इ.स. १९५०
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ. स. १९५० या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० - १९५१ - १९५२ - १९५३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी
संपादन- जानेवारी १७ - बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.
- जानेवारी २३ - इस्राएलच्या क्नेसेट(संसद)ने राजधानी जेरूसलेम येथे हलविण्याचा प्रस्ताव मान्य केला.
- जानेवारी २५ - भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना
- जानेवारी २६ - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.
मार्च
संपादन- मार्च ८ - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
एप्रिल
संपादन- एप्रिल २७ - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
मे
संपादन- मे १ - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
- मे ५ - भुमिबोल अदुल्यादेज राम नववा या नावाने थायलंडच्या राजेपदी.
जून
संपादन- जून २८ - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.
जुलै
संपादन- जुलै ५ - कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- जुलै ५ - इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- जुलै १२ - रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २० - बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसऱ्याला अज्ञातवासातून परत बोलावले.
- जुलै २० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.
- जुलै २८ - मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
ऑगस्ट
संपादनजन्म
संपादन- जानेवारी ७ - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
- फेब्रुवारी १० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू.
- मार्च ११ - बॉबी मॅकफेरिन, गायक.
- जून ५ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
- जुलै ३ - इवन चॅटफील्ड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै ११ - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १८ - सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
- जुलै २० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.
- ऑगस्ट १६ - जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १७ - नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात
- सप्टेंबर २१ - बिल मरे, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर २४ - मोहिंदर अमरनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू
- सप्टेंबर २९ - डेव्हिड मरे, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
- डिसेंबर १२ - रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड), भारतीय अभिनेता.
मृत्यू
संपादन- मार्च ६ - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा अध्यक्ष.
- मे १६ - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
- ऑक्टोबर २९ - गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
- डिसेंबर ८ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
- डिसेंबर ३१ - वल्लभभाई पटेल, भारतीय उप-पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |