जुलै ११
दिनांक
(११ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९२ वा किंवा लीप वर्षात १९३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनचौदावे शतक
संपादनपंधरावे शतक
संपादनसोळावे शतक
संपादन- १५७६ - मार्टिन फ्रोबिशरला लांबून ग्रीनलॅंडचा किनारा दिसला.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८०४ - अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.
- १८११ - इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.
- १८५९ - चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
- १८८९ - मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१९ - नेदरलॅंड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
- १९२१ - मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.
- १९४० - हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५५ - अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
- १९५७ - करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.
- १९६० - हार्पर लीची टु किल ए मॉकिंगबर्ड ही कादंबरी प्रकाशित झाली.
- १९७१ - चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९७३ - ब्राझिलचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिस ओर्लि विमानतळावर कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.
- १९७५ - चीनमध्ये इ.स.पू. तिसऱ्या शतकातील चीनी मातीच्या ६,००० मुर्ती असलेली दफनभूमी सापडली.
- १९७८ - स्पेनमध्ये प्रवाहीकृत वायू घेउन चाललेल्या ट्रकला अपघात. २१६ ठार.
- १९७९ - अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.
- १९८२ - फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.
- १९८३ - इक्वेडोरमध्ये बोईंग ७२७ प्रकारचे विमान कोसळले. ११९ प्रवासी ठार.
- १९९१ - नायजेरिन एरवेझने भाड्याने घेतलेले नेशनएरचे डी.सी.८ प्रकारचे विमान जेद्दा येथे कोसळले. २६१ प्रवासी ठार.
- १९९५ - अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.
- १९९५ - स्रेब्रेनिकाची कत्तल - युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.
- १९९५ - क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.
- २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.
- २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- ४७२ - ॲंथेमियस, पश्चिम रोमन सम्राट.
- ९३७ - रुडॉल्फ दुसरा, बरगंडीचा राजा.
- ११७४ - अमाल्रिक, जेरुसलेमचा राजा.
- १६८८ - नराई, सयामचा राजा.
- १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.
- १९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटिश अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- जागतिक लोकसंख्या दिन - संयुक्त राष्ट्रे.
- नाडम - मंगोलिया.
- राष्ट्रीय समुद्री दिन - चीन.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - (जुलै महिना)