जुलै १८
दिनांक
(१८ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९९ वा किंवा लीप वर्षात २०० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनइ.स.पू. चौथे शतक
संपादन- ३९० - अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
पहिले शतक
संपादन- ६४ - रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
तेरावे शतक
संपादन- १२१६ - ऑनरियस तिसरा पोपपदी.
सोळावे शतक
संपादन- १५३६ - इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३० - उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
- १८५२ - इंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
- १८७३ - ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
- १८९८ - मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
विसावे शतक
संपादन- १९२५ - ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
- १९४४ - जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
- १९६५ - सोवियेत संघाच्या झॉॅंड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६६ - अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना.
- १९६९ - अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
- १९७६ - ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
- १९७७ - व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९८२ - प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
- १९८४ - सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
- १९९४ - बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
- १९९५ - कॅरिबिअन समुद्रातील मॉंतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
- १९९६ - कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
- १९९८ - पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
- २०१३ - अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले.
जन्म
संपादन- १५५२ - रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८११ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- १८४८ - डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९० - फ्रॅंक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
- १९०९ - आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१८ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२१ - जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४९ - डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५० - सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
- १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
- १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १६२३ - पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १८६३ - रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
- १८७२ - बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९२ - थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
- १९६९ - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
- १९९० - यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१२ - राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- संविधान दिन - उरुग्वे.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - (जुलै महिना)