इ.स. १९६९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(१९६९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६६ - १९६७ - १९६८ - १९६९ - १९७० - १९७१ - १९७२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मार्च २ - फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान कॉॅंकॉर्डची पहिली चाचणी.
- मार्च २ - उस्सुरी नदीच्या काठी चीन व सोवियेत संघाच्या सैन्यात चकमक.
- एप्रिल २८ - चार्ल्स दि गॉलने फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- मे २ - क्वीन एलेझाबेथ सेकंड या राजेशाही जहाजाची पहिली सफर सुरू.
- मे १० - व्हियेतनाम युद्ध - हॅम्बर्गर हिलची लढाई.
- मे १६ - सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
- मे १८ - अपोलो १०चे प्रक्षेपण.
- जून २० - जॉक शबान-देल्मास फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै ७ - कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
- जुलै ९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
- जुलै १८ - अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर आहे.
- जुलै २० - अपोलो ११ चंद्रावर उतरले.
- जुलै २० - होन्डुरास व एल साल्वाडोरमध्ये शस्त्रसंधी.
- जुलै २१ - नील आर्मस्ट्रॉॅंग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
- जुलै २४ - सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
- ऑगस्ट १७ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनाऱ्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.
जन्म
संपादन- मे २ - ब्रायन लारा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- मे १७ - उजेश रणछोड, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- जून ६ - सुनील जोशी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै १२ - ऍलन मुल्लाली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै २४ - जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.
- जुलै २६ - जॉॅंटी ऱ्होड्स दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - ग्रॅहाम थोर्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २८ - लिनस तोरवाल्ड्स, फिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.
- ऑगस्ट २८ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.
- ऑगस्ट ३१ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २५ - हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २५ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
- ऑक्टोबर २९ - डगी ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी २३ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- मे २ - फ्रांझ फोन पापेन, जर्मन चान्सेलर.
- मे ३ - झाकीर हुसेन, भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ.
- जून १३ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी.
- जुलै १० - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
- ऑगस्ट २९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.