बेलारूस

पूर्व यूरोपामधील एक भूपरिवेष्टित देश
(बेलोरशिया या पानावरून पुनर्निर्देशित)


बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बेलारूस
Рэспубліка Беларусь
बेलारूसचे प्रजासत्ताक
बेलारूसचा ध्वज बेलारूसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Дзяржаўны гімн Рэспублікі Беларусь
(आम्ही बेलारूसी)
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे स्थान
बेलारूसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मिन्‍स्‍क
अधिकृत भाषा बेलारूशियन, रशियन
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अलेक्झांडर लुकाशेन्को
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (सोव्हिएत संघापासून)
जुलै २७, १९९० (घोषित)
ऑगस्ट २५, १९९१ (स्थापना) 
क्षेत्रफळ
 - एकूण २,०७,५९५ किमी (८५वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 - २००९ ९६,४८,५३३[] (८६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३०.७८० अब्ज[] अमेरिकन डॉलर (६४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १३,८६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३२[] (उच्च) (६१ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बेलारूशियन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी +२/+३)
आय.एस.ओ. ३१६६-१ BY
आंतरजाल प्रत्यय .by
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेतीउत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.