लवंग
लवंग ही भारतात तसेच आग्नेय आशियात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे बी विडयाचे पानातील एक घटक आहे.
वर्णन
संपादनलवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. लवंगाचे फुल निळसर तांबडे असते. तेच वाळून लवंग म्हणून बाजारात आणतात. याला साधारण नऊ वर्षांनी फुले येतात.लवंग स्वयपाकात व मसाल्यात वापरले जातात .
औषधी उपयोग
संपादनडोके दुखत असल्यास लवंगाचा लेप लावतात. मुखरोगात लवंग तोंडात धरून चघळावी. दम, खोकला, आम्लपित्त यांवर लवंगाचा उपयोग होतो. खोकला व सर्दी यांवर लवंगाचा काढा करून त्यात मध घालून दयावा. कप मोकळा होतो. लवंगापासून लवंगादी वटी , लवंगोदक, लवंगादी चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण ही औषधे बनवतात. ईतर उपयोगः लवंगाचा उपयोग जेवणात, मसाल्याच्या पदार्थात, साखर भात तयार करताना, विडा लावताना केला जातो. अशा या बहुगुणी लवंगाची लागवड मलाया, सैलिबीस बेटांवर मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात केरळ, तसेच दक्षिण भारतात त्रावणकोरमध्ये याची लागवड केली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |