गुरू ग्रह

(गुरू या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरू (Jupiter) (किंवा बृहस्पती) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोव्हियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते. गुरू या शब्दाचा अर्थ शिक्षक असाही होतो, तसेच गुरुवार नावाचा आठवड्याचा एक दिवस पण असतो .पासून खगोलशास्त्रज्ञांना गुरू माहीत होता. अनेक संस्कृतींच्या पौराणिक व धार्मिक कथांमध्ये गुरूचा उल्लेख आढळतो. प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव ज्युपिटर याच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव दिले होते. पृथ्वीवरून बघितले असता गुरूची दृश्यप्रत (apparent magnitude) −२.८ पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरू हा चंद्रशुक्रानंतरचा आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह बनतो. (परंतु मंगळाची तेजस्विता त्याच्या कक्षाभ्रमणाच्या काही काळासाठी गुरूपेक्षा जास्त होते).

गुरू ग्रह  
कक्षीय गुणधर्म
इपॉक J2000
अपसूर्य बिंदू८१,६५,२०,८०० कि.मी.
५.४५८१०४ खगोलीय एकक
उपसूर्य बिंदू: ७४,०५,७३,६०० कि.मी.
४.९५०४२९ खगोलीय एकक
अर्धदीर्घ अक्ष: ७७,८५,४७,२०० कि.मी.
५.२०४२६७ खगोलीय एकक
वक्रता निर्देशांक: ०.०४८७७५
परिभ्रमण काळ: ४,३३१.५७२ दिवस
११.८५९२० वर्ष
सिनॉडिक परिभ्रमण काळ: ३९८.८८ दिवस [१]
सरासरी कक्षीय वेग: १३.०७ कि.मी./से.[१]
कक्षेचा कल: १.३०५°
६.०९° सूर्याच्या विषुववृत्ताशी
उपग्रह: ६३
भौतिक गुणधर्म
विषुववृत्तीय त्रिज्या: ७१,४९२ ± ४ कि.मी.[२][३]
पृथ्वीच्या ११.२०९ पट
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: ६.२१७९६ × १०१० कि.मी.² [३][४]
पृथ्वीच्या १२१.९ पट
घनफळ: १.४३१२८ × १०१५ कि.मी.³ [१][३]
पॄथ्वीच्या १३२१.३ पट
वस्तुमान: १.८९८६ × १०२७ किलोग्रॅम [१]
पृथ्वीच्या ३१७.८ पट
सरासरी घनता: १.३२६ ग्रॅ./सें.मी.³ [१][३]
मुक्तिवेग: ५९.५ कि.मी./से.[१][३]
विषुववृत्तावरील परिवलनवेग: ४५,३०० कि.मी./तास
आसाचा कल: ३.१३°[१]
पृष्ठभागाचे तापमान:
   १ बार पातळी
   ०.१ बार पातळी
किमानसरासरीकमाल
१६५ के[१]
११२ के[१]
विशेषणे: जोवियन
वातावरण [१]
पृष्ठभागावरील दाब: २०,२०० पास्कल[५]
स्केल उंची: २७ कि.मी.
संरचना:
८९.८±२.0%हायड्रोजन (H2)
१०.२±२.0%हेलियम
~०.३%मिथेन
~०.०२६%अमोनिया
~०.००३%हायड्रोजन ड्यूटेराइड (HD)
०.०००६%इथेन
०.०००४%पाणी
बर्फ:
अमोनिया
पाणी
अमोनियम हायड्रोसल्फाइड(NH4SH)


गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात [हेलियम]चा बनला आहे. त्याला इतर जड मूलद्रव्यांचा उच्च दाबाखालील खडकाळ गाभा असणे शक्य आहे. गुरूच्या जलद परिवलनामुळे त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्याइतका फुगलेला आहे. गुरूचे बाह्य वातावरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले आहे. यामुळे या विभागांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे गुरूवर दिसणारा प्रचंड लाल डाग. वास्तविकरीत्या हा डाग म्हणजे सतराव्या शतकापासून चालत आलेले एक मोठे वादळ आहे. गुरूच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. गॅनिमिड हा यापैकी सर्वांत मोठा उपग्रह असून त्याचा व्यास बुध ग्रहापेक्षाही जास्त आहे.

आकारमान व वस्तुमान

संपादन

गुरू ग्रह हा पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशातील चौथी ठळक वस्तू आहे. मात्र क्वचित कधीकधी मंगळ गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे. गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या ३१८ पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे. त्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सूर्यमालेच्या उत्क्रांतीवर बराच प्रभाव आहे. उदाहरणार्थ सर्व ग्रहांच्या (अपवाद बुध ग्रहाची कक्षा) या गुरूच्या कक्षेशी मिळत्या जुळत्या आहेत; बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे धूमकेतू हे गुरूभोवती परिभ्रमण करतात; लघुग्रह पट्ट्यामध्ये असणाऱ्या कर्कवुड फटी (Kirkwood gaps) या गुरूमुळेच आहेत. सूर्यमाला निर्मितीनंतर बऱ्याच काळानंतर अंतर्ग्रहांवर झालेल्या अशनी वर्षावाला गुरू ग्रहच कारणीभूत आहे. काहीजण सूर्यमालेचे वर्णन सूर्य, गुरू व इतर तुकडे असे करतात. तर काहीजण त्याला सूर्यमालेचा झाडू म्हणतात.

सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी गुरूला ४३३३ (पृथ्वी-दिवस) लागतात. मात्र त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळही दहा तासांपेक्षा किंचित कमी आहे. इतक्या जास्त वेगाने परिवलन केल्याने त्याच्या विषुववृत्तावर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा पृथ्वीवरून साध्या दुर्बिणीने सहज दिसू शकतो.

गुरू व तपकिरी बटु तारा

संपादन

गुरूसारखा प्रचंड ग्रह व तपकिरी बटु यांच्यातील सीमारेषा पुसट आहे. तपकिरी बटूचा वर्णपट विशिष्ट असा असतो. सध्याच्या व्याख्येनुसार एखाद्या आकाशस्थ गोलाचे वस्तुमान जर गुरूच्या वस्तुमानापेक्षा १२ पट जास्त असले तर ते ड्युटेरियमचे ज्वलन चालू करायला पुरेसे असते. असल्या वस्तूला तपकिरी बटू असे म्हणतात. जर वस्तुमान त्यापेक्षा कमी असेल तर त्या वस्तूला ग्रह म्हणतात. गुरूचा व्यास त्याच्या वस्तुमानाच्या प्रमाणात आहे असे समजले जाते. त्यामध्ये जर अजून वस्तुमानाची भर पडली तर गुरुत्वाकर्षणामुळे तो आकुंचन पावेल व तापमान प्रचंड वाढून त्याचे ताऱ्यात रूपांतर होईल. या विचारामुळे काही खगोलशास्त्रज्ञ त्याला एक अयशस्वी तारा म्हणतात. खरे तर गुरू ग्रह हा तारा होण्यासाठी अजून ७५ पट मोठा असायला हवा होता. लहानात लहान लाल बटू हा गुरूपेक्षा ३० टक्क्याने मोठा असतो. मजेशीर गोष्ट म्हणजे, गुरूला जेवढी उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्यापेक्षा जास्त उष्णता तो उत्सर्जित करतो. ही जास्तीची ऊर्जा "केल्व्हिन-हेम्होल्ट्झ प्रक्रियेद्वारे तयार होते. या प्रक्रियेचा परिणाम म्हणून गुरू दर वर्षी काही मिलिमीटरने आकुंचन पावत आहे. पूर्वी जेव्हा तो तरुण व जास्त गरम होता तेव्हा तो आजच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. शनी ग्रह तर गुरूपेक्षाही मोठा होता. शनीच्या कमी वस्तुमानामुळे कमी गुरुत्वबल व जास्त उष्णता असल्याने हे दोन्हीही ग्रह जास्त फुगले (शनीच्या गाभ्यामध्ये कमी वस्तुमान असल्याने तो जास्त फुगला). सर्वसाधारणपणे गाभ्यामध्ये जितके जास्त वस्तुमान असते तितका तो ग्रह आकाराने लहान असतो.

गुरू ग्रहाची घडण

संपादन

गुरू ग्रहाचा गाभा तुलनेने कमी खडकाळ किंवा कठीण आहे. हा गाभा धातुरूप हायड्रोजनने (Metallic Hydrogen) वेढला गेला आहे. त्याच्यासभोवती द्रवरूप हायड्रोजन असून त्याच्यापलीकडे वायुरूप हायड्रोजनचे आवरण आहे. हायड्रोजनच्या या सर्व अवस्थांमध्ये निश्चित अशी सीमा नाही त्या सर्व एकमेकांमध्ये जसजसे गाभ्याकडे जावे तसतशा वायू ते द्रव व द्रव ते घन याप्रमाणे हलकेच मिसळलेल्या आहेत.गुरू सदैव ढगांनी आच्छादलेला असतो. हे ढग अमोनियाच्या स्फटिकांपासून आणि अमोनियम हायड्रोसल्फेटपासून बनलेले असतात. या ग्रहावर कठीण असा पृष्ठभाग नाही. याच्यावर असणाऱ्या ढगांची घनता जसजसे केन्द्राकडे जावे तसतशी वाढत जाते.

गुरूवरचे वातावरण

संपादन

अणूंच्या संख्येनुसार गुरूचे वातावरण सुमारे ९०% हायड्रोजन व १०% हेलियमने बनलेले आहे. गुरू ग्रहाच्या वातावरणात मिथेन, पाण्याची वाफ, अमोनिया व खडक यांचे अंश आहेत. या व्यतिरिक्त कार्बन, इथेन, हायड्रोजन सल्फाइड, निऑन, ऑक्सिजन, फॉस्फिनगंधक यांचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत. अवरक्त किरणअतिनील किरणांच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासाने बेन्झिन व अन्य कर्बोदक यांचेही अस्तित्व सापडले आहे. हे वातावरण शनी ग्रहाशी अत्यंत मिळतेजुळते आहे. पण युरेनस व नेपच्यून यांचे वातवरण मात्र थोडे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये हायड्रोजनहेलियमचे प्रमाण कमी आहे.

प्रचंड तांबडा डाग

संपादन

गुरू ग्रहावरील सर्वांत परिचित अशी गोष्ट म्हणजे त्यावर असणारा लाल डाग (The Great Red Spot). हा डाग म्हणजे पृथ्वीच्या आकारपेक्षा मोठे वादळ आहे. हा डाग चार शतकांपूर्वी पहिल्यांदा जियोव्हानी कॅसिनीरॉबर्ट हूक यांनी पाहिला. याबाबतचे गणित असे दर्शविते की हे वादळ आता शांत झाले असून तो डाग सदैव या ग्रहावर राहील. इसवी सन २००० साली तीन लहान लाल डाग एकत्र येऊन त्यांचे ओव्हल बीए (Oval BA) नावाच्या मोठ्या डागात रूपांतर झाले. नंतर त्याला लाल रंग येऊ लागला व तो आधीच्या लाल डागांप्रमाणेच दिसू लागला.

गुरूचे कडे

संपादन
 
गुरूचे कडे

गुरूभोवती एक धूसर कडे आहे. त्याचे तीन हिस्से आहेत. आतील हिस्सा हॅलो (halo) नावाचा धुलिकणांचा टॉरस[मराठी शब्द सुचवा], त्यानंतरचे मुख्य तेजस्वी कडे व सर्वांत बाहेरचे "गॉसॅमर" नावाचे कडे.[६] हे कडे धूलिकणांनी बनलेले आहे, तर शनीचे कडे बर्फाचे आहे.[७] मुख्य कडे बहुधा अद्रास्तिआमेटिस या उपग्रहांपासून उत्सर्जित झालेल्या धुळीपासून बनले आहे. उपग्रहावर वापस पडणारे हे धूलिकण व लहान लहान खडक, बहुतकरून, गुरूच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवती फिरू लागतात.[८] याचप्रकारे, थेबे आणि अमाल्थिआ हे उपग्रह गॉसॅमर कड्याचे दोन भिन्न भाग बनविण्यास कारणीभूत आहेत.[८]

नैसर्गिक उपग्रह

संपादन

गुरू ग्रहाला एकंदर ७९ चंद्र आहेत. त्यांपैकी ठळकपणे दिसणारे व गॅलिलियोने शोधलेले चार उपग्रह गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात.

जमिनीवरून दुर्बिणीने केलेले गुरूचे निरीक्षण

संपादन

१६१० मध्ये गॅलिलियोने दुर्बिणीद्वारे आयो, युरोपा, गनिमिडकॅलिस्टो या गुरूच्या चार नैसर्गिक उपग्रहांचा (चंद्रांचा)-गॅलिलियन उपग्रहांचा- शोध लावला. पृथ्वीच्या चंद्राव्यतिरिक्त इतर ग्रहांच्या चंद्रांचे हे पहिले निरीक्षण मानले जाते. मात्र, चिनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेझोंग याच्या मते, गॅलिलियोच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वीच गुरूच्या एका चंद्राचा शोध चिनी खगोलशास्त्रज्ञ गान डे याने इसवी सन पूर्व ३६२मध्ये दुर्बिणीविना लावला होता.[९][१०]

गॅलिलियोचा शोध आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे अवकाशातील सर्व वस्तू फक्त पृथ्वीभोवतीच फिरत नाहीत असे सिद्ध झाले. या शोधामुळे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धान्ताला दुजोरा मिळाला. या सिद्धान्ताप्रमाणे ग्रह पृथ्वीभोवती फिरत नसून सूर्याभोवती फिरतात असे त्याने मांडले होते. गॅलिलियोचा कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला असलेल्या उघड पाठिंब्यामुळे तो संकटात सापडला होता.[११]

इ.स. १६६० मध्ये कॅसिनीने नवीन दुर्बिणीच्या साहाय्याने गुरूवरील डाग व रंगीत पट्टे पाहिले. त्याला असेसुद्धा आढळले की गुरू हा ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. कॅसिनी त्याच्या निरीक्षणांवरून गुरूचा परिभ्रमण काळ काढू शकला.[१२] १६९० मध्ये कॅसिनीला आढळले की गुरूच्या वातावरणाच्या परिवलनाचा वेग गुरूच्या वेगापेक्षा वेगळा आहे.[७]

 
False-color detail of Jupiter's atmosphere, imaged by Voyager 1, showing the Great Red Spot and a passing white oval.

गुरूवरील राक्षसी तांबडा डाग हा १६६४ मध्ये रॉबर्ट हूक व १६६५ मध्ये कॅसिनीने बघितला होता असे मानले जाते, पण याबाबत जाणकारांमध्ये वाद आहेत. ज्ञात माहितीनुसार गुरूच्या राक्षसी तांबड्या डागाचे पहिले चित्र सॅम्युअल हेनरिक श्वाब याने सन १८३१मध्ये बनविले आहे.[१३] हा डाग १६६५ ते १७०८ दरम्यान अनेकदा गायब झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. १८७८ मध्ये तो बराच ठळक बनला तसेच १८८३ आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तो परत फिका होत गेल्याचे नोंदवण्यात आले आहे.[१४]

गिओवानी बोरेली व कॅसिनी या दोघांनीही काळजीपूर्वक गुरूच्या चंद्रांच्या गतीचे तक्ते बनविले होते. त्यांच्या साह्याने चंद्र केव्हा गुरूच्या मागे जातील तसेच केव्हा गुरूच्या पुढे येतील याचे अचूक भाकित करणे शक्य होते. मात्र १६७० दरम्यान जेव्हा गुरू पृथ्वीच्या दृष्टीने सूर्याच्या पलीकडील बाजूला होता तेव्हा असे आढळले, की या नोंदींनुसार केलेली भाकिते प्रत्यक्ष निरीक्षणांपेक्षा १७ मिनिटे मागे होती. ओले रोमर याने असे मांडले की, आपल्याला वस्तू तात्काळ दिसत नाहीत. प्रकाशाला आपल्यापर्यंत यायला काही वेळ लागतो. कॅसिनीने या शोधाचा सुरुवातीला स्वीकार केला नव्हता. मात्र नंतर हा सिद्धान्त वापरून प्रकाशाच्या वेगाचे मापन करण्यात आले.[१५]

१८९२ मध्ये ई. ई. बर्नार्ड याने कॅलिफोर्निया येथील लिक वेधशाळेत गुरूचा पाचवा चंद्र शोधून काढला. हा छोटा उपग्रह शोधून काढल्यामुळे त्याच्या वेधक नजरेचे कौतुक झाले व तो प्रसिद्ध झाला. या चंद्राला नंतर अमाल्थिआ हे नाव देण्यात आले.[१६] प्रत्यक्ष बघून शोधण्यात आलेला हा शेवटचा उपग्रह आहे.[१७] यानंतर व १९७९ मधील व्हॉयेजर १ मोहिमेपूर्वी गुरूचे अजून आठ उपग्रह शोधण्यात आले होते.


गुरूजवळून गेलेली अंतराळयाने

संपादन
गुरूजवळून गेलेली अंतराळयाने
अंतराळयान निकटतम दिन अंतर
पायोनियर १० डिसेंबर ३, १९७३ १,३०,००० कि.मी.
पायोनियर ११ डिसेंबर ४, १९७४ ३४,००० कि.मी.
व्हॉयेजर १ मार्च ५, १९७९ ३,४९,००० कि.मी.
व्हॉयेजर २ जुलै ९, १९७९ ५,७०,००० कि.मी.
युलिसीस फेब्रुवारी १९९२ ४,०९,००० कि.मी.
फेब्रुवारी २००४ २४,००,००,००० कि.मी.
कॅसिनी डिसेंबर ३०, २००० १,००,००,००० कि.मी.
न्यू होरायझन्स फेब्रुवारी २८, २००७ २३,०४,५३५ कि.मी.
 
व्हॉयेजर १ने जानेवारी २४, १९७९ रोजी ४ कोटी कि.मी.वरून घेतलेले गुरूचे चित्र.

१९७३ पासून अनेक अंतराळयाने त्यांच्या प्रवासात गुरूजवळून गेली आहेत. पायोनियर अंतराळयानांनी सर्वप्रथम गुरूची व त्याच्या उपग्रहांची जवळून छायाचित्रे घेतली. या यानांना असे आढळून आले की गुरूपासून अपेक्षेपेक्षा जास्त किरणोत्सार होत आहे. पण दोन्ही याने त्या वातावरणात टिकाव धरू शकली. या यानांच्या कक्षेचा उपयोग जोव्हियन प्रणालीच्या (गुरू व त्याचे उपग्रह) एकत्रित वस्तुमान निश्चित करण्यासाठी करण्यात आला तसेच यानावरून येणाऱ्या रेडिओ संदेशांना होणारा अडथळा मोजून गुरूचा व्यास मोजण्यात आला.[१८]

सहा वर्षानंतरच्या व्हॉयेजर प्रकल्पाने गुरूच्या कड्याचा शोध लावला तसेच गॅलिलियन उपग्रहांबाबत अधिक माहिती पुरविली. या प्रकल्पातील यानांना आयो वर जिवंत ज्वालामुखी सापडले.[१९] यानंतर गुरूजवळून जाणारी मोहिम म्हणजे युलिस्सेस. या मोहिमेतील पहिल्या यानाला सूर्याभोवतीच्या ध्रुवीय कक्षेत टाकण्यासाठी गुरूजवळून नेण्यात आले. यादरम्यान यानाने गुरूच्या चुंबकांबराचा (मॅग्नेटोस्फिअरचा) अभ्यास केला. मात्र यानावर कॅमेरा नसल्यामुळे गुरूची छायाचित्रे काढता आली नाहित. या मोहिमेतील दुसरे यान गुरूपासून बऱ्याच दूरवरून गेले.[२०]

इ.स. २००० मध्ये शनीकडे निघालेले कॅसिनी यान गुरूजवळून गेले. या यानाने गुरूची आतापर्यंतची सर्वांत चांगली छायाचित्रे काढली आहेत. तसेच या यानाने गुरूचा उपग्रह हिमालियाची काहीशी धूसर छायाचित्रेसुद्धा घेतली.[२१] यानंतर प्लूटोकडे निघालेले न्यू होरायझन्स यान गुरूजवळून नेण्यात आले. यादरम्यान प्लूटोकडे फेकण्यासाठी गुरूच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग गोफणीसारखा करून घेण्यात आला. हे यान फेब्रुवारी २८, २००७ रोजी गुरूच्या सर्वाधिक जवळ होते.[२२] यानाने आयोवरील ज्वालामुखींमधून निघणाऱ्या प्लाझ्माचे मोजमाप केले तसेच गॅलिलियन उपग्रह व हिमालियाएलारा या उपग्रहांचे निरीक्षण केले.[२३] जोव्हियन प्रणालीचे निरिक्षण सप्टेंबर ४, २००६ पासून चालू झाले होते.[२४][२५]

गॅलिलियो मोहीम

संपादन
 
कॅसिनीने काढलेले गुरूचे छायाचित्र

गॅलिलियो हे आतापर्यंत सोडण्यात आलेले गुरूभोवती फिरणारे एकमेव अंतराळयान आहे. हे यान गुरूभोवतीच्या कक्षेत डिसेंबर ७,१९९५ रोजी पोहोचले. पुढील सात वर्षे हे यान गुरूभोवती फिरत होते. यादरम्यान यान अनेकदा गॅलिलियन उपग्रह व अमाल्थिया यांच्या जवळून गेले. तसेच यानाला १९९४ मध्ये शुमाकर-लेव्ही ९ धूमकेतू व गुरूची टक्कर बघता आली. जरी या यानाकडून जोव्हियन प्रणालीबद्दल खूप माहिती मिळाली असली तरी यानावरील रेडिओ ॲंटेना योग्यरीत्या चालू न झाल्यामुळे यानाच्या क्षमतेवर काहीशा मर्यादा आल्या.[२६]

जुलै १९९५ मध्ये यानावरून एक प्रोब सोडण्यात आला, जो डिसेंबर ७ला गुरूच्या वातावरणात शिरला. गुरूच्या वातावरणात १५० कि.मी.चा प्रवास करून हा प्रोब गुरूच्या उच्च वातावरणीय दाबाखाली (पृथ्वीच्या २२ पट) आणि तापमानाखाली (सुमारे १५३ °C)नष्ट झाला. त्यापूर्वी त्याने सुमारे ५७.६ मिनिटे माहिती गोळा केली होती.[२७] तो प्रोब बहुधा वितळला असावा किंवा त्याचे बाष्पीकरणसुद्धा झाले असणे शक्य आहे. जेव्हा सप्टेंबर २१,२००३ रोजी यानाला ५० कि.मी. प्रतिसेकंद वेगाने मुद्दाम गुरूच्या वातावरणात ढकलण्यात आले, तेव्हा गॅलिलियो यानाचा अंतही अशाच प्रकारे झाला. यानाची आयोशी होणारी टक्कर टाळण्यासाठी असे करण्यात आले होते. आयोवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे व शास्त्रज्ञांना त्याला हानी पोहोचवायची नव्हती.[२६]

भविष्यातील मोहिमा

संपादन

ध्रुवीय कक्षेतून गुरूचा अभ्यास करण्यासाठी नासा नवीन मोहिमेची आखणी करत होती. या मोहिमेला ज्यूनो हे नाव देण्यात आले असून, त्याच्या यानाचे प्रक्षेपण २०११ मध्ये करण्यात येणार होते. [२८] तसेच गुरूचा उपग्रह युरोपावर द्रवरूप समुद्र असण्याची शक्यता असल्यामुळे नासाने एक मोहीम केवळ यासाठीच नियोजित केली होती. जिमो (ज्युपिटर आइसी मून्स ऑर्बिटर) या नावाचे हे यान २०१२ मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार होते. मात्र ते थोडे जास्तच महत्त्वाकांक्षी ठरवून रद्द करण्यात आले आहे.[२९] युरोपातील जोव्हियन युरोपा ऑर्बिटर मोहीम सध्या विचाराधीन आहे, मात्र त्याच्या प्रक्षेपणाची तारीख अजून ठरविण्यात आलेली नाही.[३०]

गुरूवर जीवसृष्टी असणे शक्य नाही कारण तेथील वातावरणात पाणी नगण्य आहे आणि गुरूचा घन पृष्ठभाग प्रचंड दाबाखाली आहे. १९७६ मध्ये व्हॉयेजर यान सोडण्याआधी कार्ल सागन यांनी अमोनियावर आधारित जीव गुरूवर असण्याची कल्पना मांडली होती; पण यासंबंधी कोणताही पुरावा सापडला नाही.

ट्रोजन लघुग्रह

संपादन
 
गुरूच्या कक्षेतील ट्रोजन लघुग्रह तसेच मंगळ व गुरूमधील लघुग्रहांचा पट्टा

गुरूच्या चंद्रांप्रमाणेच गुरूचे गुरुत्वाकर्षण बल बऱ्याच लघुग्रहांना नियंत्रणात ठेवते. हे लघुग्रह गुरूच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत पुढील व मागील लाग्रांजियन बिंदूंच्या भागांत पसरले आहेत. यांना 'बृहस्पती ट्रोजन लघुग्रह' असे संबोधले जाते. इलियाड या प्राचीन ग्रीक महाकाव्याच्या स्मरणार्थ त्यांचे वर्गीकरण ग्रीक आणि रोमन यांत करण्यात आले आहे. यातील पहिला लघुग्रह ५८८ अकिलीझ मॅक्स वुल्फ यांनी १९०६ साली शोधला. सर्वांत मोठा ट्रोजन लघुग्रह ६२४ हेक्टर हा आहे. सौर मंडळातील सर्वात ज्ञात ट्रोजन गुरू ग्रहाची कक्षा सामाईक करतो. ट्रोजन लघुग्रहांना एल 4 या ग्रीक शिबिरातील आणि एल 5 या रोमन शिबिरातील ट्रोजन कॅम्पांमध्ये विभागण्यात आले आहे. एक किलोमीटरहून मोठे एक दशलक्ष बृहस्पती ट्रोजन अस्तित्वात असल्याचे मानले जाते. त्यांपैकी ७०००पेक्षा अधिक सूचीबद्ध आहेत..

धूमकेतूची धडक

संपादन

जुलै १६ ते जुलै २२, १९९४च्या दरम्यान शुमाकर-लेव्ही ९ धूमकेतूचे ९ तुकडे गुरूच्या दक्षिण गोलार्धाला धडकले. गुरूच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि सूर्यमालेतील त्याच्या आतील स्थानामुळे गुरूवर इतर ग्रहांपेक्षा जास्त धूमकेतूंची धडक होते असे मानले जाते.

मानवी संस्कृतीमध्ये गुरू

संपादन

गुरू ग्रह प्राचीन काळापासून मानवाला ज्ञात आहे. रात्री हा ग्रह दुर्बिणीविना दिसू शकतो तर काही वेळा सूर्य अंधुक असला तर दिवसासुद्धा गुरू दिसतो.[३१] बाबिलोनियन संस्कृतीमध्ये गुरू हा त्यांचा देव मार्दुक याचे प्रतीक मानला जात असे. तसेच गुरूच्या जवळपास १२ वर्षाच्या परिभ्रमणवलन काळाचा उपयोग त्यांच्या राशींशी निगडित नक्षत्रे ठरविण्यासाठी केला जात असे.[३२] [३३]

रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. गुरूचे खगोलशास्त्रीय चिन्ह  , ज्युपिटरच्या हातातील वज्रास्त्र (विजेसारखे दिसणारे अस्त्र, भारतीय संस्कृतीमध्ये इंद्राजवळ वज्रास्त्र होते.) दर्शविते. ग्रीक देवता झ्यूस सुद्धा गुरूशी संबंधित आहे. गुरूसाठी वापरण्यात येणारे झिनो हे विशेषण झ्यूसवरून आले आहे.[३४]

जोवियन हे विशेषणसुद्धा गुरूला लावण्यात येते. भारतीय तसेच पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला प्रमुख स्थान आहे, आनंदी, सुखी असे गुरूचे गुणधर्म ज्योतिषात सांगितले जातात. इंग्रजीमधील जोवियल (jovial) हे आनंदी या अर्थाने वापरण्यात येणारे विशेषण यावरूनच आले आहे.[३५] हिंदू ज्योतिषामध्ये गुरूला बृहस्पती म्हटले जाते. बृहस्पती हा देवांचा शिक्षक होता. त्यावरून या ग्रहाचे नाव गुरू ठेवण्यात आले आहे. गुरूचा दुसरा अर्थ 'जड, वजनदार' असा होतो.[३६]

चिनी, जपानी, कोरियन व व्हियेतनामी संस्कृतीमध्ये गुरूला लाकडांचा तारा (wood star) म्हटले जाते.[३७] हा शब्द चिनी संस्कृतीतील पाच मूलतत्त्वांशी संबंधित आहे. ग्रीक त्याला फेथॉन म्हणत, ज्याचा अर्थ 'दीप्तीमान' (blazing) असा होतो. इंग्रजीतील 'थर्स डे' (Thursday) हे नाव जर्मॅनिक दंतकथेतील थोरवरून आले आहे. ही कथा गुरूशी संबंधित आहे.[३८]

गुरू उदय आणि अस्त

संपादन

वर्षातले काही दिवस (किमान २३ दिवस) आकाशात गुरू दिसत नाही, तेव्हा गुरूचा अस्त झाला असे म्हटले जाते. गुरू परत दिसायला लागला की गुरूचा उदय झाल्याचे सांगितले जाते. हिंदू पंचांगात गुरूच्या उदयास्ताच्या तारखा दिलेल्या असतात. ह्या तारखा मागच्या वर्षापेक्षा साधारणपणे एकेक महिना पुढे गेल्यासारख्या दिसतात. गुरूच्या अस्तकाळात लग्नादी शुभ कार्ये करू नयेत, असे भारतीय ज्योतिषी सांगतात.

गुरूच्या आकाशात न दिसण्याच्या इसवी सन २०११ सालापासूनच्या तारखा पुढीलप्रमाणे :-

 • इ.स. २०११ : २७ मार्च ते २५ एप्रिल.(३० दिवस)
 • इ.स. २०१२ : ३ मे ते २९ मे (२७ दिवस)
 • इ.स. २०१३ : ८ जून ते ३ जुलै (२६ दिवस)
 • इ.स. २०१४ : १२ जुलै ते ५ ऑगस्ट (२५ दिवस)
 • इ.स. २०१५ : १४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर (२५ दिवस)
 • इ.स. २०१६ : १४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर (२४ दिवस)
 • इ.स. २०१७ : १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर (२३ दिवस)
 • इ.स. २०१८ : १५ नोव्हेंबर ते ते ७ डिसेंबर (२३ दिवस)
 • इ.स. २०१९ : १७ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२० (२४ दिवस)

वक्री गुरू

संपादन

गुरू हा वर्षाचे काही दिवस जसा आकाशात दिसत नाही तसाच तो काही काळ मागे-मागे सरकताना दिसतो. या काळाला गुरूचे वक्री असणे म्हणतात. हा काळ एका वर्षात ११८ ते १२४ दिवस असतो.

सिंहस्थ गुरू

संपादन

गुरू सुमारे १२ वर्षांत बारा राशींतून फिरत फिरत सूर्याभोवती एक प्रदक्षणा पुरी करतो. म्हाणजे एका राशीत तो सुमारे ११-१२ महिने असतो. जेव्हा त्याचा मुक्काम सिंह राशीत असतो त्या काळाला सिंहस्थ (पर्व) म्हणतात. या काळात लग्ने करू नयेत असा एक जुना शास्त्रार्थ होता. महाराष्ट्रातले गुरुजी काही पळवाटा शोधून काढून या काळातही काढीव मुहूर्त मिळवून लग्ने लावतात.

सिंहस्थ काळात उज्जैन आणि नाशिक या शहरांत कुंभ मेळा भरतो. जर गुरूने सिंह राशीत वसंत ऋतू सुरू होण्याच्या आधी प्रवेश केला तर उज्जैन येथे, आणि वसंतानंतर उन्हाळ्याच्या सुमारास प्रवेश केला तर नाशिक येथे सिंहस्थ मेळा भरतो. उज्जैनीत/नाशकात असे सिंहस्थ मेळे भरल्याची नोंद असलेली मागील काही वर्षे (इसवी सन) : १६५९ (नाशिक), १६९५, १७३२, १७८९ (नाशिक), १८२६, १८६१ (नाशिक), १८७२ (नाशिक), १८८५, १८९७, १९०९, १९२१, १९३३, १९४५, १९५६-१९५७, १९६९, १९८०, १९९२, २००३ (नाशिक), २००४, २०१५ (नाशिक), २०१६, २०२७ (आगामी-नाशिक)

पहा : बृहस्पती

चांदण्यांची नावे

संदर्भ

संपादन
 1. ^ a b c d e f g h i j Williams, Dr. David R. "Jupiter Fact Sheet". 2007-08-08 रोजी पाहिले.
 2. ^ Seidelmann, P. Kenneth (2007). "Report of the IAU/IAGWorking Group on cartographic coordinates and rotational elements: 2006". Celestial Mechanics and Dynamical Astronomy. 90: 155–180. doi:10.1007/s10569-007-9072-y. 2007-08-28 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
 3. ^ a b c d e Refers to the level of 1 bar atmospheric pressure
 4. ^ NASA: Solar System Exploration: Planets: Jupiter: Facts & Figures
 5. ^ Anonymous (1983). "Probe Nephelometer". Galileo Messenger. NASA/JPL (6). 2007-02-12 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
 6. ^ Showalter, M.A. (1987). "Jupiter's ring system: New results on structure and particle properties". Icarus. 69 (3): 458–98. doi:10.1016/0019-1035(87)90018-2. 2007-08-28 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
 7. ^ a b Elkins-Tanton, Linda T. Jupiter and Saturn. New York.
 8. ^ a b Burns, J. A. (1999). "The Formation of Jupiter's Faint Rings". Science. 284: 1146–50. doi:10.1126/science.284.5417.1146. PMID 10325220. 2007-08-28 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
 9. ^ Xi, Z. Z. (1981). "The Discovery of Jupiter's Satellite Made by Gan-De 2000 Years Before Galileo". Acta Astrophysica Sinica. 1 (2): 87. 2007-10-27 रोजी पाहिले.
 10. ^ Dong, Paul. China's Major Mysteries: Paranormal Phenomena and the Unexplained in the People's Republic.
 11. ^ Westfall, Richard S. "Galilei, Galileo". 2007-01-10 रोजी पाहिले.
 12. ^ O'Connor, J. J.; Robertson, E. F. "Giovanni Domenico Cassini". 2007-02-14 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
 13. ^ Murdin, Paul. Encyclopedia of Astronomy and Astrophysics. Bristol.
 14. ^ "SP-349/396 Pioneer Odyssey—Jupiter, Giant of the Solar System". 2011-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-08-10 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
 15. ^ "Roemer's Hypothesis". 2007-01-12 रोजी पाहिले.
 16. ^ Tenn, Joe. "Edward Emerson Barnard". 2011-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-01-10 रोजी पाहिले.
 17. ^ "Amalthea Fact Sheet". 2007-02-21 रोजी पाहिले.
 18. ^ Lasher, Lawrence. "Pioneer Project Home Page". 2006-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-11-28 रोजी पाहिले.
 19. ^ "Jupiter". 2006-11-28 रोजी पाहिले.
 20. ^ Chan, K.; Paredes, E. S.; Ryne, M. S. "Ulysses Attitude and Orbit Operations: 13+ Years of International Cooperation" (PDF). 2006-11-28 रोजी पाहिले.
 21. ^ Hansen, C. J.; Bolton, S. J.; Matson, D. L.; Spilker, L. J.; Lebreton, J.-P. (2004). "The Cassini-Huygens flyby of Jupiter". Icarus. 172 (1): 1–8. doi:10.1016/j.icarus.2004.06.018.CS1 maint: multiple names: authors list (link)
 22. ^ ""Mission Update: At Closest Approach, a Fresh View of Jupiter"". 2007-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-27 रोजी पाहिले.
 23. ^ ""Pluto-Bound New Horizons Provides New Look at Jupiter System"". 2010-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-27 रोजी पाहिले.
 24. ^ "New Horizons targets Jupiter kick". 2007-01-20 रोजी पाहिले.
 25. ^ Alexander, Amir. "New Horizons Snaps First Picture of Jupiter". 2007-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-19 रोजी पाहिले.
 26. ^ a b McConnell, Shannon. "Galileo: Journey to Jupiter". 2006-11-28 रोजी पाहिले.
 27. ^ Magalhães, Julio. "Galileo Probe Mission Events". 2007-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-02-02 रोजी पाहिले.
 28. ^ "New Frontiers - Missions - Juno". 2011-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-01-02 रोजी पाहिले.
 29. ^ Berger, Brian (February 7, 2005). "White House scales back space plans". 2007-01-02 रोजी पाहिले.
 30. ^ Atzei, Alessandro. "Jovian Minisat Explorer". 2008-05-08 रोजी पाहिले.
 31. ^ Staff (June 16, 2005). "Stargazers prepare for daylight view of Jupiter". 2008-02-28 रोजी पाहिले.
 32. ^ Burgess, Eric. By Jupiter: Odysseys to a Giant. New York.
 33. ^ Rogers, J. H. (1998). "Origins of the ancient constellations: I. The Mesopotamian traditions". Journal of the British Astronomical Association,. 108: 9–28. 2008-04-22 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
 34. ^ उदाहरणादाखल पहा: "IAUC 2844: Jupiter; 1975h". October 1, 1975. 2007-07-29 रोजी पाहिले. That particular word has been in use since at least 1966. See: "Query Results from the Astronomy Database". 2007-07-29 रोजी पाहिले.
 35. ^ "Jovial". 2007-07-29 रोजी पाहिले.
 36. ^ "Guru". 2007-02-14 रोजी पाहिले.
 37. ^ Arnett, Bill. "Planetary Linguistics". 2007-03-08 रोजी पाहिले.
 38. ^ Falk, Michael (1999). "Astronomical Names for the Days of the Week". Journal of the Royal Astronomical Society of Canada. 93: 122–33. 2007-02-14 रोजी पाहिले.