लेंगपुई विमानतळ (आहसंवि: AJLआप्रविको: VEAZ) हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळमंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फालगुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

लेंगपुई विमानतळ
विमानतळाची इमारत
आहसंवि: AJLआप्रविको: VEAZ
AJL is located in मिझोरम
AJL
AJL
मिझोरममधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक मिझोरम शासन/भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा ऐझॉल
समुद्रसपाटीपासून उंची १,३२८.४ फू / ४०५ मी
गुणक (भौगोलिक) 23°50′18.39″N 092°37′13.29″E / 23.8384417°N 92.6203583°E / 23.8384417; 92.6203583
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१७/३५ ८,२०० २,५०० डांबरी धावपट्टी

लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया इम्फाल, कोलकाता
गो फर्स्ट गुवाहाटी
इंडिगो दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन