विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)











तुम्हाला माहित आहे का,कि विकिपीडियाचे तुम्ही रात्रं-दिवस जरी वाचन चालू ठेवले तरी तो कधी वाचून पूर्ण होणार नाही एवढी माहिती येथे उपलब्ध आहे.मराठी विकिपीडिया पण खूप उपयूक्त माहिती पुरवतो आणि तुम्हाला तो आवडला असेल तर त्याच्या बद्दल इतरांनाही सांगायलाच हवे.विकिपीडिया तुमचा स्वतःचाच आहे आणि त्याबद्दल तुम्ही स्वतः नाही बोलणार तर कोण बरे बोलणार ? आणि त्याकरिता आम्हाला तुमच्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात जर दर वर्षी किमान पाच लाख मुले बारावीची परिक्षा देतात यातील बरेच जण पुढे विवीध स्पर्धात्मक परिक्षांना बसतात, तर त्यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाची माहिती पोहचायला नको का? त्या करिता तुमच्या इमेल आणि वेबसाईट द्वारे प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पोहोचा.मराठी विकिपीडियात प्रत्येक मराठी माणसाला आमंत्रित करा. जे लोक आंतरजालावर येत नाहित त्यांच्या पर्यंत माहिती महाविद्यालये,वाचनालये,दिवाळी अंक,साप्ताहीके,वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्र वाहिन्यांद्वारे पोहोचहवण्यास सहकार्य करा.

हे करणे सोपे जावे म्हणून विवीध प्रकारचे सहाय्य आणि दुवे या पानावर ऊजवीकडील सुचालनात उपलब्ध केले आहेत.

करावयाच्या गोष्टींची यादी

संपादन

 तुम्ही काय करू शकता