नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ
(कोलकाता डम डम विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCUआप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
নেতাজি সুভাষচন্দ্র বসু আন্তর্জাতিক বিমানবন্দর
डमडम विमानळ
नवे टर्मिनल १
आहसंवि: CCUआप्रविको: VECC
CCU is located in पश्चिम बंगाल
CCU
CCU
पश्चिम बंगालमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कोलकाता
स्थळ उत्तर २४ परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल
हब एर इंडिया
स्पाइसजेट
ब्ल्यू डार्ट एव्हिएशन
जेटकनेक्ट
समुद्रसपाटीपासून उंची १६ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक) 22°39′17″N 88°26′48″E / 22.65472°N 88.44667°E / 22.65472; 88.44667
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
01L/19R 2,285 7,497 डांबरी
01R/19L 3,660 12,008 डांबरी
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी १,०१,००,२३२
विमान उड्डाणे ९२,८७१

डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे.

इतिहास

संपादन

कोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीनऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बॉंबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली

गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान कॉनकोर्स
एर इंडिया अगरताळा, ऐझॉल, बागडोगरा, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, गया, गुवाहाटी, पोर्ट ब्लेअर, हैदराबाद, इंफाळ, मुंबई, सिलचर देशांतर्गत
एर इंडिया डाक्का, काठमांडू, रंगून आंतरराष्ट्रीय
एर इंडिया रीजनल गुवाहाटी, लखीमपूर, शिलाँग, सिलचर, तेझपूर देशांतर्गत
एरएशिया क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय
बिमान बांगलादेश एरलाइन्स डाक्का आंतरराष्ट्रीय
चायना ईस्टर्न एरलाइन्स कुन्मिंग आंतरराष्ट्रीय
ड्रॅगनएर (कॅथे पॅसिफिक) हाँग काँग आंतरराष्ट्रीय
ड्रुक एर पारो, सिंगापूर आंतरराष्ट्रीय
एमिरेट्स दुबई आंतरराष्ट्रीय
एतिहाद एरवेझ अबु धाबी [] आंतरराष्ट्रीय
गोएर अहमदाबाद, बागडोगरा, भुवनेश्वर, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, नागपूर, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे देशांतर्गत
इंडिगो अगरताळा, अहमदाबाद, बागडोगरा, बंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, दिब्रुगढ, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इंफा्ळ, इंदूर, जयपूर, कोचीन, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रायपूर, रांची, त्रिवेंद्रम, विशाखापट्टणम देशांतर्गत
इंडिगो बँकॉक आंतरराष्ट्रीय
जेट एरवेझ बागडोगरा, गोवा, मुंबई, पुणे, देशांतर्गत
जेट एरवेझ डक्का आंतरराष्ट्रीय
जेट एरवेझ
चालक: जेटकनेक्ट
अगरताळा, ऐजॉल, बंगलोर, दिल्ली, गुवाहाटी, इंफाळ, जोरहाट, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची, सिलचर, वाराणसी देशांतर्गत
कतार एरवेझ दोहा आंतरराष्ट्रीय
रीजंट एरवेझ चित्तगांव, डाक्का आंतरराष्ट्रीय
सिल्क एर सिंगापूर आंतरराष्ट्रीय
सिंगापूर एरलाईन्स सिंगापूर आंतरराष्ट्रीय
स्पाईसजेट अगरताळा, बागडोगरा, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, मुंबई, पोर्ट ब्लेअर देशांतर्गत
स्पाईसजेट बॅॅंकॉक आंतरराष्ट्रीय
ताशी एर बॅॅंकॉक, पारो आंतरराष्ट्रीय
थाई एरवेझ बॅॅंकॉक आंतरराष्ट्रीय
युनायटेड एरवेझ चित्तगांव, डाक्का आंतरराष्ट्रीय

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "Etihad Airways expands India operations with new flights to Kolkata". 10 July 2014. 2014-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 July 2014 रोजी पाहिले.