गॉल
गॉल, श्रीलंका याच्याशी गल्लत करू नका.
गॉल (लॅटिन: Gallia, फ्रेंच: Gaule) हा लोह युगादरम्यानचा पश्चिम युरोपातील एक प्रदेश होता. सध्या ह्या भूभागावर फ्रान्स, स्वित्झर्लंड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स व जर्मनी ह्या देशांचे शासन आहे. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकामध्ये गॉल साम्राज्याने यशाचे शिखर गाठले. परंतु इ.स. पूर्व दुसऱ्या व पहिल्या शतकामध्ये रोमन साम्राज्याने गॉलसोबत युद्ध केले व संपूर्ण गॉल प्रदेशावर सत्ता स्थापन केली. रोमनांनी गॉलवर सुमारे ५ शतके राज्य केले.
गॉल प्रदेशामधील लोक गॉलिक भाषा (सेल्टिक भाषासमूहामधील एक लुप्त झालेली भाषा) वापरत असत.