डिसेंबर ३०
दिनांक
(३० डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६४ वा किंवा लीप वर्षात ३६५ वा दिवस असतो.
ठळक घटना व घडामोडी
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
- १८५३ - गाड्सडेन खरेदी - अमेरिकेने गिला नदीच्या दक्षिणेची व रियो ग्रान्देच्या पश्चिमेची ७७,००० वर्ग किलोमीटर जमीन मेक्सिकोकडून १,००,००,००० डॉलरच्या बदल्यात विकत घेतली.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - यु.एस.एस. मॉनिटर उत्तर कॅरोलिनातील केप हॅटेरास जवळ बुडाली.
- १८८० - ट्रान्सवाल प्रजासत्ताक झाले. पॉल क्रुगर अध्यक्षपदी.
- १८९६ - फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये होजे रिझालला फायरिंग स्क्वॉडने मृत्युदंड. (पहा - रिझाल दिन).
- १८९७ - नातालने झुलुलॅंड बळकाविले.
विसावे शतक
संपादन- १९०३ - शिकागोच्या इरोक्वो थियेटरला आग. ६०० ठार.
- १९२२ - सोवियेत संघराज्याची स्थापना.
- १९२४ - एडविन हबलने जगात अनेक आकाशगंगा असल्याचा दावा सिद्ध केला.
- १९२७ - एशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे, गिंझा लाईन टोक्योमध्ये सुरू.
- १९४० - कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्ग, अरोयो सेको पार्कवे खुला.
- १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
- १९४४ - ग्रीसचा राजा जॉर्ज दुसऱ्याने राज्य सोडले.
- १९४७ - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.
- १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.
- १९६५ - फर्डिनांड मार्कोस फिलिपाईन्सच्या अध्यक्षपदी.
- १९७२ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.
- १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
- १९९७ - अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.
एकविसावे शतक
संपादन- २००० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
- २००१ - आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.
- २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.
जन्म
संपादन- ३९ - टायटस, रोमन सम्राट.
- १६७३ - तिसरा एहमेद, ऑट्टोमन सुलतान.
- १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटिश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.
- १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १८८४ - हिदेकी तोजो, दुसऱ्या महायुद्धातील जपानी पंतप्रधान.
- १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक.
- १९०२ - डॉ. रघू वीरा, भारतीय भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य.
- १९३५ - ओमार बॉन्गो, गॅबनचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
संपादन- १५९१ - पोप इनोसंट नववा.
- १८९६ - होजे रिझाल, फिलिपाईन्सचा क्रांतिकारी.
- १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.
- १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.
- १९८२ - दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी मराठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक.
- १९८६ - हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनचा पंतप्रधान.
- १९८७ - दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता, भारतीय संगीतकार
- १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
- २००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.
- २००६ - सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - (डिसेंबर महिना)