जॉन क्विन्सी अॅडम्स
(जॉन क्विन्सी ऍडम्स या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन क्विन्सी अॅडम्स (इंग्लिश: John Quincy Adams ;) (११ जानेवारी, इ.स. १७६७ - २३ फेब्रुवारी, इ.स. १८४८) हा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८२५ ते ४ मार्च, इ.स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तो संघवादी, डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन, राष्ट्रीय रिपब्लिकन, प्रतिमॅसोनिक व व्हिग या पक्षांचा सदस्य होता. अमेरिकी सेनेट व प्रतिनिधीगृह अशा दोन्ही सभागृहांत त्याला सदस्यत्वाची संधी मिळाली. अमेरिकेचा परदेशांतील वकील व राजदूत पदांचीही धुरा त्याने सांभाळली. अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडम्स व त्याची पत्नी आबिगेल अॅडम्स यांचा तो पुत्र होता.
जॉन क्विन्सी अॅडम्स | |
सही |
---|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ७, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- अॅडम्स नॅशनल हिस्टॉरिकल पार्क - अॅडम्स याला समर्पित राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यानाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |