विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १९
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
मराठीकरण
संपादनविमान तांत्रिक माहिती या साच्यातील इंग्लिश शब्दांना मराठी शब्द सुचवा.
अभय नातू ०३:५७, ५ ऑक्टोबर २००८ (UTC)
- माहितीचौकट विमान हा साचा आहे पण त्यात तांत्रिक माहिती नाही.
- अभय नातू ०३:२०, ६ ऑक्टोबर २००८ (UTC)
जर्मन नावांचे अचूक लेखन
संपादनजर्मन आडनावांमध्ये बरीच नावे 'e'ने संपणारी असतात. जसे Goethe, Bothe, von Laue वगैरे. यांचा चूक जर्मन उच्चार ग्यॉथऽ, बोथऽ, फोन लाउअ असा लिहिता येईल. कारण जर्मन भाषेत शेवटच्या व्यंजनापुढे 'e' आल्यास त्याचा जाणवण्याजोगा दीर्घ अकारयुक्त उच्चार होतो. देवनागरी लिपीनुसार दीर्घ उच्चार दाखवायला अवग्रह वापरले जातात; त्यामुळे मुख्य शीर्षके अशी अवग्रहयुक्त लिहायला अडचण नाही. पण एरवी लिहिताना ही अचूकता बर्याच जणांकडून अजाणतेपणी पाळली जाणार नाही. त्याकरता मराठीत आढळणार्या तीनही पद्धती - बोथ, बोथा, बोथे - ग्राह्य मानाव्यात का असा प्रश्न आहे.
तुम्हाला काय वाटते?
--संकल्प द्रविड (चर्चा) ०३:०२, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)
- यात अजून काही उपनियम आहेत काय? उदा. Goetheचा उच्चार ग्योथे असा असल्यासारखा वाटतो तर Botheचा उच्चार बोथा सारखा भासतो. उपांत्य व्यंजनावरुनही अंतिम स्वरांत उच्चार ठरतो का?
- अभय नातू ०३:१२, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)
हिंदी विकिवर हिंदीमध्ये लिहिता येते मग मराठी विकिवर का येत नाही?
संपादनहिंदी विकिवर हिंदीमध्ये लिहिता येते मग मराठी विकिवर का येत नाही?
मी हे लिहिलेली तक्रारही इतर ठिकाणी टाईप करून मगच चिकटवू शकलो आहे. येथे मराठीचा 'कि बोर्ड' न लावणे याचे कारण काय आहे हे कळेल का?
मराठीत लिखाण करता आल्याशिवाय हा विकिपिडिया कसा वाढावा? जर मला एखाद्या लेखात काही अजून सुधारणा करायची असली तर मी ती जागीच मराठीतच करू शकलो पाहिजे असे वाटते.
मराठी भाषेत येथे टाईप करता न येणे हेच मराठी विकिपिडियाच्या अपयशाचे मुख्य कारण आहे.
- याची अनेक कारणे आहेत व त्यांची चर्चा अनेक वेळा झालेली आहे.
- जर तुम्हाला येथे टाइप करायचे असेल तर त्यासाठीची जावास्क्रिप्ट तुमच्या सदस्य monobook.js मध्ये डकवा. यासाठी मदत हवी असेल तर येथे कळवा, पण त्यासाठी सदस्यत्व घ्या.
- मराठी भाषेत येथे टाईप करता न येणे हेच मराठी विकिपिडियाच्या अपयशाचे मुख्य कारण आहे.
- अपयश??!!!
- अभय नातू ०५:५०, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)
Please guide me in inserting this script. I also support the idea of similar edit-window like the Hindi wiki.
Marathi Wiki is not a failure neither its a huge success. Our contents are much better than the Hindi or Telugu, who has higher number of articles than us. But I observed that hidi wiki's quality increased drastically once they had this beta devnagri script.
Having this beta script will be beneficial, rather I doubt its failure.
अजयबिडवे ०९:४५, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)
मराठी कळपट
संपादन- प्रचालक कोल्हापुरी यांनी मराठी विकिपीडियावर देवनागरी कळपटाची चाचणी घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याला विरोध असल्यास येथे लगेच कळवावा. हा कळपट बसवून त्याची प्राथमिक चाचणी घेण्याचे काम मी (किंवा इतर प्रचालक) उद्या रात्री (ऑक्टो. १७) सुरू करेन व सगळे व्यवस्थित असता हा कळपट ऑक्टो. १८च्या सुमारास उपलब्ध होईल.
- हा कळपट सर्वगुणसंपन्न नाही. त्यातील त्रुटी येथे जरुर उद्धृत कराव्यात. शक्य असतील त्या दुरुस्त करण्यात येतील.
- जर काही काळाने (३-४ आठवडे) असे आढळले की या कळपटाची मदत होण्याऐवजी त्याचा अडसरच होत आहे तर तो काढून घेण्यात येईल. जर उपयोगी ठरत असला तर उत्तमच.
- येथील इतर सदस्यांपैकी कोणी जावास्क्रिप्टमध्ये पारंगत असतील तर त्यांनी येथे किंवा कोल्हापुरींशी संपर्क साधावा म्हणजे जरुरी दुरुस्तींचे काम पटापट होईल.
- अभय नातू १५:२३, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)
पाठिंबा अजयबिडवे १६:०५, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)
मराठी कळपट - dhanyavad ani पाठिंबा
संपादनपाठिंबा पाठिंबा पाठिंबा!!! tvarene he ghadavalya baddala mee aapalaa aabhari ahe. taseca tamam marathi bhaashikahi abhari asateel. ushiraa ka hoina pan marathichi vatachal jomane suru hoil.
मराठी कळपट
संपादनमराठी विकिपीडियावर आता जावास्क्रिप्टद्वारे मराठीत लिहिण्याची सोय एक तासापूर्वी मी घातली आहे. यासाठी कोल्हापुरींना धन्यवाद.
जर तुमचे monobook.js पान तयार केले गेलेले नसेल (बहुतांशी सदस्यांचे नसतेच.) तर संपादनपेटीत टंकन केल्यास आपोआप देवनागरी अक्षरे उमटतील.
रोमन अक्षरे टंकित करण्यासाठी एकदा एस्केप कळ दाबा. (ही कळ दोनदा त्वरेने दाबली गेल्यास काही विचरकांत तुमचे सगळे टंकन नाहीसे होईल) किंवा संपादनचौकटीच्या वरील देवनागरीत लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा.(परीक्षणकाल) लिपी बदलण्यासाठी Esc दाबा, (IE मध्ये Esc नंतर Ctrl+z दाबा.) हा चेक-बॉक्स रिकामा करा. परत देवनागरी लिहिण्यासाठी एकदा एस्केप दाबा (किंवा वरील प्रमाणे चेक-बॉक्स वर टिचकी मारा)
ज्या सदस्यांना ही सोय नको असेल त्यांनी आपले <सदस्यनाव>/monobook.js हे पान तयार करा व तेथे पूर्वीची जावास्क्रिप्ट घाला. याचे उदाहरण माझ्या मोनोबूक मध्ये आहे.
आधी लिहिल्याप्रमाणे त्रुटी येथे कळवा, शक्य तर दुरुस्तही करा.
ही सोय केल्यावर आधीच्या टंकन पद्धती (बराहा-ऑनलाईन, विन्डोझ/लिनक्स-अंतर्गत देवनागरी टंकनसुविधा, इ.) अजूनही उपलब्ध आहेतच.
देवनागरीत लिहिणे सोपे झाल्यामुळे आता तोडफोड(vandalism) आणि drive-by changes सुकर होतील, तरी सर्व सदस्यांनी या उपद्व्यापंकडे लक्ष द्यावे ही विनंती.
अभय नातू १६:५८, १७ ऑक्टोबर २००८ (UTC)
- ता.क. हे पहा -- विकिपीडिया:Input System
आज आलो तर चक्क मराठीत टायपिंग!!! वा! विकि फार सोपा वाटतो आहे लिहायला. धन्यवाद!
- मराठी कळपट
मराठी विकिवर मराठी कळपट आल्याने एकुणच लेख व संपादने यांचा वेग वाढला आहे असे वाटते. या मराठी कळपट आता कायम स्वरूपी येथेच रहावा अशी सदिच्छा!
एकेकाळी मराठी आणि हिंदी विकिमध्ये फक्त हजार लेखांचा फरक होता परंतु हिंदी विकिने देवनागरी कळपट आधीच लावल्याने, व तेथे सदस्यही अधिक असल्याने आता तो फरक दोन हजारांवर गेला आहे. आशा आहे की आपण लेखांच्या बाबतीत किमान हिंदी विकि ला तरी लवकरच गाठू शकू.
तसेच संपादने करणे सोपे झाल्याने मराठी लेखांची गुणवत्ताही चांगलीच होत जाईल यात शंका नाही.
अर्थातच परत एकदा मराठी कळपटाला मी पाठींबा देत आहे.
मराठी कळफलक वापरता येत नाहिये
संपादनमला का मराठी कळफलक वापरता येत नाहिये? मी लॉग आऊट व लॉग इन् करून पाहिले पण अक्षरे रोमनच उमटत आहेत? काय करावे लागेल?
-Katyare
- पानावर ctrl-F5 वापरून पहा.
- अभय नातू १५:२२, १८ ऑक्टोबर २००८ (UTC)
- धन्यवाद!
- कळफलक वापरता आला!
- या शिवाय आय ई ची हिस्टरी पण डिलीट केली आणि मग लगेच कळफलक दिसला.
- निनाद कट्यारे
हे सांगितलेच पाहिजे असे वाटून लिहितो आहे की, मराठी कळ फलका बद्दल अनेकानेक धन्यवाद. भराभर बदल करणे अतिशय सोपे वाटते आहे! आपला निनाद
अरविंद् गुप्ता यांच्या एका वेबसाईटवर् आम्ही एका प्रकल्पाचा भाग् म्हणून जगातील् मुलांसाठी असलेली उत्तमोत्तम् पुस्तके मराठीमध्ये भाषांतरित् केली आहेत्. ती पीडीएफ् मध्ये उपलब्ध आजेत्. मी त्यातील् १०/१२ पुस्तकांचा अनुवाद् केला आहे. ती येथे विकिबुक्स मध्ये आणावीत् का ? यावर माहिती हवी आहे. तसेच् मला श्रीधर् फडके मराठी गायक् व अरविंद् गुप्ता तसेच् लेखिका गौरी देशपांडे यांच्यावर् नवीन् लेख् लिहायचे आहेत्. ते लिहिण्यासाठी काय् काय करावे लागेल्.. ?
- तुम्हाला ज्या नावाचा लेख लिहायचा आहे ते नाव शोधा तसा लेख नसेल तर ती अक्षरे लाल रंगात येतील. त्यावर टिचकी मारा आणि लेख लिहायला सुरुवात करा. तसेच पुस्तकांसाठी अजूनही काही नवीन् आलेली मराठी संकेत स्थळे आहेत जसे www.marathipustake.org जी मराठी पुस्तके जालावर उपलब्ध करून देत आहेत. त्यांनाही यात नक्की रस असेल.
-निनाद
बरोबर आहे साधे बदल करणे आता एकदम सोपे वाटत आहे. तसेच विस्तृत् लिहणेही बहुधा अजून सोपे जाईल. अजयबिडवे ०८:४२, २० ऑक्टोबर २००८ (UTC)
category redirects
संपादनHi
As per the wiki policy, (and the limitation of the mediawiki s/w) category redirects should not be used.
But there are few category redirects on marathi wiki.
Following query gives the list of category redirects.
Category redirect
There are around 40-50 such pages
Should we remove those?
Padalkar.kshitij २१:०५, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)
- yes, these need to be removed. Before that, any articles that belong to these categories should be moved over to target categories.
- अभय नातू २१:१९, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)
- okie, i am on it
- २१:२०, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)
मेटावरील भाषांतर विनंती
संपादनमेटावर फंडरेजींग २००८चे च्या मुख्य संदेशांचे भाषांतर करून हवे आहे कृपया सर्वांनी थोडे योगदान देउन भाषांतर पूर्ण करण्यास हातभार लावावा. meta:Fundraising 2008/core messages/mr
Mahitgar १६:०२, २४ ऑक्टोबर २००८ (UTC)
almost done,
please check and translate few remaining ones
padalkar.kshitij २१:१५, २ नोव्हेंबर २००८ (UTC)
- Please some one help out in proofreading translation at Meta.कृपया शूद्धलेखन तपासणीत मदत करा.61.17.205.151 १५:०९, ४ नोव्हेंबर २००८ (UTC)
अजूनही इंग्लिश संदेशच दिसतोय
संपादननिधिसंकलनाचा संदेश आता प्रत्येक पानावर दिसतोय, पण तो अनुवादित दिसत नाहीये. अजूनही 'विकिपीडिया is there when you need it — now it needs you.', 'विकिपीडिया: Making Life Easier.' वगैरे इंग्लिश संदेशच दिसताहेत. खरे तर निधिसंकलनाच्या पानाचे मराठी भाषांतर झाले आहे. काय समस्या आहे कुणी बघेल काय?
--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:४८, ६ नोव्हेंबर २००८ (UTC)
येथे मराठीचा status अजून ready आहे, तो मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यावर status "Published" होईल. माझ्या मते हे काम मेटा-विकिवरील सदस्य करतात. आपण थोडावेळ थांबून बघुया.
padalkar.kshitij ०३:५३, ६ नोव्हेंबर २००८ (UTC)
विकिपीडिया देणगी मोहिमेचे मराठीतील संकेतस्थळ प्रकाशित झाले आहे.
ते आपण इथे बघू शकता.
काही बदल आवश्यक असतील तर या सदस्याला विनंती करावी.
padalkar.kshitij १८:२९, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)
आंतरविकि दुवे
संपादनगेल्या ३-४ तासांत आंतरविकि दुव्यांमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसत आहे. कदाचित मेटावरील बदलांमुळे असेल पण कोणी सदस्याने काही बदल येथे किंवा मेटावर केले आहेत का?
अभय नातू ०४:५८, २५ ऑक्टोबर २००८ (UTC)
- परत सगळे ठीकठाक झाले आहे.
- अभय नातू ०५:०४, २५ ऑक्टोबर २००८ (UTC)
आता आंतरविकि दुवे बरोबर दिसत आहेत...
काय problem होता?
padalkar.kshitij ०५:०७, २५ ऑक्टोबर २००८ (UTC)
- कळले नाही, मला वाटते मेटा किंवा मीडियाविकिवर सॉफ्टवेर अपग्रेड सुरू असतील.
- अभय नातू ०५:१९, २५ ऑक्टोबर २००८ (UTC)
Wikipedia Survey
संपादनFor the first time wikipedia is conducting a survey of its users and editors
Information about the survey can be found here
The survey can be accessed here
I think, we should put this link on the मुखपृष्ठ so that Marathi wiki users and editors can also take the survey
आपली मते मांडावी
padalkar.kshitij ०४:३७, २९ ऑक्टोबर २००८ (UTC)
पहिली विकिपीडिया:विकिभेट प्रस्ताव
संपादनमराठी विकिपीडियाने विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प अंतर्गत दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ इतकी व्हावी हे ध्येय स्विकारले आहे. येत्या ११-११-२००८ पासून हे ध्येय गाठण्यास तीन वर्षांचा कालावधी उरतो. या दृष्टीने ११-११-२००८ मंगळवारी भारतीय प्रमाण वेळ संध्याकाळी साडे-सहा वाजता पुणे विद्यापीठ परिसर येथे विकिपीडिया:विकिभेट निमीत्तने भेटावे असा प्रस्ताव मांडत आहे.
- ता.क.: कृपया आपली मते मांडावीत, सहभागी होणे शक्य असेल तर आपले नाव व भ्रमणध्वनी क्रमांक आणि विपत्रपत्ता mahitgar@yahoo.co.in येथे इमेल करावा.
Mahitgar १६:४६, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)
उत्तम कल्पना आहे.
सागरापार राहणारा मी कितीही तळमळलो तरी येणे शक्य नाही.
आपणास शुभेच्छा..तसेच पुणे व आजूबाजूला राहणार्या प्रत्येकाला विकिभेटीला जाण्याचे आवाहन.
padalkar.kshitij ०३:३५, १ नोव्हेंबर २००८ (UTC)
autolinking of date fields in citation templates
संपादनHi,
Why doesn't the "accessdate" field in citation templates (e.g. साचा:cite web) is not autolinked here
It is autolinked on english wiki
e.g. accessdate=2008-10-31 is aulinked to October 31, 2008
On the other hand, how does autolinking work?
Saw the code for the template, but didn't understand
padalkar.kshitij २३:०८, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)
साचा:Infobox Spacecraft
संपादनकृपया साचा:Infobox Spacecraft या साच्याच्या भाषांतरासाठी मदत करावी
धन्यवाद
padalkar.kshitij ०५:४८, ४ नोव्हेंबर २००८ (UTC)
harvnb साचा
संपादनहा साचा मराठी विकीवर आहे काय ? \}}[१]
Proof-reading
संपादनOn behalf of User Dakutaa
नमस्कार, मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र हा माझा पहिला विकी-लेख पूर्ण झाला आहे. कोणी ProofReading / Review करु शकेल काय ?
Dakutaa ०९:०४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
अभय नातू १६:४७, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
रोमन देवता
संपादनमी रोमन देवतांची पाने तयार करू इच्छितो
त्यासाठी एकच convention ठेवावे असे माझे मत आहे.
इंग्रजी विकिमध्ये Mercury (mythology) अशी पाने आहेत, मराठीत काय करता येईल?
"XXX (देवता)" असे करता येऊ शकते, "देवता" हे देव किंवा देवी दोघांसाठीही वापरता येईल. (I think)
आपली मते मांडावी.
क्षितिज पाडळकर ०३:४६, २५ नोव्हेंबर २००८ (UTC)
- सर्व लेखांना तसे करायची खरं तर गरज नाही. 'मर्क्युरी (देवता)' लेखाऐवजी 'मर्क्युरी' असं मराठी लेखाचे शीर्षक असणे सयुक्तिक ठरेल; कारण मूलद्रव्यासंदर्भात लेख हवा असेल् तर मराठीत 'पारा' हे शीर्षक आहेच. तोच प्रकार 'ज्युपिटर (देवता)' असे नाव न वापरण्याबद्दल - इंग्लिश भाषेत ज्युपिटर हे एकच नाव ग्रह आणि रोमन देव अशा दोन संदर्भात वापरले जाते. पण मराठीत ग्रहासंदर्भात गुरू ग्रह हा लेख अगोदरच आहे; त्यामुळे 'ज्युपिटर' या लेखाचा संदर्भ मराठी भाषिकांना रोमन देव अशा संदर्भाने लागेलच.
- थोडक्यात '(देवता)' असे उपपद प्रत्येक शीर्षकात गुंफण्यात मराठी संदर्भांचा विचार करता फारसे हशील नाही. अपवादात्मक प्रसंगी गरज पडेल, तेव्हाच फक्त तसे उपपद योजावे.
- अजून एक विनंती: वर्गीकरण करताना 'वर्गःरोमन देव' (पुल्लिंगी) आणि 'वर्गःरोमन देवता' (स्त्रीलिंगी) असे दोन वर्ग बनवून ते 'वर्गःरोमन दैवते' (उभयलिंगी वर्गांकरता समावेशक नाव) या पालकवर्गात सामील करावेत.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०४:४६, २५ नोव्हेंबर २००८ (UTC)
रोमन दैवतांची नावे मूलद्रव्ये सोडूनही इतर अनेक ठिकाणी वापरली गेलेली आहेत - सॅटर्न (अंतराळ यानक्षेपक, कार कंपनी, इ.), मर्क्युरी(मूलद्रव्य, कार कंपनी, सॉफ्टवेर कंपनी, वृत्तपत्रे, , इ.), व्हिनस (चित्रे, शिल्पे, इ.), ज्युपिटर (अंतराळयानक्षेपक, इ.). यांतील अनेक नावे रोमन दैवतांपेक्षा इतर उपयोगांसाठी जास्त प्रचलित आहे. तरी संकल्पने सुधारणा सुचवलेला मूळ प्रस्ताव (मर्क्युरी (रोमन देव), व्हिनस (रोमन देवता)) हाच जास्त सयुक्तिक वाटतो.
अभय नातू ०५:०६, २५ नोव्हेंबर २००८ (UTC)
- अभय, सहमत. फक्त माझी पुस्ती अशीही होती की '(देवता)' असा संदर्भ शीर्षकांत सरसकट लावू नये. जिथे संदिग्धता असेल तिथेच ते शीर्षकात जोडावे. एरवी नुसते रोमन नाव राहू द्यावे.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०५:५९, २५ नोव्हेंबर २००८ (UTC)
अभय व संकल्प,
आपल्या सूचनांनुसार मी दोन पाने बनविली आहेत.
संकल्प यांचे म्हणणे बरोबर आहे, गरज नसेल तेव्हा 'देवता' शीर्षकांत जोडण्यात अर्थ नाही
तसेच मी (बर्याच चूकीच्या प्रयत्नांनंतर) साचा:पुनर्निर्देशन बनविला आहे...हुश्श..
तो एकदा तपासून बघा. रोमन देवांच्या कृपेने त्यात अजून चुका नसाव्यात :)
क्षितिज पाडळकर ०७:११, २५ नोव्हेंबर २००८ (UTC)
मेटा भाषांतर
संपादनमेटावरील लेखांनुसार विकिपीडियांची यादी या पानाचे भाषांतर करुन हवे आहे.
अभय नातू १६:०८, १ डिसेंबर २००८ (UTC)
२१,००० लेख
संपादनडिसेंबर ५, २००८ रोजी मराठी विकिपीडियावर हेमंत करकरे हा २१,०००वा लेख तयार झाला.
अभय नातू ०४:२५, ५ डिसेंबर २००८ (UTC)
मराठीमाती.कॉम दुवे
संपादनबर्याच लेखांच्या बाह्यदुवे विभागांमध्ये मराठीमाती.कॉमचे दुवे घातले जात आहेत. विकिपीडियाच्या नीतीमध्ये हे बसते का? --- कोल्हापुरी ०५:५४, ९ डिसेंबर २००८ (UTC)
- जर येथील मजकूराला पुरावा तेथे असेल तर हरकत नाही.
- जर जाहिरात करण्याचा उद्योग आहे असे वाटले तर मेटावर विनंती केली असता या संकेतस्थळावर सगळ्या विकिंवर बंदी आणता येते.
- अभय नातू ०६:४७, ९ डिसेंबर २००८ (UTC)
मुखपृष्ठ सहाय्य दुवा व नामविश्व
संपादनमुखपृष्ठावरील सहाय्य दुवा सहाय्य:सहाय्य पृष्ठ या अनुपलब्ध पानाला जोडला गेला आहे.
तो त्वरित बदलून विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ येथे जोडला पाहिजे .
मराठी विकिवर सहाय्य हे नामविश्व आहे का?
तसेच, व्याकरणदृष्ट्या योग्य काय? ... सहाय्य का साहाय्य ?
Molesworth मध्ये साहाय्य अशी नोंद आहे.
क्षितिज पाडळकर ०४:३७, १३ डिसेंबर २००८ (UTC)
५०,०००
संपादननमस्कार मंडळी,
आत्मस्तुतीचा धोका पत्करुन घेउन लिहित आहे. आगाउपणा वाटल्यास सोडून द्यावे.
आत्ताच मी ५०,०००वे वैयक्तिक संपादन पार पाडले. यातील वीसेक संपादने कदाचित सांगकाम्याद्वारे केली गेली असतील, इतर सगळी हाताने केलेली संपादने आहेत.
गेली २-३ वर्षे मराठी विकिपीडियावर मी मिळेल तो वेळ, मिळतील ती संसाधने वापरून काम करीत आहे. यात मला तुमची मोलाची साथ आणि मदत मिळालेली आहे. याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. हा वेळ मी माझ्या इतर मनोरंजन, कामे व सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे माझ्या बायको-मुलांकडून घेतलेला आहे आणि येथे दिला आहे. तर त्यांचे तर जितके आभार मानावे तितके थोडेच!
असो. तर या प्रसंगी अजून अनेक पन्नास हजारी संपादक मराठी विकिपीडियावर तयार होउन तो वृद्धिंगत होवो ही आशा करीत आहे.
अभय नातू २१:४६, २५ डिसेंबर २००८ (UTC)
- नमस्कार अभय,
- ५०,००० संपादने पूर्ण करण्याबद्दल आपले अभिनंदन.
- आपल्या या कामाचा आदर्श आम्हा नवीन सदस्यांपुढे (निदान माझ्यापुढे तरी) आहे.
- मात्र एक problem आहे,आपल्या या कामाचा गौरव करण्यासाठी आता एखादा नवीन बार्नस्टार बनवावा लागेल.. :)
- असो, नुकताच एक व्हिडियो youtube वर बघितला, आपल्या गौरवासाठी तोच संयुक्तिक आहे.
- आपल्याकडून असेच मार्गदर्शन मिळत रहावे या अपेक्षेत,
- क्षितिज पाडळकर ०१:५५, २६ डिसेंबर २००८ (UTC)
- अभय,
- ५०००० संपादने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन!
- मराठी विकिपीडिया हा तुमच्याच प्रयत्नांनी आजच्या स्थितील पोचला आहे असे म्हणणे अतिशयोक्ती नाही.
- तुम्हाला स्वत:ला हा विषय मांडावा लागला याबद्दल मी तुमची माफी मागतो. एक जुना सदस्य या नात्याने मी ते काम करावयास हवे होते.
- कोल्हापुरी ०३:३४, २८ डिसेंबर २००८ (UTC)
- ^ Dutta & Robinson 1995, p. 37.