१६१० मध्ये गॅलिलियोने दूर्बिणीद्वारे आयो, युरोपा, गनिमिडकॅलिस्टो या गुरूच़्या चार नैसर्गिक उपग्रहांचा शोध लावला. या उपग्रहांना आता गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. पथ्वीसोडून इतर ग्रहांच्या उपग्रहांचे हे पहिले निरिक्षण मानले जाते. मात्र, चिनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेझोंग याच्या मते, गॅलिलियोच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वीच गुरूच्या एका ग्रहाचा शोध चिनी खगोलशास्त्रज्ञ गान डे याने इसवीसन पूर्व ३६२ मध्ये दूर्बिणीविना लावला होता.[१][२]

गॅलिलियन उपग्रह, या चित्रामध्ये त्यांचा आकार व गुरूवरील राक्षसी तांबडा डाग यांची तुलना केली आहे. चित्रात वरून: कॅलिस्टो,गनिमिड, युरोपाआयो
कॅलिस्टो,गनिमिड, गुरू व युरोपा

संदर्भ संपादन

  1. ^ Xi, Z. Z. (1981). "The Discovery of Jupiter's Satellite Made by Gan-De 2000 Years Before Galileo". Acta Astrophysica Sinica. 1 (2): 87. 2007-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ Dong, Paul. China's Major Mysteries: Paranormal Phenomena and the Unexplained in the People's Republic.