पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता

संपादन

नमस्कार Ajaygodbole,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.




हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
विकिपीडिया मदतचमू ~~~~

मार्गदर्शन विनंती

संपादन

नमस्कार अजय,

आपण मराठी विकिपीडियात जी काही थोडी संपादने केली ती मी पाहिली आहेत. आपण ऑक्टोबर २८ लेखात अशोक चव्हाणांचे नाव भरण्याचा प्रयत्न केला तो सुयोग्यच होता थोडी शुद्धलेखनाची आवशकता होती ते मी मागेच करून दिले आणि अशाच सहयोगी पद्धतीने आपला विकिपीडिया पुढे जातो आहे.

आपण येथे सध्या उपलब्ध असलेले लेख पाहू शकता, सध्या उपलब्ध लेखात काही भर आणि सुधारणा सुरवातीस केल्यास विकिपीडीया भाषा आणि लेखन शैलीचा सराव होण्यास मदत होईल . आपल्या मराठी विकिपीडियावर बर्‍याच क्रिडा मालिकांच जवळपास रियल टाईम लेखन केल गेले आहे , त्या कार्याचा मुख्य मान सदस्य:Maihudon (चर्चा) यांच्याकडे जातो त्यांनाही आपण शंका विचारू शकता. मराठी विकिपीडियाला हवे असलेले क्रीडा विषयक लेख पहावे व त्यात काही लेखन योगदान देऊ शकाल तर स्वागतच आहे. त्या शिवाय क्रीडा विषयक लेखांकरिताच्या समन्वयाकरिता अभिप्रेत असलेल्या विकिपीडिया:क्रीडा प्रकल्पासही आकार देण्यास सहकार्य हवे आहे.

माझे स्वतची पार्श्वभूमी वानीज्य शाखीयच असून व्यवस्तापन क्षेत्रात कारकिर्द घडवत आहे. विकिपीडिया:व्यवसाय प्रकल्पा करिता आपण लेखन करू शकला तर आपल्या वाणीज्य शाखीय ज्ञानाचातर इतरांना उपयोग होईलच सोबत व्यवस्थापन विषयक लेखात योगदान केल्यास करियरच्या दृष्टीनेही आपल्यालाही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष निश्चित ऊपयोगी होईल असा विश्वास वाटतो. मला स्वतःलाही व्यवस्थापन विषयक लेखात योगदान करण्याची इच्छा आहे पण येथे नवीन येणार्‍र्या मंडळींकरिता सहाय्य्य उपलब्ध करून देताना स्वतंत्र पणे वेळ देणे होत नाही आहे त्या मुळे फुल नाही फुलाची पाकळी तरी याही संदर्भात योगदान करण्याचा विचार करावा अशी नम्र विनंती आहे.

ऐतिहासिक क्षेत्रात सदस्या Priya_v_p यांनी केलेले योगदान उल्लेखनीय आणि आपल्याला वाचण्यास आवडेल.बरेच सदस्य किल्ले विषयक माहिती वाढवत आहेत. मराठी साहित्य विषयक खूप सगळी माहिती उपलब्ध करणे बाकी आहे. दालन:महाराष्ट्र पर्यटन बद्दल त्याच्या चर्चा पानावर मूल्यांकन करून हवे आहे.
आपण फायरफॉक्स वापरण्या बद्दल कंफर्टेबल असल्यास त्याचा विकएडीट 1.4.0 हा addon वापरण्याबद्दल जरूर विचार करावा.

गूगल फाँट मी टेस्टींगपूरताच वापरला आहे त्या संदर्भाने काही अडचणी जाणवल्यास जरूर नमुद कराव्यात. विकिबुक्स सहप्रकल्पात सहाय्य पुरवण्याकरिता कुणी उपलब्ध नसल्यामुळे त्या संदर्भातील शंकाही सध्या येथे विचारण्यास हरकत नाही

अजूनही काही शंका जाणवल्यास अशाच मनमोकळे पणाने मांडाव्यात.

माहितगार १५:१६, २२ डिसेंबर २००९ (UTC)