गॅलिलिओ गॅलिली (जन्म १५ फेब्रुवारी १५६४; मृत्यू : ८ जानेवारी १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता.

गॅलिलिओ गॅलिली
Justus Sustermans - Portrait of Galileo Galilei, 1636.jpg
जस्ट्स सुस्टरमान्स याने रंगविलेले गॅलिलिओचे व्यक्तिचित्र
जन्म १५ फेब्रुवारी १५६४
पिसा, टस्कनी, इटली
मृत्यू ८ जानेवारी १६४२
आर्केट्री, टस्कनी, इटली
निवासस्थान टस्कनीची महान डची
कार्यक्षेत्र खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित
कार्यसंस्था पादुआ विद्यापीठ
प्रशिक्षण पिसा विद्यापीठ
ख्याती गतियामिक(Kinematics)
दुर्बीण
सूर्यमाला
वडील व्हिसेन्झो गॅलिलिओ
आई गिउलिया अमानती

जन्म व बालपणसंपादन करा

गॅलेलिओचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे.

शिक्षणसंपादन करा

गॅलिलिओने पहिली चार वर्षे भिक्षूंच्या मठात शिक्षण घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही. शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले.

लंबकाचे घड्याळसंपादन करा

एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलिलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्याने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलिलिओने त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलिओचा दिवा' म्हणून ओळखला जातो.

अध्यापन आणि कौटुंबिक जीवनसंपादन करा

गॅलिलिओचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करे. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गाम्बा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलिलिओच्या आईचे पटत नसे. या काळात गॅलिलिओओला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्यान त्वरण किंवा प्रवेग आणि प्रक्षेपिकी यांवर बरचसे संशोधन केले.

गॅलिलिओचे शोधसंपादन करा

 • गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला.
 • त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
 • पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
 • गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळे लागले.

नवा शोध व मृत्यूसंपादन करा

१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलिओने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हीरो बनला. पण 'या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले. व गॅलिलिलोविरुद्ध खटला चालू झाला. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धान्तांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो.

सन्मानसंपादन करा

गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे.

इप्पर सी मुव्हजसंपादन करा

'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सूर्याभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलिओस स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.[१][२] स्टीफन हॉकिंगच्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलिओच्या स्थानबद्धतेतून आर्चबिशप असकॅनिओ पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेंसच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसऱ्या घरात" स्थानांतरदरम्यान घडली असावी.[३] हे दुसरे घर गॅलिलिओ स्वतःचेच होते.[४] गॅलिलिओ चा शिष्य विन्सेंझो विवियानी यांनी 1655 -1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलीलिओच्या सर्वांत आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील साक्षीमध्ये देखील याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलीलिओसाठी अयोग्य ठरले असते. [५][६] १९११ साली "ई पुर्सी म्यूव्ह" ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली. हे जुल्स वॅन बेले नावाच्या रोझेलर, बेल्जियम येथील एका कला संग्राहकाने विकत घेतले होते. [७] हे चित्र गॅलीलिओच्या मृत्यूच्या एक किंवा दोन वर्षाच्या आत पूर्ण झाले होते कारण त्यावर दिनांक 1643 किंवा 1645 (हा दिनांक अंशतः अस्पष्ट आहे) आहे. हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही कारण हे चित्र गॅलिलिओ एका अंधारकोठडीत चित्रित करते, परंतु तरीही ते चित्र हे दर्शिविते कि "एपपुर सी म्यूव्ह" चा किस्सा काहीश्या बदलाने गॅलिलिओच्या मृत्यूनंतर लगेचच प्रसारित झाला याचा अर्थ असा की ज्यांनी गॅलिलिओला बघितले होते त्यापैकी बरेच जण ह्या सत्याची खातरजमा करण्यासाठी करण्यासाठी तेव्हा जिवंत होते तसेच हे चित्र प्रकाशित होण्याआधी एक शतकाहून अधिक काळ हा किस्सा चर्चेत होता.[८]

गॅलिलिओवरील मराठी पुस्तकेसंपादन करा

 • गॅलिलिओ (द.शि. टकले)
 • गॅलिलिओ गॅलिली - जग बदलणारे १२ जीनियस (संच ). (अच्युत गोडबोले, दीपा देशमुख)
 • दूरदर्शी (माणिक कोतवाल)

संदर्भसंपादन करा

 1. ^ Sedley Taylor, 'Galileo and Papal Infallibility' (Dec 1873), in Macmillan's Magazine: November 1873 to April 1874 (1874) Vol 29, 93.
 2. ^ New Scientist, April 7, 1983. p25.
 3. ^ Hawking, Stephen (2003). On the Shoulders of Giants: The Great Works of Physics and Astronomy. Running Press. pp. 396–7. ISBN 9780762416981.
 4. ^ Magrini, Graziano (1 December 2010). "Villa Il Gioiello". Victor Beard द्वारे भाषांतरित. Institute and Museum of the History of Science, Florence. Archived from the original on 21 May 2015. 14 May 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
 5. ^ Simons, Jay. "Did Galileo Really Say: “And Yet It Moves”?", Retrieved on 1 January 2014.
 6. ^ Hayton, Darin. "Toward a history of “eppur si muove”", Retrieved on 28 May 2017.
 7. ^ Fahie, J.J. (1929), Memorials of Galileo (1564–1642), Leamington and London: the Courier Press, pp. 72–4
 8. ^ Drake, Stillman (2003). Galileo at Work: His Scientific Biography (Facsim. ed.). Mineola (N.Y.): Dover Publications Inc. ISBN 0486495426.