थायलंडचा नववा राम

(राम नववा, थायलंड या पानावरून पुनर्निर्देशित)

भूमिपोन अदुल्यदे (मराठी लेखनभेद: भूमिपोल अतुल्यतेज, भूमिबोल अदुल्यदेज; थाई: ภูมิพลอดุลยเดช ; रोमन लिपी: Bhumibol Adulyadej ; शाही थाई लिप्यंतर: Phumiphon Adunyadet ;) (५ डिसेंबर, इ.स. १९२७ - १४ ऑक्टोबर इ.स. २०१६) हा थायलंडचा राजा होता. सार्वजनिक जीवनात 'महाराज' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या राजाला नववा राम या नावानेही उल्लेखले जाते. ९ जून, इ.स. १९४६पासून राज्यारूढ असलेला नववा राम जगभरातील वर्तमान शासनप्रमुखांमध्ये सर्वाधिक काळ अधिकारारूढ शासनप्रमुख होता. भूमिबोल अदुल्यदेज हा थाई इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ कार्यकाळ असलेला राजा ठरला आहे. त्यांच्या निधनाने एका मोठ्या पर्वाची अखेर झाली, असे मानले जाते.

याच्यानंतर त्याचा मुलगा वज्रालंकरण थायलंडचा राजा झाला.