वोल्गा नदी
(वोल्गा या पानावरून पुनर्निर्देशित)
व्होल्गा (रशियन: Во́лга) ही रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही युरोपातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हणले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे व्होल्गोग्राद शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे.
वोल्गा | |
---|---|
उल्यानोव्स्क शहारातून वाहणारी व्होल्गा नदी | |
उगम | त्वेर ओब्लास्त, रशिया |
मुख | कॅस्पियन समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | ३,६९२ किमी (२,२९४ मैल) |
उगम स्थान उंची | २२५ मी (७३८ फूट) |
सरासरी प्रवाह | ८,०६० घन मी/से (२,८५,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १३,८०,००० |
उपनद्या | कामा नदी, ओका नदी |
रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी कास्पियन समुद्राला मिळते.
मोठी शहरे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- पाणलोट खोरे Archived 2005-09-24 at the Wayback Machine.
- फोटो[permanent dead link]