सुरेश ईश्वर वाडकर (ऑगस्ट ७, इ.स. १९५५ :कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने मराठी, आणिहिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.

सुरेश वाडकर

सुरेश वाडकर
आयुष्य
जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५४
जन्म स्थान कोल्हापूर, महाराष्ट्र
पारिवारिक माहिती
अपत्ये अनन्या, जिया
संगीत साधना
गुरू आचार्य जियालाल वसंत
गायन प्रकार पार्श्वगायक, हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७६ - चालू
गौरव
पुरस्कार मदन मोहन पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, रजत कमल ५८ वा राष्‍ट्रीय फि‍ल्‍म पुरस्‍कार

जीवन संपादन

सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५५ रोजी कोल्हापूर येथील चिखली गावी झाला.

  वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

सांगीतिक कारकीर्द संपादन

१९६८ साली सुरेश वाडकर १३ वर्षाचे असताना जियालाल वसंत प्रयाग संगीत समिती कडून दिला जाणारा "प्रभाकर" सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी प्रोसाहित केलं. हा सर्टिफिकेट कोर्स बी. एड . समकक्ष असल्यामुळे सदर विध्यार्थ्याला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणूनही काम करता येत असे. सुरेश वाडकरांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि नंतर आर्य विद्या मंदिर, मुंबई येथील शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. मुंबई मध्ये त्यांचे स्वतःचे संगीत विद्यालय आहे, (www.ajivasan.com). न्यू जर्सी /न्यू यॉर्क सिटी  (www.sureshwadkarmusic.com) या ठिकाणी विध्यार्थ्यांना संगीत प्रशिक्षण दिले जाते. Ace Open Universityच्या माध्यमातून सुरेश वाडकरांनी SWAMA (Suresh Wadkar Ajivasan Music Academy)ऑन लाईन संगीत विध्यालयही सुरू केले आहे. इ.स. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव, रविन्द्र जैन्, ह्रुदयनाथ मन्गेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. सुरेश वाडकरांच्या आवाजाने लता मंगेशकर खूप प्रभावित झाल्या व त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम व कल्याणजी आनंदजी या मोठ्या संगीतकारांकडे सुरेश वाडकरणसाठी शिफारस केली. लक्ष्मीकांत प्यारेलाल सुरेश वाडकरांच्या आवाजाने खूप प्रभावित झाले व त्यांनी 'क्रोधी " (१९८१) या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचे ;चल चमेली बाग मे ' हे गाणे ध्वनिमुद्रित केले.लवकरच सुरेश वाडकरांना हम पांच, प्यासा सावन, (मेघा रे मेघा रे ) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरेश वाडकरांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या राज कपूर यांच्या प्रेम रोग (१९८२) या चित्रपटानं मध्ये गाणी गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सुरेश वाडकरांनी आर. के बॅनर खाली खूप गाणी गायली. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी  हिना, प्रेमग्रंथ, बोल राधा बोल, विजय व इतर अनेक चित्रपटनमध्ये आपला आवाज दिला. राजीव कपूर यांच्यासाठी रॅम 'तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये त्यांनी गाणी गायली. सुरेश वाडकरांनी तनमन.कॉम या चित्रपटाची निर्मिती केली. सारेगमप लिटिल चॅम्प्स  , या भारतीय टेलिव्हिजन शो मध्ये  जज म्हणून ही काम केले. Kanden Kadhala या तमिळ चित्रपटांमध्येही सुरेश वाडकरांनी गाणी गायली आहेत. हा चित्रपट जब विई मेट या अतिशय गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे रूपांतर आहे. ही एक गझल आहे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये खूप गाणी गायली आहेत. राजेंद्र तलाक यांच्या दर्याच्या देगेर या अलबम साठी आशा भोसले यांच्यासोबत १९९६ साली गाणी गायली. सुरेश वाडकरांनी  मराठी चित्रपट सृष्टीतील पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, आहोम पत्की, अनिल-अरुण यासारख्या दिग्ग्ज संगीतकाराने बरोबरही काम केले आहे. बऱ्याचश्या भारतीय भाषांमध्ये सुरेश वाडकरांनी अनेक धार्मिक गाणी म्हंटली आहेत.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.

सुरेश वाडकरांनी शास्त्रीय गायिका पदमा यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना अनन्या आणि जिया या दोन मुली आहेत. "मजा आला" हा त्यांचा पेटंट डायलॉग आहे.

पुरस्कार संपादन

सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी काही हे :-

  • चित्रपट संगीतात लक्षणीय कामिगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा), कलारंग प्रतिष्ठान व सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार (२०१३).
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (जुलै २०१९)
  • पद्मश्री पुरस्कार (२०२०)[१]
  • १९७६ साली सूर सिंगर स्पर्धेमध्ये मदन मोहन उत्कृष्ट पार्श्व गायक पारितोषिक सुरेश वाडकरांनी जिकंले.
  • २००४ साली मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
  • महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा ' Maharashtra Pride Award' २००७ साली सुरेश वाडकरांना मिळाला.
  • २०११ साली मी सिंधुताई सपकाळ या मराठी  चित्रपटातील 'हे भास्करा क्षितिजावर या' या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकासाथीचा  नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळाला.

संगीतकार-

सुरेश वाडकरांनी भारतीय चित्रपट सृष्टीतील विविध संगीतकारांबरोबर काम केले. त्यातील काही खालीलप्रमाणे-

श्रीनिवास खळे

श्रीधर फडके

अनिल - अरुण

लक्ष्मीकांत प्यारेलाल

कल्याणजी आनंदजी

आर. डी . बर्मन

रविन्द्र जैन

बप्पी लाहिरी

खैय्याम

उषा खन्ना

अरुण पौडवाल

ए. आर. रेहमान

विद्यासागर

नदीम श्रावण

विशाल भारद्वाज

राजेश रोशन

रॅम लक्ष्मण

शिव हरी

जतीन  ललित

हृदयनाथ मंगेशकर

आनंद मिलिंद

अनु मलिक

हिमेश रेशमिया

शंकर

रवी

चित्रगुप्त

जयदेव

ब्रह्मा कुमारीज

कौशल इनामदार  

बाह्य दुवे संपादन


  1. ^ https://padmaawards.gov.in/PDFS/2020AwardeesList.pdf