अलेक्झांडर हॅमिल्टन

अलेक्झांडर हॅमिल्टन (इंग्लिश: Alexander Hamilton; ११ जानेवारी १७५५ किंवा १७५७ - १२ जुलै १८०४) हा अमेरिका देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रपित्यांपैकी एक मानला जातो. अमेरिकेचे संविधान लिहिण्यामध्ये व अमेरिकेची अर्थसंस्था निर्माण करण्यामध्ये त्याचे प्रमुख योगदान होते.

अलेक्झांडर हॅमिल्टन
अलेक्झांडर हॅमिल्टन


अमेरिकेचा पहिला अर्थसचिव
कार्यकाळ
११ सप्टेंबर १७८९ – ३१ जानेवारी १७९५
राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन
मागील पदनिर्मिती
पुढील ऑलिव्हर वॉलकॉट, ज्यु.

जन्म ११ जानेवारी १७५५ किंवा १७५७
चार्ल्सटाउन, नेव्हिस
मृत्यू १२ जुलै १८०४
न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क
राजकीय पक्ष फेडरलिस्ट पार्टी
सही अलेक्झांडर हॅमिल्टनयांची सही

अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी होणारा हॅमिल्टन देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनच्या मंत्रीमंडळामध्ये पहिला अर्थसचिव बनला. त्याने अमेरिकेची आर्थिक धोरणे ठरवली.

११ जुलै १८०४ रोजी तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष अ‍ॅरन बर ह्याच्यासोबत झालेल्या द्वंद्वयुद्धामध्ये हॅमिल्टनचा मृत्यू झाला.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: