जानेवारी २७
दिनांक
(२७ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७ वा किंवा लीप वर्षात २७ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनपहिले शतक
संपादन- ९८ - नर्व्हाच्या मृत्युनंतर ट्राजान रोमन सम्राट झाला.
सातवे शतक
संपादन- ६७२ - संत व्हिटालियनने पोपपद सोडले.
नववे शतक
संपादन- ८४७ - सर्जियस दुसऱ्याने पोपपद सोडले.
चौदावे शतक
संपादन- १३४३ - क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढला व त्याद्वारे पास्क्विर क्वेस्नेलच्या १०१ प्रश्नांची निर्भत्सना केली.
सतरावे शतक
संपादन- १६९५ - ऑट्टोमान सम्राट अहमद दुसऱ्याच्या मृत्यु नंतर मुस्तफा दुसरा सम्राटपदी.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२५ - अमेरिकन काँग्रेसने आत्ताच्या ओक्लाहोमा राज्याच्या प्रदेशात ईंडियन प्रभाग तयार केला. यानंतर पूर्व अमेरिकेतील मूळ निवासींना येथे जाण्यास भाग पाडले. याला अश्रूंची वाट हे नाव दिले गेले.
- १८८० - थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतला.
- १८८८ - नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची वॉशिंग्टन डी.सी येथे स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१५ - अमेरिकन सैनिकांनी हैती बळकावले.
- १९२६ - जॉन लोगीबेअर्डने प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - ५० अमेरिकन लढाउ विमानांनी विल्हेम्सहेवन वर बॉम्बफेक केली.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने घातलेला लेनिनग्राडचा वेढा दोन वर्षांनी उठला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रशियाच्या सैन्याने ऑश्विझ कॉंसेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला. येथे नाझींनी अंदाजे १२,००,००० ज्यू व ईतर व्यक्तिंना मारले. पहा ज्यू स्मृति दिन. ७,५०० लोक जिवंत सुटले.
- १९६७ - केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.
- १९७३ - १९७३चा पॅरिसचा तह. व्हियेतनाम युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- १९८३ - जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी)जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला.
- १९९१ - मुहम्मद सियाद बारेने मोगादिशुतून पलायन केले.
- १९९६ - नायजेरिया लश्करी उठाव. कर्नल इब्राहीम बरे मैनास्साराने महामने औस्मानेला पदच्युत केले.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - नायजेरियातील लागोसमधील शस्त्रसाठ्यास आग. १,००० ठार.
- २०१३ - ब्राझिलच्या सांता मरिया, रियो ग्रांदे दो सुल शहरातील किस नाइटक्लबमध्ये आग लागून २३० ठार, १६० जखमी.
जन्म
संपादन- १७५६ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार.
- १८३२ - लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक (टोपणनाव).
- १८५९ - विल्हेम दुसरा, जर्मनीचा कैसर.
- १९२४ - साबु दस्तगीर, भारतीय अभिनेता.
- १९५५ - जॉन रॉबर्ट्स, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश.
- १९६७ - बॉबी देओल, भारतीय अभिनेता.
- १९७४ - चमिंडा वास, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादनप्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - (जानेवारी महिना)