क्वाझुलू-नाताल

(नाताल या पानावरून पुनर्निर्देशित)

क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. क्वाझुलू-नातालच्या पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस स्वाझीलँडमोझांबिक तर पूर्वेस लेसोथो हे देश आहेत. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी तर डर्बन हे सर्वात मोठे शहर आहे. १९९४ सालापर्यंत हा प्रांत नाताल ह्या नावाने ओळखला जात असे. येथे झुलू वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत.

क्वाझुलू-नाताल
KwaZulu-Natal
दक्षिण आफ्रिकेचा प्रांत

क्वाझुलू-नातालचे दक्षिण आफ्रिका देशाच्या नकाशातील स्थान
क्वाझुलू-नातालचे दक्षिण आफ्रिका देशामधील स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी पीटरमारित्झबर्ग
सर्वात मोठे शहर डर्बन
क्षेत्रफळ ९४,३६१ चौ. किमी (३६,४३३ चौ. मैल)
लोकसंख्या १,०२,६७,३००
घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ZA-KZN
संकेतस्थळ kwazulunatal.gov.za

१९व्या शतकाच्या पूर्वार्धादरम्यान हा भूभाग झुलू राजतंत्राच्या अधिपत्याखाली होता. १९९४ साली दक्षिण आफ्रिकन सरकारने वर्णभेद काळात तयार केलेल्या क्वाझुलू भूभागाला नाताल प्रांतामध्ये विलीन करून क्वाझुलू-नाताल प्रांताची निर्मिती केली.