समारा (रशियन: Самара) हे रशिया देशाच्या समारा ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. समारा शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा व समारा नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.७ लाख लोकसंख्या असलेले समारा रशियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

समारा
Самара
रशियामधील शहर


Flag of Samara (Samara oblast).png
ध्वज
Coat of Arms of Samara (Samara oblast).png
चिन्ह
समारा is located in रशिया
समारा
समारा
समाराचे रशियामधील स्थान

गुणक: 53°12′10″N 50°8′27″E / 53.20278°N 50.14083°E / 53.20278; 50.14083

देश रशिया ध्वज रशिया
विभाग समारा ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५८६
क्षेत्रफळ ५४१.३८ चौ. किमी (२०९.०३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,७१,५९८
  - घनता २,१६४ /चौ. किमी (५,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ समारा प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

१९३५ ते १९९१ दरम्यान ह्या शहराचे नाव कायबिशेव असे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याची सोव्हिएत संघात आगेकुच सुरू असताना १९४१ साली देशाची राष्ट्रीय राजधानी मॉस्कोहून तात्पुरती कायबिशेवला हलवली गेली होती. जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यानंतर ती पुन्हा मॉस्कोला नेण्यात आली.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: