तेझपूर विमानतळ

आसामचे विमानतळ, भारत

तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.[]

तेझपूर विमानतळ


तेझपूर वायुसेना तळ

भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू-३० लढाऊ विमान.
आहसंवि: TEZआप्रविको: VETZ
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रचालक भारतीय वायुसेना
स्थळ तेझपूर
समुद्रसपाटीपासून उंची २४० फू / ७३ मी
गुणक (भौगोलिक) 26°42′44″N 092°47′14″E / 26.71222°N 92.78722°E / 26.71222; 92.78722
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ९,०१० २,७४६ डांबरी
तेझपूर विमानतळ is located in India
तेझपूर विमानतळ
तेझपूर विमानतळ
तेझपूर विमानतळाचा स्थळदर्शक नकाशा

तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहेरघरच आहे.[] या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमारबांगला देश यांच्या दरम्यान आहे.

इतिहास

संपादन

ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या विमानतळाची बांधणी केली गेली. युद्धानंतर, सन १९५९मध्ये यास हवाई दलाचा तळ म्हणून विकसित करण्यात आले. ईशान्य भारतासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा तळ आहे. येथून अनेक प्रकारची विमाने उडू शकतात.

येथून उडालेले पहिले विमान हे व्हॅंपायर व तूफानी १०१ हे होते. विमानतळाचा वापर बहुशः वायुदल करते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया रीजनल कोलकाता

संदर्भ

संपादन

साचा:AFHRA

  1. ^ "सलोनीबारी विमानतळ". 4 July 2007 रोजी पाहिले.
  2. ^ भारत सुखोई-३० विमाने तेझपूर विमानतळावर ठेवणार (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

संपादन