अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. भावगीत म्हणजेच मनातील भावांचे शब्दसुरांद्वारा प्रकटीकरण होय. जी.एन. जोशी हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले गजानन वाटवे यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.

भावगीत या विषयावर प्रबंध लिहून शोभा अभ्यंकर यांनी पीएच.डी. मिळवली आहे. त्यांचे ‘सखी भावगीत माझे’ हे याच प्रबंधात आणखी भर घालून साध्यासोप्या भाषेत सादर केलेले पुस्तक आहे.

भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्या रागावर आधारलेले असायचे. या भावगीतांनी चांगले श्रोते निर्माण केलेले दिसतात. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.

क्र. भावगीताची पहिली ओळ कवी संगीतकार गायक/गायिका राग
असेन मी नसेन मी शांता शेळके यशवंत देव अरुण दाते भैरवी
असेच होते म्हणायचे तर विंदा करंदीकर दत्ता डावजेकर सुधीर फडके बागेश्री
आस आहे अंतरी या मधुकर जोशी दशरथ पुजारी सुमन कल्याणपूर पहाडी
ऊर्मिले त्रिवार वंदन तुला राजा मंगळवेढेकर राम फाटक राम फाटक भैरवी
एकतारी गाते योगेश्वर अभ्यंकर श्रीनिवास खळे माणिक वर्मा मिश्र रागेश्री
एकतारीसंगे एकरूप झालो (चित्रगीत) जगदीश खेबुडकर सुधीर फडके सुधीर फडके यमन कल्याण
एक धागा सुखाचा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडके सुधीर फडके शिवरंजनी
कधी बहर कधि शिशिर मंगेश पाडगावकर यशवंत देव सुधीर फडके मिश्र केरवाणी
कल्पवृक्ष कन्येसाठी पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर पहाडी
कशी रे भेटू तुला राजा बढे श्रीनिवास खळे मालती पांडे पहाडी
केतकीच्या बनी तेथे अशोक परांजपे अशोक पत्की सुमन कल्याणपूर बागेश्री/गोरख कल्याण
केशवा माधवा रमेश अणावकर दशरथ पुजारी सुमन कल्याणपूर दुर्गा/पहाडी
गुरू परमात्मा परेशु एकनाथ श्रीधर फडके सुरेश वाडकर शंकरा
घननीळा लडिवाळा ग.दि. माडगूळकर दत्ता डावजेकर माणिक वर्मा पहाडी
चांदण्या रात्रीतले हे स्वप्न शांता शेळके वसंत पवार माणिक वर्मा मिश्र मांड
जग हे बंदीशाळा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडके सुधीर फडके मिश्र मांड
जय जय महाराष्ट्र माझा राजा बढे श्रीनिवास खळे शाहीर साबळे व इतर भूप
जेव्हा तुझ्या बटांना मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळे सुरेश वाडकर मिश्र खमाज/मांड
जो आवडतो सर्वांना पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर मिश्र मांड
डाव मांडून मांडून ना.घ. देशपांडे राम फाटक सुधीर फडके पहाडी
डोळे हे जुलमी गडे भा.रा. तांबे वसंत प्रभू आशा भोसले मिश्र मारु बिहाग
तिन्हीसांजा सखे मिळाल्या भा.रा.तांबे हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर मिश्र यमन
तुझ्या गळा माझ्या गळा भा.रा. तांबे वसंत प्रभू सुधीर फडके, आशा भोसले भीमपलास
त्या चित्तचोरट्याला राजा बढे मधुकर गोळवलकर माणिक वर्मा मिश्र खमाज
त्यांनीच छेडिले गं उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे शोभा गुर्टू मिश्र खमाज
दयाघना सुधीर मोघे हृदयनाथ मंगेशकर सुरेश वाडकर पूर्वी
पूर्वेच्या देवा गंगाधर महांबरे वीणा चिटको रामदास कामत भूप
प्रेम केले काय हा राजा बढे कुमार गंधर्व कुमार गंधर्व मिश्र पहाडी
प्रेम तुझ्यावर करिते मी रे पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर सिंध भैरवी
प्रेमस्वरूप आई माधव ज्युलियन दत्ता डावजेकर लता मंगेशकर मधमाद सारंग
बाळा जो जो रे (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर वसंत पवार आशा भोसले यमन
भाग्य उजळले तुझे चरण पाहिले भा.रा. तांबे दशरथ पुजारी माणिक वर्मा भैरवी
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ग.दि. माडगूळकर (गीत रामायण) सुधीर फडके सुधीर फडके जोगिया
मधु मागशि माझ्या भा.रा. तांबे वसंत प्रभू लता मंगेशकर भीमपलासी
माझिया प्रियाला उमाकांत काणेकर श्रीकांत ठाकरे शोभा गुर्टू मिश्र हेमंत/पहाडी
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळे हृदयनाथ मंगेशकर पहाडी
रंगरेखा घेऊनी मी मधुकर जोशी दशरथ पुजारी माणिक वर्मा भैरवी
रघुपती राघव गजरी पी. सावळाराम वसंत प्रभू आशा भोसले मिश्र जोग
राजस सुकुमार तुकाराम श्रीनिवास खळे भीमसेन जोशी शिवरंजनी
रामा हृदयी राम नाही पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर जोगकंस
विकत घेतला श्याम (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडके सुधीर फडके/आशा भोसले पहाडी/मांड
विठ्ठल आवडी प्रेमभाव तुकाराम श्रीधर फडके सुरेश वाडकर मालकंस
विसरशील खास मला ज.के. उपाध्ये यशवंत देव आशा भोसले जोगकंस/मालकंस
शिवशंकर ते आज पाहिले वंदना विटणकर प्रभाकर जोग माणिक वर्मा मिश्र काफी
श्रीरामा घनश्यामा पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर मिश्र [[रागेश्री]
श्रीरामाचे चरण धरावे यशवंत देव यशवंत देव सुमन कल्याणपूर पूरिया धनाश्री
सजल नयन नित धार बरसती शांताराम नांदगावकर अशोक पत्की अजित कडकडे मिश्र भैरवी
सावर रे सावर रे मंगेश पाडगावकर हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर मिश्र यमन
सावळे सुंदर रूप मनोहर तुकाराम श्रीनिवास खळे भीमसेन जोशी मालकंस
हरवले ते गवसले का पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर पूरिया कल्याण
हृदयी जागा तू अनुरागा पी. सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर पहाडी
हात तुझ्या हातातुन मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळे अरुण दाते, सुधा मल्होत्रा पहाडी
क्षणभर उघड नयन देवा रा.ना. पवार दशरथ पुजारी माणिक वर्मा पूरिया कल्याण

पुस्तके

संपादन

मराठीत भावगीतांचे संग्रह किंवा भावगीतासंबंधी माहिती असणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-

 • अमोल भावगीते (संग्राहक मनोहर रिसबूड, अनेक भाग, मिनर्व्हा बुक डेपो, सेंट्रल प्रकाशन)
 • गजाननराव वाटवे यांची गाजलेली गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
 • गाणी मनातली.. गळ्यातली... (संपादक - मोरेश्वर पटवर्धन व वामन देशपांडे, साहित्य प्रसार केंद्र प्रकाशन) (१४हून अधिक भाग)
 • गोड गोड भावगीते (संपादक गजानन काशिनाथ रायकर, जयहिंद प्रकाशन)
 • गोष्टी गाण्यांच्या (लेखक प्रमोद रानडे) : या पुस्तकात ५१ मराठी आणि ११ हिंदी गाण्यांच्या जन्मकथा सांगितल्या आहेत.
 • त्या फुलांच्या गंधकोषी.. (मिलिंद रथकंठीवार)
 • नाटकांतील गाणी (संपादक प्र.ग. रायकर, जयहिंद प्रकाशन)
 • नोटेशनसह आवडती गाणी (चंद्रकांत साने)
 • नोटेशनसह भक्तिगीते भाग १, २ (चंद्रकांत साने)
 • नोटेशनसह भावगीते (चंद्रकांत साने)
 • नोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी (चंद्रकांत साने)
 • मनमोहक गीते (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
 • सुलोचना चव्हाण यांनी गायलेली सदाबहार गाणी (क्षीरसागर आणि कंपनी प्रकाशन)
 • स्वरभावयात्रा (विनायक जोशी)पहा : संगीतातील राग