सोव्हियेत संघ
सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा १/३ भाग आणि युरोप खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या. हा देश पूर्व-पश्चिम सुमारे ६,२१५ मैल आणि उत्तर-दक्षिण सुमारे ३,११० मैल पसरलेला होता. पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या १/६ भागात सोवियेत संघ पसरलेला होता.
सोव्हियेत साम्यवादी गणराज्यांचा संघ Союз Советских Социалистических Республик Union of Soviet Socialist Republics | ||||
|
||||
|
||||
![]() |
||||
राजधानी | मॉस्को | |||
अधिकृत भाषा | रशियन | |||
इतर भाषा | अनेक | |||
राष्ट्रीय चलन | सोव्हियेत रुबल | |||
क्षेत्रफळ | २,२४,०२,२०० चौरस किमी | |||
लोकसंख्या | २९,३०,४७,५७१ |
भूरचना आणि वनस्प्तीच्या दृष्टीने सोवियेत संघाचे चार भाग पडत. अती उत्तरेच्या फिनलंडच्या सीमेपासून आर्क्टिक समुद्राच्या किनाऱ्याने बेरिंग समुद्रापर्यंत पसरलेला टुंड्राचा बर्फाच्छादित प्रदेश ज्यात मुख्यत्वे पाणथळ भाग, दलदलीचा प्रदेश, शेवाळे आणि खुरटी झुडपे यांचे साम्राज्य होते. या भागात मनुष्य वसाहत कमी होती. टुंड्रा प्रदेशाच्या दक्षिणेला तैगाचा अणकुचीदार वृक्षांचा, जंगलाचा प्रदेश होता. हा प्रदेश जगातील सगळ्यात मोठा, सलग अरण्यमय म्हणून ओळखला जात असे. सोवियेत संघातील महत्त्वाची शहरे मॉस्को (उच्चार मस्क्वा), क्यीव (उच्चार कीएव) या भागात होते.
तैगाच्या दक्षिणेस एल्म, ओक या झाडांसह लाकडाची विपुल संपत्तीचा, सुपीक जमिनीचा प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठा, सलग, लागवडीखालचा प्रदेश अशी याची ओळख. विविध प्रकारचे कारखने, उद्योग धंदे या भागात होते. या सुपीक भागाच्या दक्षिणेला कोरड्या हवामानाचा, वाळवंटी प्रदेश होता. या भागात अनेक्दा अवर्षण, दुष्काळ असे. येथील प्रमुख पीके तंबाखू, चहा, ऊस, अंजीर, अक्रोड, बांबू, लवंग, निलगीरी ही होती. सोवियेत संघ खूप मोठा देश होता तरी एकूण उपलब्ध क्षेत्राच्या केवळ १/३ जागा लागवडी योग्य होती.
साम्यवाद |
सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेना व अमूर या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील द्विना नदीद्वारे बाल्टिक समुद्र, द्नीपर व डॉन या नद्यांद्वारे काळा समुद्र आणि अझोव समुद्र, वोल्गा नदीने कास्पियन समुद्र तर उत्तरेकडील नद्यांद्वारे श्वेत समुद्र जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते.
आर्क्टिक समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला कास्पियन समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. सैबेरियातील बैकाल सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर ठरते.
विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हर्कोयान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला कॉकेशस पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच पामीर, तिआनशान आणि अलताई पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोवियेत संघाचे विभाजन करणार्या उरल पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोवियेत संघास लाभल्या होत्या.
१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोवियेत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील रशिया राज्य सगळ्यात मोठे होते, सोवियेत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोवियेत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटाचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म ऑर्थोडोक्स ख्रिश्चन हा होता. तीन गटात मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) ग्रेट रशियन्स - रशियात राहणारे, (२) लिटल रशियन्स - युक्रेन मध्ये राहणारे, (३) व्हाईट रशियन्स - बेलोरशियात राहणारे असे प्रमुख लोक राहत.
गणराज्येसंपादन करा
सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. १९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |