मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

संपादन
चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

संपादन
२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


   स्वागत Nanu~mrwiki, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Nanu~mrwiki, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७१ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

प्रिय नानू, आपण निश्चिंत राहावे..... अजिबात काळजी करू नये. कळावे लोभ असावा... मला तुमचे मराठी विकिपीडियातील लेखामधील योगदान पहायची इच्छा आहे. काही मदत लागली तर अवश्य कळवा....Mvkulkarni23 १४:३५, ३० नोव्हेंबर २०११ (UTC)


Nanu साहेब, कृपया constructive criticism करा आणि लिनक्स, मोझिला फायरफॉक्स किंवा तत्सम एखादा "Open Source प्रकल्पाचे" पान संपादित करून, त्याला मुखपृष्ठ सदरालायक बनवा. याकामी समस्त विकीपीडियन्स (मी पकडून) मदतीला आहेतच. नीटपणे विचारल्यास मनुष्याला मदत मिळतेच याचे कृपया भान ठेवा. Kaajawa १५:०८, ३० नोव्हेंबर २०११ (UTC)

अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन

संपादन
आदरणीय महोदय/या,
आपण अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप/ असभ्य अथवा असंसदीय भाषा या गटात मोडते असे मांडले गेले आणि वगळले गेले आहे अथवा कोणत्याही क्षणी वगळले जाऊ शकते. विशिष्ट विचार अथवा कृती बद्दल आपली मतांतरे अगदी टीकाही ऐकून घेण्यास मराठी विकिपीडिया समुदाय नेहमीच उत्सुक असतो आणि असेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीची, समूहाची कृती अथवा विचार आपल्याला पटणारे असतीलच असे नाही, "महात्मा गांधी" म्हणतात त्याप्रमाणे आपली टीका त्या विशिष्ट कृती अथवा विचाराबद्दल आपले अभ्यासपूर्ण मुद्देसूद मतांतर व्यक्त करण्यापर्यंतच मर्यादित ठेवावी, आपण करत असलेल्या टिकेचे चारित्र्यहननात, व्यक्ती अथवा समूहद्वेषात रुपांतरण होणार नाही याची दक्षता घेणे जरूरी आहे. एखादा विचार मुद्दा/कृती पटत नसेल तर काय करावे ? याची माहिती खाली दिली आहे ती पुढे दिली आहे ती वाचावी.

विकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप करू नयेत.



विकिपीडियाच्या परिघाला मर्यादा आहेत. विकिपीडियावरील निर्णय प्रक्रीया सहसा सहमतीने होते पण विकिपीडिया लोकशाही सुद्धा नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत असला तरी तो सर्व समावेशक ज्ञानकोश आहे अमुक्तस्रोताबद्दल अथवा आपणास न पटणार्‍या दृष्टीकोनांचीही येथे मांडणी असू शकते. आपल्या सर्व आकांक्षाना इच्छा आणि विनंत्या मराठी विकिपीडियन समुदाय कदाचित स्विकारू शकणार नाही असेही होऊ शकेल, तरी सुद्धा येथे जे काही काम होते यात बराच मोठा भाग हा सामान्य मराठी जनांना उपयोगी पडणारा सकारात्मक आहे.त्यामुळे उत्साही रहा आग्रहही धरा पण त्याच वेळी आग्रहाचे टोक गाठण्याचे अथवा आपल्या आग्रहा खातर इतर कुणाही व्यक्तीस अथवा समुहास व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाचे भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक लक्ष्य करण्याचे टाळा.आपल्याकडे आधीच पुरेशा संपादकांची वानवा असताना आहे त्या संपादकांचे श्रम इतरत्र घालवून खच्ची करण्यात अवघ्या मराठी समाजाचे नुकसान होते हे आपण लक्षात घेऊन सहकार्य करावे. त्यामुळे काही गोष्टी रूचल्या नसल्या तरी सुद्धा सकारात्मकतेने आपण सहाकार्य करू शकाल असा विश्वास आहे.

सर्वच मराठी बांधवांनी आजपर्यंत मराठी विकिपीडिया प्रकल्पाची सर्वसामान्य जनतेस उपयूक्त ठरणारी रचनात्मक ध्येये लक्षात घेऊन मराठी विकिपीडियन संपादकांना त्रस्त करण्याचे टाळले आहे आणि आपणही टाळाल याचा आम्हाला सार्थ अभिमान असेल.येथील संकेतांचा परिचय अभ्यास होण्यास तसेच मतांतरात शांतता प्रस्थापित काण्याच्या दृष्टीने आपल्या संपादनास काही अपवादात्मक परिस्थितीत बंधने घातली गेल्यास त्या बद्दल गैर समज करून घेऊ नये. सर्वांच्या सदसद विवेकबुद्धीवर श्रद्धा ठेवण्यावर विकिपीडियाचा पारंपारिक विश्वास आहे तसा तो तुमच्यावरही आहे.. आम्हाला तुमच्या विरोधात काही सिद्ध करावयाचे आहे,चढा ओढ आहे आकस आहे असेही नाही.मराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे तेव्हा काही वेळा व्यकिगत मतांना मराठी भाषेच्या संदर्भाने अधीक मोठ्या ध्येयाकडे पाहून वेळ प्रसंगी थोडी मुरड घालावी, जेव्हा परत याल तेव्हा नव्या उत्साहाने मराठी विकिपीडियात समरसून सकारात्मक लेखन योगदान कराल असा विश्वास आहे.







संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.esakal.com/esakal/20120609/5481722354753731175.htm [मृत दुवा]
  2. ^ "मराठी शब्द हवे आहेत - १४ | मनोगत". www.manogat.com. 11 March 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "मराठी शब्द हवे आहेत - १४ | मनोगत". www.manogat.com. 11 March 2018 रोजी पाहिले.
  4. ^ Lindsay, Nicole. "How to Take Constructive Criticism Like a Champ". Lifehacker. 11 March 2018 रोजी पाहिले.


.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Nanu~mrwiki

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


नानू, ह्या पूर्वीही आपण येथील इतर सदस्यांवर बिनबुडाचे वैयक्तिक आरोप केलेले आहेत. हा अनावश्यक उत्पात बंद केला नाहीत तर आपले अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते ह्याची नोंद घावी. - अभिजीत साठे १७:३७, ५ जानेवारी २०१२ (UTC)

मला उपदेश पाजायचा प्रयत्न करू नका. आपला काहीही समज असो, प्रचालकपद मला नक्की कशामुळे मिळाले आहे ह्याची जाणीव येथील इतर जाणकार व जबाबदारी सदस्यांना आहेच. त्यात आपल्याला टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही आणि आपणास स्पष्टीकरण देण्याची मलाही आवश्यकता नाही. - अभिजीत साठे १७:५२, ५ जानेवारी २०१२ (UTC)

आर आल वाटत ह्ये परत हित. झ्वापलेल कुत्र आन झिंगलेल मानूस कदी उठुनशान भुकाया लागल काय सांगता येत न्हाय पघा. Tipya


Hi Nanu,

I found you have raised few concenrns on my user page. I have posted my response here. --Shiju १०:१०, १० जानेवारी २०१२ (UTC)

नमस्कार Nanu~mrwiki, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

वर्ग:पुणे निवासी

संपादन

पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . १०:०८, २५ मार्च २०१२ (IST)Reply

असंसदीय न वापरण्याबद्दल विनंती

संपादन
नमस्कार,मराठी विकिपीडिया चावडी आणि चर्चा पानांवर मराठीच वापरण्याबद्दल संतोष दहिवळांनी धोरणात्मक चर्चा मांडली आहे.तेथे आपण सहभाग नोंदवू शकता. चर्चांना शक्यतोवर धोरणात्मक वळण द्यावे व्यक्तिगत रोख टाळावेत.शंतनू यांचे प्रमाणलेखन विषयक मुद्दा काढण्यात गैर आहे असे नाही.ती सुधारणा केवळ प्रचालकांनाच करता येते त्यामुळे तीथे सुचना नोंदवली जाणे ठिक आहे.
चर्चा "माथेफिरू" हा असांसदीय शब्द वगळावा , असे शिक्के मारू नयेत.
आपल्या आवडीच्या विषयावर वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा
माहितगार (चर्चा) १३:०७, २४ एप्रिल २०१२ (IST)Reply

प्रचालकांना निवेदन वरील संदेश

संपादन

नमस्कार नानु मी आपल्या प्रचालकांना निवेदन चावडीवरील संदेशास सविस्तर प्रतिसाद देणार आहे,धीर धरावा, त्या दृष्टीने तो आपल्या चर्चा पानावर हलवत आहे .माहितगार (चर्चा) २०:४५, २६ एप्रिल २०१२ (IST)Reply


  • सर्वे सर्वा, महामहीम अभय नातू द ग्रेट तुम्हास साष्टांग प्रणीपाद,
बर्याच काळाने आपणास फुरसद (?) मिळाल्याचे पाहून हर्ष झाला, पण इतके दिवस रायबा आणि इतर सदस्यांनी शंतनू वर कारवाई करण्याचे साकडे आपणाकडे धरले तेव्हा आपण प्रसन्न नाही झालात आणि शांतानुस वाचवण्या साठी एकदम प्रगटलात ? खरच तुम्ही निष्पक्ष आहात का ? आपणावर यापूर्वीही पक्षपाती, राजकारणी, गुटबाजी, गुंडागर्दी,भ्रष्टाचार असे एक ना अनेक आरोप वेळोवेळी वेगवेगळ्या सदस्यांनी लावले आणि सिद्ध केले आहे. आपण शंतनुवर कारवाई करणे बाबत वेळकाढू धोरण अवलंबले, चावड्या बंद पडल्या, चर्चा विस्कळीत करवल्या, आणि आता येथे नियम मांडत आहात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हि मुस्कटदाबिच नाही का ? अभिजित साठे याने काहीही अगदी जाती वाचक लिहिले तरी चालते त्यावर कधीही ब्र काढला नाही, तंबी आणि कारवाई तर फार दूर .... मंदार कुलकर्णींची भाषा याच पानावर किती उर्मट आणि उद्दाम आहे पण आपणास चालले आणि सामान्य सदस्यास मात्र नियम ? हि सरळ सरळ फसवेगिरी आहे. तेव्हा आपली भूमिका येथे अवैध दिसते.
मुद्दा शंतनू वर कारवाईचा आहे आणि तुम्ही विवादात पडलात तर विषयांतर होईल आणि दीर्घकालीन वेगळाच अध्याय सुरु होवू शकतो, ते टाळावे म्हणून ...... -Nanu (चर्चा)
नानू साहेब, मी जातीयवाचक विधाने केल्याचा पुरावा तुमच्याकडे असेलच. एकदा तो पुरावा व माझ्या विधानाचा context जरा येथे सर्वांच्या enlightenment साठी पेश करण्याची तसदी घ्याल काय? - अभिजीत साठे (चर्चा) १०:४३, २६ एप्रिल २०१२ (IST)Reply
सिद्ध? हाहाहा...बरे, वरील धोरणात्मक प्रस्तावावर तुमचे मत काय आहे? प्रचालकांना निवेदन हा मुद्दा सोडून असलेला मजकूर वगळावा का?
आपण माझे निवेदन वाचले असेलच. माझ्यावर अधिक आरोप करायचे असतीलच तर त्यासाठी माझे चर्चा पान वापरावे.
अभय नातू (चर्चा) १०:०५, २६ एप्रिल २०१२ (IST)Reply
नमस्कार , मी चर्चा आपल्या स्वत:च्या चर्चा पानावर आणण्याच्या आणि मी या चर्चेत येण्याच्या कारणे पण मी आपल्याला चर्चेच्या ओघात देईनच. सुरवातीस मला आपल्याला स्पष्ट करावे वाटते की व्यक्तीगत पातळीवर माझ्यावर होणाऱ्या अगदी टोकाच्या टिकांकडे मी सकारात्मक पद्धतीनेच पहातो.व्यक्तीगत आरोप न करता केल्या जाणाऱ्या टिकेत मोठेच सामर्थ्य असते. टिकाकार हे आरसे असतात अशी माझी श्रद्धा आहे.आणि या श्रद्धेमुळेच मी आपल्याकडे पुर्वग्रंहाशिवाय पाहू शकतो असा माझा स्वत: वरील विश्वास आहे.मी मराठी विकिपीडियावर जो काही वेळ देतो तो माझ्या मराठी भाषेवरील प्रेमापोटी देतो. मी मराठी भाषेकरता म्हणून पहातो तेव्हा हातच न राखून मराठीचे हित जपणारा तो आपला एवढीच माझी व्याख्या आहे.
इंटरनेटवरील इतर असंख्य वेबसाईत सोडून आपण मराठी विकिपीडियावर टिका करण्या करता का होत नाही वेळ देत आहात आणि या मागेही आपली जी काही प्रेरणा आहे ती आपल्या स्वत्:च्या दृष्टीत सकारात्मकच असणार आहे.आपल्यातील या प्रेरणेस अधीक रचनात्मक मार्गाने व्यक्त होण्यात मी काही सहाय्यभूत होऊ शकतो का ते पहाण्याचा माझा हेतू सदहेतू आहे असा मी स्वत्:वर विश्वास बाळगतो. "आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दा मांडू इच्छित असाल तर तो मुद्दा बाजूस पडून विषयांतर होऊन आपल्या मुद्द्याच्या काही महत्त्वपूर्ण बाजूंचे नुकसान होऊ शकते " हे वाक्य व्यक्तिगत आरोप करू नयेत हे सुचवणाऱ्या साचात टाकताना आपण आणि आपल्या सारखे अजाणतेपणाने व्यक्तिगत आरोपाचा मार्ग वापरणारे अनेक भारतीय बांधव होते आणि आहेत.
मराठी विकिपिडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या विषयावर मी बरेच लेखन केले आहे ते त्या विषयावरील आत्मीयतेतूनच .त्यामुळे अभिव्यक्त होण्यास प्रत्येकास अधिकतम संधी मिळावी असे मला नेहमीच वाटत आले आहे. प्रत्येक मनुष्यमात्र वेगवेगळ्या वातावरणात आणि विचारधारांशी संकल्पनांशी संपर्क येत मोठा होतो,बऱ्याचदा अगदी स्वत:चेच पुर्वीचे विचार कालौघात आपणच पुन्हा विचार करून बदलतो. अगदी आपल्या घरातील, आप्तेष्ट आणि मित्रांशी,कार्यालयातील सहकाऱ्यांशी आपले सर्वच्या सर्व विचार जुळतातच असे नाही, पण बहुतांश वेळा आपण वैचारीक मतभेद व्यक्तिगत नात्याच्या/संबंधाच्या आड येऊ देत नाही.
'विंडोज' बद्दलचे लेख मुखपृष्ठावर घेण्याच्या बद्दल आपल्या जुन्या शंकांच्या बाबत मराठी विकिपीडियावर व्यवस्थित मुद्देसुद नोंद FAQ पानांकरिता उपलब्ध रहावी म्हणून खालील प्रमाणे शंका निरसन नोंदवून ठेवत आहे.
१) विकिपीडिया मुक्तस्रोत असला तरी केवळ मुक्तस्रोतांच्या माहितीपुरता मर्यादीत नाही. एखाद्या कोऑपरेटीव्ह सोसायटीने चालवलेल्या आर्ट गॅलरीत कमर्शीयल जाहीरातीतील कला हा विषय येऊ शकतो.किंवा सहकारी ग्राहक भांडारात लिज्जत पापड या सहकारी क्षेतातील पापडा सोबत इतर व्यावसायीक कंपन्यांचे पापडाची उत्पादने सुद्धा मांडलेली असू शकतात.त्याच प्रमाणे मुक्तस्रोताबद्दलच्या माहिती सोबतच अमुक्त क्षेत्रातील माहिती सुद्धा इथे उपलब्ध केली जाऊ शकते.
२) विकिपीडिया हा सर्वप्रकारच्या ज्ञान आणि माहितीचा स्रोत आहे विश्वकोशीय परिघातील कोणतीही माहिती आणि ज्ञान इथे अयोग्य नाही.
३) मी मुक्तस्रोतांचा समर्थक आहे म्हणून मला विंडोज हि प्रणाली आवडत नसेल पण जोपर्यंत संबधीत लेख विश्वकोशीय परिघास अनुसरून आहे तो पर्यंत मी माझे व्यक्तिगत पुर्वग्रह बाजूस ठेऊन त्या लेखासही सुयोग्य न्याय देणे हे विकिपीडियाच्या दर्जेदार परिपूर्ण वाढीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.
४) टोल रस्ते मला कितीही आवडत नसले तरी सार्वजनिक हीताच्या दृष्टीने टोल नसलेल्या टोल रहीत मार्गा सोबतच टोल असलेल्या मार्गाचीही माहिती उपलब्ध करणे सयूक्तिकच ठरते. शासकीय पोस्ट ऑफीस आहेत म्हणून प्रायव्हेट कुरीयर सर्वीसेसची माहितीच देऊ नये , महाराष्ट्र शासनाचे बस महामंडळ आहे म्हणून प्रायव्हेट बस कंपनीची माह्तीच देऊ नये अशा स्वरूपाच्या आग्रहाचे टोक खरेच सार्वजनिक हितास धरून असेल काय ? एखाद्दा सार्वजनिक संस्थेला इमर्जन्सि ॲक्सिडेंट सर्विसेस इस्पितळे इत्यादी सार्वजनिक सोईंची माहिती सुरक्षेचे तपशिल जसे टोलरहीत मार्गावर नमुदकरावे लागतात तशीच माहिती टोल असलेल्या रस्त्या बाबत सुद्धा देणे सार्वजनिक हितास धरूनच असते.
घरातल्या चहा बनवता न येणाऱ्या व्यक्तिंना चहा बनवणे शिकवायचे असल्यास अमूक सहकारी भांडारातला चहा आणा तरच चहा बनवणे शिकवतो घरातला वापरातला चहा ब्रॅंडेड कंपनीचा असल्यामुळे चालणार नाही हि भूमिका तर्क संगत रहात नाही.
५) मराठी विकिपीडियावर तांत्रिक पार्श्वभूमी नसलेल्या नवागत सदस्यांना सहाय्य उपलब्ध करावयाचे असल्यास शंका निरसन करावयाचे असल्यास ऑपरेटींग सिस्टीम आणि ब्राऊजर्स या संकल्पनांचा परिचय त्यांना सहज उपलब्ध असलेल्या माध्यमातून करून देणे तर्कत: अत्यंत सुसंगतच ठरते.
६) मला आवडो अथवा न आवडो, मराठी विकिपीडिया अस्तीत्वात येण्यापुर्वीपासून डेस्कटॉपवरील विंडोज हि सर्वात जास्त वापरली गेलेली सिस्टीम होती आणि आजही सर्वसामान्यांच्या वापराता सामान्य पणे तीच सिस्टीम वापरात आहे हे सत्य नाकारून त्या संदर्भाने सहाय्य उपलब्ध न करताच पुढे जाणे हे संगणक न समजणाऱ्या सर्वसामान्य जनते वर अन्याय करणारेच ठरते. विंडोजप्रणालीचा व्यवसाय मराठी विकिपीडियात येणाऱ्या तत्संबधी माहितीवर अंशत:ही अवलंबून असावा एवढी पोहोच आणि आवाका मराठी विकिपीडियाचा नव्हता आणि नाही.ज्या गोष्टीचा प्रसार एवितेवी झालेला आहे आणि होणार आहे त्या करिता कुणी कोणाला हकनाक खडकुही काढून देत नाही विकिपीडियाच्या सदस्यांना व्यक्तिगत फायदे पोहोचवले जाणे फार दुरची गोष्ट आहे. आणि कोणत्याही अपेक्षे शिवाय माहिती देणार आहोत ह्या गोष्टीची खात्री असल्या नंतर तर निश्चितपणे कोणतीही आस्थापना असे कोणतेही खर्च करणार नाहीत.
७ ) दुसऱ्या बाजूस मराठी विकिपीडियाचा तांत्रिक पार्श्वभूमी नसलेला मोठा सदस्य वर्ग मुक्त आणि अमुक्त अशा दोन्ही वर्गातील वेगवेगळ्या ऑपरेटींग सिस्टीम्स आणि ब्राऊजर्सवर अवलंबून होता आहे आणि भविष्यातही असणार आहे. त्यांना सहजपणे पेलवेल अशी दर्जेदार माहिती मुक्त अमुक्त असा भेदभाव न करता मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हे नैतिक दृष्ट्या उचितच नव्हे तर सर्व सामान्य सदस्यांच्या सहाय्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.
८) मुखपृष्ठ सदर बनवताना अधिकतम सदस्यांचे सहकार्य लाभून लेख दर्जेदार होण्यास सहाय्य होते त्यामुळे जो लेख आधी पूर्णत्वास जाईल आणि सहमती मिळवेल त्या लेखास भेदभावा शिवाय मुखपृष्ठ सदर करण्यात काही वावगे नाही.


मी आपल्याशी चर्चा चालू केल्यांनतर वस्तुत: आपण मराठी विकिपीडियावर आला सुद्धा नाहीत आणि कोणतीही टिका आपण केली नाहीत तरी सुद्धा इतर सदस्यांच्या समोर योग्य बाजू मांडणे माझे कर्तव्य होते. त्या शिवाय इतरत्र मी सर्व शंकांचे निरसन करण्याचा माझ्या परिने प्रयत्न करेन असे वचन दिले त्याची पुर्ती हाच हेतु आहे. जुने वाद उकरणे अथवा नवीन वाद चालू करणे हा उद्देश नाही.तसेच इतर विवाद चर्चा विषयांना संपवण्याचाही येथे उद्देश नाही.

आपल्या बद्दल आणि आपण केलेल्या टिकेबद्दल माझ्या मनात कसलाही किंतु मुळीच नाही वर लेखन करताना कुठे चुकलो असेन तर क्षमाप्रार्थी सुद्धा आहे. मी माझी मते आपल्या समोर मोकळे पणाने मांडली. आपण आपली मते मागच्याच मोकळे पणाने या पुढेही मांडत रहा.मन मोकळे पणाने मते मांडली कि जुने पाठीशी घालून पुढचा मार्ग पुन्हा एकदा नव्या जोमाने मार्गक्रमीत करण्यास उत्साह येतो.आपण इतरांनाही व्यक्तिगत टिकेपासून आणि चारीत्र्यहनन करणाऱ्या आरोपबाजी पासून दुर रहाण्यात प्रोत्साहीत करावेत हि सुद्धा एक नम्र विनंती

आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो हि शुभेच्छा.

(माझे लेखनात प्रदिर्घतेचा दोष आहे ते बरेच दिवस सावकाशीने चालू रहाते पण सहसा माझे लेखन भविष्यात सहाय्य पाने बनवण्याकरता माझा प्रयास असतो ज्याचा इतर नवागतांना उपयोग होतो आणि आपल्याशी विवीध मुद्दांवर चर्चाकरण्याचा हा देखील एक उद्देश आहे.) चुकभूल देणे घेणे आपला माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५३, २० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

, त्यागपत्र दिजिये

संपादन

Mahitgar (), You have not replied to any of the comments and allegations made during the last month made by various editors and now you have started to give explanation by locking the main pages? Who has given you that authority? Only because, we simple people people should not edit those? Better you first resign from your admin post and then open your mouth.... so , त्यागपत्र दिजिये ..... Meshram123

, त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये |

तुमच्या अलीकडील साम्पादानान्बद्दल

संपादन

प्रिय नानू, तुमची अलीकडील संपादने वाचून अतिशय दुक्ख झाले. विकीपेडिया वरील अनेक सदस्यांचा वेळ वाया घालवणे योग्य नव्हे. संपूर्ण विकीपेडिया समाजाला तुम्ही वेठीस धरू इच्छिता असे दिसते. आपले म्हणणे जर योग्य असेल तर ते रचनात्मक पद्धतीने मांडणे योग्य राहील. केवळ वादासाठी वाद घालून सर्वांचा वेळ वाया घालवणे मला अयोग्य वाटते आणि अश्या कृतींचा मी निषेध करतो. मी तुम्हाला सल्ला देण्यासाठी पात्र आहे की नाही हे माहीत नाही, पण संपूर्ण समाजाच्या विरोधात काम करणे (कुठलाही चांगला हेतू नसताना) हे अतिशय चुकीचे आहे आणि त्यातून काहीही चांगले निष्पन्न होत नाही. धन्यवाद. आभिजीत ११:२१, ३ मे २०१२ (IST)Reply


Mahitgar - Chale Jao

संपादन

Dear Nanu ji,

Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....

Mahitgar

संपादन

Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.

With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.

With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.

Now in Marathi –

माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.

Ujjwal Nikam (चर्चा) २१:२१, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

Your account will be renamed

संपादन

०९:१७, १८ मार्च २०१५ (IST)

१५:१४, १९ एप्रिल २०१५ (IST)

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार Nanu~mrwiki,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.