हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
(हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (हिंदी: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत, उर्दू: ہندوستانی شاستریہ سنگیت) ही भारतीय शास्त्रीय संगीताची प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारी शैली आहे. अर्वाचीन काळात मात्र पूर्ण भारतभरात आणि परदेशांतही या संगीत प्रकाराचे गायक-वादक आणि श्रोते आढळतात. या शैलीचे मूळ वेदकालीन कर्मकांडातील मंत्रोच्चारात असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. इतिहासात बाराव्या शतकापासून उत्तर भारत आणि पाकिस्तान भागात आणि काही प्रमाणात बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानातही ती प्रचलित होती असे आढळते. अभिजात भारतीय शास्त्रीय शैलीचे दोन उपप्रकारापैकी एक अशी ही शैली आहे, दुसरी दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली कर्नाटक शैली आहे.
ख्याल संगीत हे हिंदुस्थानी संगीताचे अर्वाचीन रूप आहे.