशी शंका त्रास देत होतीच. असो, आजघडीला ते पूर्ण झालेले आहे, हे नसे थोडके.

बाकी या संदर्भात मी मध्यंतरी चावडीवर मांडलेला मुद्दा माहितगार वगळता इतर कोणी पाहिला नाही असे वाटते. तो असा की, अनेक ई.स. चे वर्ग पूर्वीच तयार होऊन बसले आहेत. त्यांना आता कोणीच वाली नाही (की ते कोणाचेही वाली होणे नाही!) तद्वत त्यांच्या वगळण्याचा एकमेव मार्ग उरतो. मी हे काम देखील करू शकतो, परंतु त्यासाठी मला सध्या प्रबंधकांचे अधिकार नाहीत.

पुनश्च शुद्धपणा व नेमकेपणा प्रिय असणार्‍या सर्वांचे अभिनंदन; त्यांना (किंवा इतर कोणालाही) आता ई.स. ची चुकीची शीर्षके विनाकारण पाहावी लागणार नाहीत.

श्रीहरि १३:१०, २१ सप्टेंबर २००७ (UTC)

हे फारच मस्त काम झाले. मनापासून धन्यवाद!
(शुद्धपणा व नेमकेपणा प्रिय असणारा) – केदार {संवाद, योगदान} १३:१९, २१ सप्टेंबर २००७ (UTC)

अभिनंदन व धन्यवाद. ई.स.च्या वर्ग सध्या राहू देत. नंतर ते काढता येतील. वर्ग पाने सामान्य वाचकांस सहसा (मुद्दामहून बघायला न गेल्यास) दिसत नाहीत.

अभय नातू १४:१३, २१ सप्टेंबर २००७ (UTC)


आले श्रीहरीच्या मना तेथे काय उणा?

ई.स. चे इ.स. करण्याचे फार मोठे काम अत्यंत चिकाटीने केल्याबद्दल श्रीहरींचे जितके आभार मानावे तितके ते थोडेच आहेत. अनेक दिवस डोळ्यात खुपत असलेला हा शब्द अखेर निकालात निघाला. श्रीहरींचे नुसते अभिनंदनच नव्हे तर सत्कार करायला पाहिजे. आता कुठलेही नवीन पान उघडले की त्याच्या शीर्षकाचे लिखाण तपासण्यासाठी ते चावडीवर ठेवावे. अनेकानुमते पसंती दिसल्यास ते ठेवावे, अन्यथा गरज असेल तर लवकरात लवकर त्या पानाचे योग्य नावाखाली स्थानांतरण करावे.--J ०६:३६, २२ सप्टेंबर २००७ (UTC)

यासाठी चावडीपेक्षा कौलपान अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते. गरज भासल्यास कौलपानांतर्गत शीर्षकतपासणी असे उप-पानही तयार करता येईल.
अभय नातू १५:००, २२ सप्टेंबर २००७ (UTC)
कौल घ्यावा याच्याशी सहमत. पण तो संबंधित पानाच्या चर्चा पानावर घ्यावा. तसेच प्रत्येक शीर्षक कौल घेऊन ठरवणे अनावश्यक आहे. ज्या पानांविषयी वाद असेल त्यांच्यासाठीच कौल घ्यावा.
केदार {संवाद, योगदान} १८:१५, २२ सप्टेंबर २००७ (UTC)

Betawiki: better support for your language in MediaWiki

Dear community. I am writing to you to promote a special wiki called Betawiki. This wiki facilitates the localisation (l10n) and internationalisation (i18n) of the MediaWiki interface. You may have changed many messages here on Wikipedia to use your language for your language profile, but if you would log in to for example the English language Wiktionary, you would not be able to use the interface as well translated as here.

If you wish to contribute to better support of your language in MediaWiki, as well as for many MediaWiki extensions, please visit Betawiki, create an account and request translator priviledges. You can see the current status of localisation of your language on meta and do not forget to get in touch with others that may already be working on your language on Betawiki.

If you have any further questions, please let me know on my talk page on the Dutch Wikipedia. We will try and assist you as much as possible, for example by importing all messages from a local wiki for you to start with.

You can also find us on the Freenode IRC network in the channel #mediawiki-i18n where we would be happy to help you get started.

Thank you very much for your attention and I do hope to see some of you on Betawiki soon! Cheers! Siebrand (Betawiki user page) १७:३१, २६ अगस्त २००७ (UTC)

मूलतत्त्व/मूलद्रव्य

element ला मराठीत मूलद्रव्य हा शब्द अधिक योग्य वाटतो (पाठ्यपुस्तकातही हाच शब्द वापरला जातो) Ajitoke 03:06, 19 डिसेंबर 2006 (UTC)


मलाही हेच म्हणायचे आहे. मूलतत्त्व हा खूप मोठा वर्ग आहे. सर्व ठिकाणी "मूलतत्त्व" काढून "मूलद्रव्य" टाकण्यासाठी काही short cut आहे का?

मी मराठी १४:५६, २४ सप्टेंबर २००७ (UTC)

वर्ग चर्चा:मूलतत्त्व

मूलतत्त्व वर्गातील सर्व पाने मूलद्रव्य वर्गात हलवली आहेत.
जोडप्रश्न - मूलद्रव्य वर्ग बरोबर कि मूलद्रव्ये?
अभय नातू ०१:१०, ७ ऑक्टोबर २००७ (UTC)
वर्ग:मूलद्रव्ये अधिक योग्य वाटते कारण बहुवचनी केल्याने तो एक समूह आहे असे चटकन जाणवते.
सध्या मराठी विकिपीडिया वर दोन्ही प्रकारे वर्ग केलेले आहेत, उदा. वर्ग:पंजाबमधील जिल्हे आहे आणि वर्ग:भारतीय राज्य सुद्धा आहे.
केदार {संवाद, योगदान} १९:२१, ७ ऑक्टोबर २००७ (UTC)
वर्ग:मूलद्रव्ये अधिक योग्य वाटते या केदारच्या मताशी सहमत. वर्गांची नावे अनेकवचनी असावीत, कारण समान गुणधर्म असणार्‍या गोष्टींचा समूह दर्शवण्याकरता वर्गीकरण केले जाते. केदारने सांगितलेल्या दोन उदाहरणांतील वर्ग:भारतीय राज्य हे शीर्षकदेखील चुकले आहे. ते वर्ग:भारतीय राज्ये असे लिहायला हवे. अभय, याकरता सांगकाम्या चालवाल का?
--संकल्प द्रविड ०८:५९, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

वर्ग:मूलद्रव्ये असायला हवे. वर्ग: पंजाबातील जिल्हा हे वाचायला कसेसेच वाटते. भारतीय राज्य हे मुळातच चूक आहे. याचा अर्थ भारताचे राज्य(साम्राज्य?) असा होतो. भारतातील राज्ये असे म्हटले तरच योग्य अर्थ व्यक्त होईल. --J--J १६:०९, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

30,000 mark

Wikimedia news has taken note of Marathi Wikipedia attaing 30,000 total pages that includes all type of discussion and support pages.Also recently we had crossed 1500 membership mark that is 500 users in last seven months since 23rd Feb 2007 how so ever it less by 300 nos compared to my statistical projection of 10% increase every month over previous month.If we see lacks of boys paasing out 12th every year membership figure is too low.

New users please do suggest some new Ideas for increasing membership base.

Compliments to all the contributors.

Thanks and regards


Mahitgar १६:४१, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)

this is really good news. do we have a page where this statistics are shown(which are regularly updated) lets set some target prepare a pending list and workout things within us

सुभाष राऊत 6:41 PM Wednesday (GMT) - Time in GMT

येथे संक्षिप्त माहिती आहे. येथे सर्व भाषांतील तुलनात्मक सांख्यिकी आहे.
अभय नातू २०:३३, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)

we are just about 17 articles less than Sundanese
lets move forward congrats everyone सुभाष राऊत १७:२९, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)

It is also important to maintain the 'quality' of our contributions. One common measure of quality has been defined by meta as depth. It is defined as (# of edits/# of articles) * (# of total pages/# of articles)
Another metric is # of words/bytes per article.
Our current depth is 15, which is quite respectable. We have a low # of words/article, reflecting the many short articles we create.
Nonetheless, it is commendable that only a handful of volunteers working on Marathi wikipedia have been able to hang with the best and enrich the quality and quantity of information here.
Cheers and as Subhash said, let's press on!!
MarathiBot १७:४१, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)
p.s. - I am moving this topic to विकिपीडिया:चावडी/प्रगती, as that is a more appropriate place for progress related discussions.

HELP Needed

Dear Friends

Help / contributions are needed to translate player names and club names in the following article.

२००६ फिफा विश्वचषक संघ

Maihudon १३:११, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

Halant words

मराठी शुद्धलेखन नियम क्रमांक १४ अन्वये अन्‌ हा एकुलता एक शब्द सोडला तर मराठीतला किंवा इतर कोणत्याही भाषेतला कोणताही शब्द मराठीत लिहिताना शेवटच्या अक्षराचा पाय मोडू नये. उदाहरणार्थ:वन्दे मातरम, कुर्यात सदा मंगलम वगैरे वगैरे लिहिणे उचित. मास्टर ऑफ़ आर्ट्‌स साठी एम.ए.(एम्‌.ए. नाही!) पण बॅचलर ऑफ़ लॉज साठी एल्‌एल.बी. पहिल्या ल चा पाय मोडला कारण तो शब्दाच्या शेवटी नाही. तसेच एम.एस्‌सी. त्यामुळे तिरुअनंतपुरम्‌ चालणार नाही. तिरुअनंतपुरम लिहायला पाहिजे. पाय न मोडता देखील मराठी उच्चारपद्धतीनुसार शेवटचे अक्षर हलन्त उच्चारले जाते. हा नियम जर नसता तर प्रत्येक अकारान्त इंग्रजी शब्द मराठीत शेवटच्या अक्षराचा पाय मोडून लिहावा लागला असता. जसे: जॉर्ज्‌, प्रोग्रॅम्‌, व्हाइट्‌ हाउस्‌ इत्यादी.

Transcribed from चर्चा:तिरुअनंतपुरम जिल्हा

MarathiBot १५:४६, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

मराठी विक्शनरीत NavFrame मूळ आकर्षक स्वरूपात येत नाही

विकिपीडियामध्ये NavFrame[१] हा एक अत्यंत उत्कृष्ट वर्ग (class) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो मराठी विक्शनरीत वापरू जाता, त्या मुळ स्वरूपात दर्शनी होत नाही जसा तो इंग्रजी विकिपिडीयामध्ये होतो.

मुळात NavFrame हा वर्ग हा एक धारक वर्ग (Container class) असून इतर मजकूर धारण करण्याची त्याची क्षमता आहे. याचे अधिकचे वैशिष्ट्य म्हणजे यातील घटक लपवता येतात वा दाखवता येतात. म्हणजे जागेच्या उपलब्धतेप्रमाणे व वैयक्तिक गरजेप्रमाणे त्यांना दृश्य वा अदृश्य ठेवता येते. जणू आपण त्यातील घटकांची घडीच करून ठेवत आहोत. त्यामुळे विक्शनरीत आम्ही तो विस्तृत प्रमाणात वापरू इच्छितो. परंतु असणारी एकच अडचण म्हणजे इंग्रजी विकिपिडीयाप्रमाणे येथे तो आकर्षक मूळ स्वरूपात येत नाही. माहितगार तसेच इतर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करू शकली तर मराठी विक्शनरीतील दृश्य भाग देखणा करण्यास हातभार लागेल. समस्येच्या समाधानाची वाट पाहात आहे.

श्रीहरि ०६:५१, १५ ऑक्टोबर २००७ (UTC)


http://en.wikipedia.org/w/index.php?title=MediaWiki:Common.js&action=edit

http://mr.wikipedia.org/w/index.php?title=MediaWiki:Common.js&action=edit

माझ्या मते वरची दोन पाने भिन्न असल्या कारणे हे होत आहे
सुभाष राऊत १९:२९, १५ ऑक्टोबर २००७ (UTC)