विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २०
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
मराठी प्रचलित शब्द की मुळ शब्द ??
संपादनवरील प्रश्नासंबंधी मराठी विकीचे काय धोरण आहे?
- उ.दा. कानडी भाषेवरील लेखाचे नाव मुळ शब्दाप्रमाणे नाव कन्नड भाषा वापरले आहे. त्याचवेळी बंगाली भाषा असा लेख आहे. सुसुत्रतेच्या दृष्टीने या लेखांची नावे अनुक्रमे
- १ मराठीतील रुढ नावांप्रमाणे - कानडी, बंगाली
- किंवा
- २ मुळ नावांप्रमाणे - कन्नड, बांग्ला
- हवीत
वाचकांची सोय, इतर विकीवरील रिवाज बघता पर्याय १ योग्य आहे.
कृपया आपली मते मांडावीत
Dakutaa ०८:५५, २ जानेवारी २००९ (UTC)
मराठी विश्वकोश
संपादनकाही प्रश्न आहेत.
- १ Ward Cunningham ( विकी प्रकल्पाचे जनक) यांच्या एका व्याख्यानाचा गोषवारा वाचला. त्यात अर्थातच भारतीय भाषिक विकींचा उल्लेख होता. सध्या सुमारे ४२००० लेखांसह तेलुगू प्रथम असल्याचे समजते. याशिवाय त्यांनी केरळ सरकार व विकी च्या संयुक्त प्रयत्नांचा उल्लेख केला. मल्याळम मधील छापील कागदी विश्वकोश विकी मार्फत अंकीय करणे हे त्याचे स्वरुप आहे.
महाराष्ट्र सरकार कडे असा प्रस्ताव विचाराधीन आहे काय ?
- २ सध्या जरी असा करार नसला तरी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सुरू केलेल्या मराठी विश्वकोश अतिशय संपन्न आहे. विकी लेखांसाठी त्यातील मजकूर उचलला तर ते कोणत्या प्रताधिकाराचा भंग ठरते काय ???
विश्वकोश प्रताधिकार घोषणा
संपादनविश्वकोशाची प्रताधिकार घोषणा काय म्हणते हे महत्त्वाचे ठरावे. ती घोषणा काय आहे हे कळेल काय? परंतु याच वेळी काही (मर्यादीत) गोष्टींवर प्राताधिकार असणे शक्य होत नाही. जसे काही त्रिकालाबाधित सत्ये - (उदा. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.) मात्र त्याच्या सादरीकरणावर त्यातल्या शब्द योजनेवर प्रताधिकार असतो. त्याच वेळी रचना बदलून ती माहिती वापरता येणे शक्य आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे की विश्वकोशाची निर्मितीही माहितीचे/ज्ञानाचे संवर्धन व्हावे म्हणूनच झाली आहे.
प्रताधिकार मर्यादा: वॉल्ट डिस्ने या विख्यात कंपनीने अमेरिकेत आपल्या डिस्ने नगरीवरील सायंकाळच्या आकाशाच्या रंगाचा प्रताधिकार घेण्यासाठी दावा दाखल केला होता. परंतु हा दावा फेटाळला आणि प्रताधिकार त्यांना दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या डिस्ने नगरीची आउटलाईन असलेले चित्रच लोगो म्हणून वापरावे लागले असे वाचल्याचे स्मरते.
मराठी नाती
संपादनमराठी विकिपीडियावर मराठी नाती यासंबंधातील लेख बनविण्याची माझी इच्छा आहे.
कृपया सदस्य:Padalkar.kshitij/मराठी नाती येथे आपले मत मांडा.
क्षितिज पाडळकर ०५:०३, २० डिसेंबर २००८ (UTC)
फ्रांस --> फ्रान्स
संपादनसंकल्प यांच्या सूचनेनुसार फ्रांस नावाची सर्व पाने व वर्ग फ्रान्स या नावाखाली स्थानांतरित करण्यात यावी.
मला यातील बरोबर काय ते माहित नाही आहे, पण एकच common convention असावे. सद्ध्या वर्ग:फ्रांस व वर्ग:फ्रान्स दोन्ही अस्तित्वात आहेत.
आपला या स्थानांतरणाला विरोध असेल किंवा इतर सूचना असतील तर कृपया इथे मांडा. त्यानुसार मी ही स्थानांतरणे करेल.
क्षितिज पाडळकर ०१:१४, २८ डिसेंबर २००८ (UTC)
- क्षितिज,
- यावर पूर्वी चर्चा झाली आहे. जुन्या चावडी पानावर ती सापडेल. सदस्य J (ज्यांना भाषा/व्याकरण यांत बरीच गती आहे) यांच्या मते फ्रांस बरोबर आहे.
- अभय नातू ०५:५८, २८ डिसेंबर २००८ (UTC)
- ओह...sorry
- मला माहित नव्हते.
- मला ती चर्चा भेटत नाही आहे..त्या चर्चेअंती काय निर्णय झाला होता?
- वर्ग:फ्रांस व वर्ग:फ्रान्स दोन्ही अस्तित्वात असणे confusing आहे. एक काहीतरी असावे.
- क्षितिज पाडळकर ०६:३९, २८ डिसेंबर २००८ (UTC)
नामविश्व भाषांतरण
संपादन- Dear Friends,
- undersigned wants to put following request at https://bugzilla.wikimedia.org/ to programmers of MediaWiki software to make apropriate changes in Sanskrit Language Wikipedia.Undersigned requests openions or support from those who know Sanskrit Language.Please do reply at your earliest or post your comment directly at संस्कृत विकिपीडिया:ग्रामस्य चौपालम्
- Mahitgar १५:०३, १ पौषमाघे २००९ (UTC)
- Dear Wikimedia Programmers,
- Since undersigned wants to create new articles in Sanskrit Language Wikipedia specialy in "Wikipedia" and "Help" Namespace;Correction in Namespace Names will help me and Sanskrit Language Wikipedia a Long way. We kindly request following localisation of Sanskrit Language Wikipedia at https://bugzilla.wikimedia.org/
- Namespace Current English Name 'Wikipedia' change the same to Sanskrit विकिपीडिया
- Namespace Current semi-English Name 'Wikipediaसंभाषणं' change the same to Sanskrit विकिपीडिया संभाषणं
- Namespace Current English Name 'MediaWiki' change the same to Sanskrit मिडियाविकि
- Namespace Current English Name 'MediaWiki talk' change the same to Sanskrit मिडियाविकि संभाषणं
- Namespace Current English Name 'Template' change the same to Sanskrit बिंबधर
- Namespace Current English Name 'Template talk' change the same to Sanskrit बिंबधर संभाषणं
- Namespace Current Sanskrit Name 'उपकार:'(stands for 'Help') change the same to Sanskrit साहाय्य
- Namespace Current Sanskrit Name 'उपकारसंभाषणं' (stands for 'Help talk') change the same to Sanskrit साहाय्य संभाषणं
- Notes:
- 1)बिंबधर is a newly created applied term for Template.बिंब means an image that can transclude,and since a wikipedia template holds and helps transclude an image term created in sanskrit is बिंबधर
- 2)Help Namespace 'उपकार:' is being requested to be changed since 'उपकार:' means 'favour' where as right word for 'Help' in Sanskrit is available and is साहाय्य so this namespace change is being requested.
- Please do reply at your earliest or post your comment directly at संस्कृत विकिपीडिया:ग्रामस्य चौपालम्
- Mahitgar १५:०३, १ पौषमाघे २००९ (UTC)
चित्रे व चलचित्र फीत
संपादननमस्कार, मी बरीच चित्र संचिका चढवल्या आहेत. त्या योग्य-अयोग्य आहेत/नाहीत हे नक्की कळवा. लेखात वगैरे वापरू शकलात तर फारच उत्तम. शिवाय चलचित्र कसे चढवायचे याचे काही मार्गदर्शन मिळेल का? आपला निनाद निनाद ११:५६, २ जानेवारी २००९ (UTC)
- तुम्ही चढवलेली छायाचित्रे तुम्हीच काढली आहेत का? नसली तर ती प्रताधिकारमुक्त आहेत का?
- अभय नातू १६:४८, २ जानेवारी २००९ (UTC)
- हो सर्व प्रकाशचित्रे मीच काढलेली आहेत, आणि मी इथे असे घोषित करतो की ती प्रताधिकार मुक्त आहेत. आणि मह्नूनच मी ती येथे चढवीत आहे.
- निनाद ०५:५८, ३ जानेवारी २००९ (UTC)
- चलचित्र कसे चढवायचे याचे काही मार्गदर्शन...?
- निनाद ०५:५९, ३ जानेवारी २००९ (UTC)
- निनाद, चलचित्र चढविण्यासाठी माहिती इथे दिली आहे.
- तसेच चित्र:जुने टेलिफोन एक्स्चेंज.JPG हे चित्र फिरवून (rotate) परत टाकावे.
- आणि आपण छायाचित्रे स्वतः कॅमेर्याने काढली आहेत का? जवळपास सर्व छायाचित्रांमध्ये उजव्या कोपर्यात छायाचित्र काढल्याचा दिनांक आहे. तो चित्राचा दर्जा (quality) थोडी कमी करतो (असे मला वाटते.) आपली परवानगी असल्यास मी ते काढण्याचा प्रयत्न करू शकतो.
- क्षितिज पाडळकर ०१:११, ४ जानेवारी २००९ (UTC)
चित्रात बदल
संपादनप्रतिसाद -जुने टेलिफोन एक्स्चेंजचे चित्र फिरवून (rotate) परत टाकतो. हे एक्स्चेंज मेलबर्न जवळच्या एका संरक्षित बेटावर (फ्रेंच आयलंड येथे) 'डिस्प्ले' म्हणून शोभा वाढवायला लावलेले सापडले. मग मोह आवरलाच नाही आणि चित्रे काढली - (पण आता रिनोव्हेशन साठी हे एक्स्चेंज भंगार मध्ये टाकणार आहेत.) खरे तर मी त्याचे इतरही चित्रण केले आहे. म्हणजे लेख लिहिणे सोपे व्हावे असे. पण लिहायला वेळच मिळाला नाहीये. विकि डोक्यात आल्यावर इतर होडी वगैरे चित्रे पण अशीच काढत सुटलो. पण विकिवर चढवायला फार वेळ लागतो हो चित्र!
चित्रातला दिनांक
संपादनमला वाटते की छायाचित्रात दिनांक असणे चांगले आहे. उदा. मी नाशिकच्या महात्मा गांधी रस्त्याचे काढलेले चित्र हे २००४ चे आहे हे स्पष्ट होते. व आता कदाचित हा परिसर बदलला असेल याची जाणीव राहते. म्हणून काहीवेळा दिनांक महत्त्वाचा ठरतो असे वाटते. दिनांक दिसण्याने दर्जा कमी जास्त होतो का याविषयी मी विचार केला नाहीये. सर्वानुमते मला सांगा, मग मी पुढची चित्रे दिनांक विरहीत काढीन. क्षितिजला दिनांक काढायचा असल्यास माझी ना नाही - बिंधास्तपणे सुयोग्य असलेले हवे ते बदल कर! मी माझा अधिकार सोडलाच आहे. (सोडायचाही प्रश्न नाही, कारण मी ही चित्रे विकिसाठीच काढली आहेत.) चलचित्राच्या दुव्या बाबत धन्यवाद!
प्रकाश चित्रण प्रताधिकारमुक्तीची पुनःघोषणा
संपादनमराठी विकिवर चढवलेली सर्व चित्रे, मी, निनाद ने, स्वखर्चाने विकत घेतलेल्या कॅनन ९७० आय. एस. या कॅमेर्याने (त्याची पावती आहे आणि कॅननकडे हा कॅमेरा नोंदणीकृत आहे!) माझा स्वतःचा प्रवास तसेच वेळ खर्च करून माझ्या हाताने माझ्या मालकीच्या कॅमेर्याचा स्वीच मी स्वतःच माझ्या बोटाने दाबून काढली आहेत. या सर्व चित्रांची मुळ प्रत माझ्या कडे सुरक्षित आहे. हवी असल्यास माझी ती प्रिंट करून पाठवण्याची तयारीही आहे. (आशा आहे ही पुनःघोषणा हलके घ्याल! ;)) )
आपला - प्रताधिकाराची पूर्ण जाणीव असलेला
निनाद २३:३९, ४ जानेवारी २००९ (UTC)
- हे प्रत्येक चित्रावर लिहायला हवे आणि तेथे क्रियेटीव्ह कॉमन्स किंवा जीपीएल परवान्याखाली टाकल्यास सर्वोत्तम. - 122.172.48.34 १४:१२, ६ जानेवारी २००९ (UTC)
- क्रियेटीव्ह कॉमन्स किंवा जीपीएल परवान्याखाली चित्र कसे टाकायचे? टप्पेदार मार्गदर्शन मिळेल काय? निनाद २३:३०, ६ जानेवारी २००९ (UTC)
कॉमन्सवर चित्रे
संपादनकृपया कॉमन्सवर चित्रे चढवा, तेथील चित्रे कुठलाही विकिप्रकल्प (मराठी, इंग्लिश, नेपाळी, विकीबुक्स, विकिस्रोत वगैरे) थेट वापरू शकतो. तेथे या परवान्यांची माहितीही आहे. --- कोल्हापुरी ०४:३९, ७ जानेवारी २००९ (UTC)
- कॉमन्सवर चित्रे चढवायला गेलो पण तेथे मराठी मध्ये शोध आणि कळफलक नाहीये :( शिवाय मला चित्राचे नाव देवनागरी/मराठी भाषेतच द्यायचे आहे. त्यामुळे तेथे चित्र चढवायला आवडले असते तरी, मला इकडे तिकडे टंक करून चिकटवण्याचा सोस करायचा नसल्याने, मी ही चित्रे 'मराठी विकिलाच' द्यायचे ठरवले आहे.
यावर काही मत/पर्याय असल्यास कळवा, मी विचार करेन. निनाद ००:५०, १० जानेवारी २००९ (UTC)
वर्ग नावे
संपादनवर्ग नावे एकवचनी असावीत की अनेकवचनी?
उदा. वर्ग :इंधने योग्य की वर्ग :इंधन ?
माझ्या मते अनेकवचनी असावेत, कारण ते अनेक लेखांना एकत्र आणतात.
त्याचा प्रघात पडावा म्हणून इथे ही चर्चा चालू करत आहे.
क्षितिज पाडळकर ०३:३७, ८ जानेवारी २००९ (UTC)
- वर्गनावे सहसा अनेकवचनी असावीत.
- अभय नातू ०५:२१, ८ जानेवारी २००९ (UTC)
- अनेकवचनी योग्य वाटते
Dakutaa ०६:१६, १० जानेवारी २००९ (UTC)
हरवलेली संपादने??
संपादनआत्ता मला असे आढळून आले की जानेवारी १०च्या पहाटे ३-३:३०नंतर मराठी विकिपीडियावर केली गेलेली सगळी संपादने नाहीशी झाली आहेत. अजून कोणाला असे दिसत आहे कि फक्त माझ्या संगणकावर हे दिसते आहे?
जर नक्की झाले की खरेच ही संपादने नष्ट झाली आहेत तर मिडियाविकीवर तक्रार करावी लागेल.
अभय नातू १६:१५, १२ जानेवारी २००९ (UTC)
हरवलेली (नसलेली) संपादने
संपादनसगळे यथास्थित. माझा संगणक तात्पुरता भ्रमिष्ट झाला होता असे वाटते.
अभय नातू १७:१०, १२ जानेवारी २००९ (UTC)
पानांची संख्या
संपादनमराठी विकिवरील पानांची संख्या मुखपृष्टावर कधी अपडेट होते? कुठली संख्या करंट धरायची? निनाद २२:५०, १७ जानेवारी २००९ (UTC)
पानांची संख्या
संपादनमुखपृष्ठावरची सांख्यिकी लगेच अपडेट होते पण तुमच्या न्याहाळकाच्या सयीत काही काळापर्यंत जुनीच राहते. सय रिकामी केल्यास नवीन आकडे दिसतील.
त्याहून सोपे म्हणजे या पानावरचे आकडे बघावे.
अभय नातू २३:१२, १७ जानेवारी २००९ (UTC)
२२००० लेख
संपादनमराठी विकिपिडिया आता २२००० लेखांसह ५७व्या स्थानावर पोहोचला आहे. हेमामालिनी हा २२००० वा लेख आहे! वाढत्या लेखांच्या संख्येबरोबरच आता दर्जाकडेही आपण सगळे मिळून लक्ष देवू या आणि मराठी विकि मध्ये ज्ञानाची अजून भर पडेल असे पाहुया! आपला निनाद १३:०८, १९ जानेवारी २००९ (UTC)
- आपल्या सर्वांचे अभिनंदन !!!
या वेगाने ३ महिन्यात २५ हजारी होऊ !!!! खरे तर संख्येपेक्षा ही दर्जा महत्त्वाचा आहे. आपले बरेचसे लेख शीर्षके आहेत. असे लेख नसले काय अणि असले काय फारसा फरक नाही. Dakutaa १३:३४, १९ जानेवारी २००९ (UTC)
- लेखांची किमान शीर्षके तरी आहेत? भरा ना मग त्यात माहिती, कुणी अडवले आहे? आणि वाढत्या लेखांच्या संख्येबरोबरच आता दर्जाकडेही आपण सगळे मिळून लक्ष देवू या हे वाचले नाही वाटते?
निनाद ०६:२८, २० जानेवारी २००९ (UTC)
- निनाद,
माझा उद्देश आपल्याच मताची द्विरुक्ती करणे होता. कृपया गैरसमज नसावा. मराठी विकीचे अपुरे लेख हे वापरकर्त्यांना त्रासदायक वाटू शकतात. [पहा ]
- मराठी विकीसाठी उधार उसणवारी :) (लेख विशेषतः चित्रे) करायला मी ब-याच भारतीय विकीवर फिरत असतो. मल्याळम विकीबाबतचे माझे एक निरिक्षण सांगावेसे वाटते. त्यांच्या विकीवर जवळपास ८००० (केवळ!!!) लेख आहेत. पण जितके लेख मी चाळले आहेत; ते सर्व लांबीने ब-यापैकी/चांगले होते.
मराठी विकीच्या वापरकर्त्याची हीच भावना व्हावी असे वाटते.
दर्जाकडेही आपण सगळे मिळून लक्ष देवू या
- पुन्हा एकदा सहमत
Dakutaa ०७:०३, २० जानेवारी २००९ (UTC)
- ओक्के डाकुटाराव! नो ड्रामा - मला तुमच्या लेखाचा उद्देश समजला - गैरसमजही गेला! आपला निनाद ०३:५२, २४ जानेवारी २००९ (UTC)
मराठी लेखक माहिती
संपादनमाझे वडील विजय पाडळकर हे मराठीतील प्रथितयश लेखक असून त्यांनी या विकि-उपक्रमाला मदत करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार ते मराठी लेखकांबद्दलची माहिती लिखित स्वरूपात मला देतील तसेच इतरांकडूनपण ती जमा करण्याचा प्रयत्न करतील.
ही लिखित स्वरूपातील (scan केलेली) माहिती मी त्यानुसार टंकलिखित करत जाईल. यामध्ये आपली मदतसुद्धा अपेक्षित आहे.
क.लो.अ.
क्षितिज पाडळकर ११:३०, २२ जानेवारी २००९ (UTC)
जरूर ! scan केलेली पाने येथे चढवून नंतर manually बघून टंकणे असे स्वरूप अपेक्षित आहे का ?
- स्वरूप कसे ही असो, टंकायला मी नक्कीच मदत करेन.
- मी महाराष्ट्रात राहत नसल्याने मला मराठी पुस्तकांचा access मर्यादित आहे.
- scan करून पाने चढवली तर इतर विषयावरही मी लेख लिहिन म्हणतो.
- माझा टंकायचा वेग ब-यापैकी आहे. :)
Dakutaa १२:३०, २२ जानेवारी २००९ (UTC)
- धन्यवाद Dakutaa.
- सद्ध्या माझ्या मनातील स्वरूप आपण म्हणल्यासारखेच आहे.
- माझ्या वडिलांनी साहित्यिक परिवारातील तसेच मराठी शिक्षणक्षेत्रातील मित्रांना किमान एका-एका लेखकावर ज्ञानकोश स्वरूपात माहिती लिहून पाठविण्याचे आवाहन केले आहे.
- यानंतर ते मला scan केलेला लेख पाठवतील. मी ते टंकलिखित करण्याचा प्रयत्न करेलच तसेच आपण किंवा विकिवरील इतर इच्छुक सदस्य यांना Email करेन.
- या लेखांच्या मूळ लेखकांचा उल्लेख किमान लेखाच्या चर्चापानावर व्हावा असा माझा मानस आहे. त्याबद्दल इतर सदस्यांचे काय विचार आहेत ते कळवावे. यानुसार मी एक साचा बनवेन.
- तसेच या लेखांचे स्वरूप कसे असावे याबाबतही काही सूचना असतील तरी तर त्याही सांगाव्या.
- क्षितिज पाडळकर १७:०८, २२ जानेवारी २००९ (UTC)
- वाहवा! अशी तज्ज्ञांनी दिलेली माहिती विकिपीडियावर लिहिली असता येथील खात्रीलायकता खचितच वाढेल.
- चर्चा पानावर लेखकाचे नाव देण्यास माझा पाठिंबा आहे. सहसा विकिपीडियावर लेखकाचे नाव लिहिले जात नाही पण येथे अपवाद करता येईल कारण १. त्याने माहितीची खात्रीलायकता वाढेल आणि २. ही माहिती प्रतिमुद्रित असल्यामुळे विकिपीडियावरील लेखक व माहितीचा उद्गाता यांचे वेगवेगळे योगदान उद्धृत होईल.
- मी ही माहिती टंकित करायला उत्सुक आहे.
- अभय नातू ०३:०९, २३ जानेवारी २००९ (UTC)
- या संचिका मराठी विकिपीडियावर चढवून वापरता आल्या तर बरेच, संचिका चढवण्यात आणि उतरवण्यात काही अडचण आल्यास त्या आपल्या मराठी विकिच्या याहू ग्रूप वरही चढवता येतील.मराठी पूस्तकांची त्रोटक यादी यापूर्वी याहू ग्रूपच्या फाईल सेक्शन मध्ये चढवली आहे तीचाही माहिती टंकनक करताना सुयोग्य उपयोग आवर्जून करावा.
- धन्यवाद
- Mahitgar १५:१६, २३ जानेवारी २००९ (UTC)
लेखांचा साचा
संपादनया लेखांचे रूप साधारणपणे पु.ल. देशपांडे या लेखासारखे असावे. जर तितकी माहिती उपलब्ध नसेल तर लिओ टॉल्स्टॉय या लेखासारखा करावा.
अभय नातू ०३:३६, २३ जानेवारी २००९ (UTC)
माहितीचौकट रेल्वे गाडी
संपादनमी {{माहितीचौकट रेल्वे गाडी}} हा साचा तयार केला आहे आणि महालक्ष्मी एक्सप्रेस लेखात तो वापरला आहे. तज्ज्ञांनी तो तपासून पहावा व त्रुटी, बदल कळवावे.
अभय नातू ०२:५५, २४ जानेवारी २००९ (UTC)
दख्खनची राणी
संपादनदख्खनची राणी या लेखात {{माहितीचौकट रेल्वे गाडी}} हा साचा मी घातला आहे. त्यातील शेवटचा रकाना (नकाशा) जरुर पहावा. मोठी फाइट मारुन मी हे रेल्वेमार्गचित्र साचे येथे आणले आहेत. त्यांचे मराठीकरण व सुसुत्रीकरण सुरू आहे. तरी हे वापरुन पहावे व त्रुटी किंवा बदल कळवावे.
अभय नातू ०७:४७, २५ जानेवारी २००९ (UTC)
जगातील देशांची यादी
संपादनमी जगातील देशांची यादी हा लेख तयार करीत आहे. लेख मोठा आहे व बर्याच भाषांतराची गरज आहे. जमेल तशी सर्वांनी मदत करावी. अभिजीत साठे २३:२०, २७ जानेवारी २००९ (UTC)
मि मदत् करु शकतो का ?
असल्यास् माझि तयारी आहे .
- हो, तुम्ही मदत करू शकता.
- तुम्ही येथे सदस्यत्व घेतले तर हे काम सोपे होईल.
- वर उजवीकडे नोंदणी करा वर टिचकी मारल्यास सदस्यत्व घेता येईल.
- अभय नातू २२:४३, २ फेब्रुवारी २००९ (UTC)
अतिशय अभिमानास्पद विकिपीडिया
संपादनमराठी मायबोली हिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे.त्यामुळे विकिपीडिया खरोखरच कॉतुकास्पद आहे
कोलंबिया अंतराळयान
संपादनस्पेस शटल कोलंबिया हा लेख बनवला आहे. त्यात अजून खाली इतर यानांचेही दुवे द्यायला हवे आहेत. ते कसे द्यायचे? स्पेस शटल चॅलेंजर या पेक्षा हा दुवा चॅलेंजर अंतराळयान हा दुवा योग्य आणि 'मराठी' वाटतो. कृपया हा बदल करता येईल का? तसेच स्पेस शटल कोलंबिया बदलून कोलंबिया अंतराळयान असे करता येईल का? कृपया अंतराळ यान अशी माहिती चौकटही बनवावी. मग सर्व अंतराळयानांची माहिती सारखी व एकत्रीत दिसु शकेल असे वाटते. निनाद ०१:३८, ४ फेब्रुवारी २००९ (UTC)
- सगळ्या स्पेस शटलची नावे असलेला साचा मी तयार करतो.
- स्पेस शटल या नावात वारंवार वापरता येणारे वाहन हा अर्थ अभिप्रेत आहे. अंतराळयान म्हणजे स्पेस वेहिकल होईल. कोणत्याही अंतराळात जाणार्या वाहनाला अंतराळयान म्हणता येईल, जसे चांद्रयान, अपोलो १-१७, लुना १-, इ. तेच यान वारंवार वापरता येणे हा स्पेस शटलचा महत्त्वाचा गुणधर्म आहे तरी शटल या शब्दाचा मराठी प्रतिशब्द वापरून तसे म्हणावे.
- अभय नातू ०१:४५, ४ फेब्रुवारी २००९ (UTC)
इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा
संपादनजालावर भ्रमण करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या विश्वकोशात ज्या पारिभाषिक संज्ञा वापरल्या त्यांची यादी (येथे) सापडली. ही यादी Scanned PDF स्वरूपात आहे. आपल्या मराठी विकीवरच्या येथे आहेत.
संज्ञांच्या वापरात सुसुत्रता असावी यासाठी वरील यादी Digital स्वरूपात मराठी विकीवर साठवावी असे वाटते.
याचे फायदे / कारणे अशी -
१. ही यादी तज्ञांनी केली असल्याने विश्वासार्ह आहे
२. हे शब्द आधीच मराठी कोशांमध्ये वापरले आहेत. नवीन शब्द शोधण्याऐवजी तेच शब्द वापरल्याने वाचकांचा गोंधळ टळेल. (Consistancy )
अर्थात हे Digital करण्याचे काम मोठे असल्याने हा एक प्रकारचा प्रकल्पच होईल.एकूण १३८ पाने आहेत. सर्वांच्या मदतीने पाने वाटून घेतली तर एक चांगले व पायाभूत काम होऊन जाईल. तुम्हाला काय वाटते ? Dakutaa ०९:३२, ५ फेब्रुवारी २००९ (UTC)
प्रताधिकार
संपादनहा कोश व त्यातील मजकूर प्रताधिकारित आहे का? माझ्या आठवणीनुसार महाराष्ट्र सरकारकडे हे प्रताधिकार आहेत. ते अजूनही अबाधित आहेत का?
पारिभाषिक संज्ञांवर प्रताधिकार असण्याचे कारण नाही, पण तरीही एक शंका.
अभय नातू १५:३०, ५ फेब्रुवारी २००९ (UTC)
- पारिभाषिक संज्ञांवर प्रताधिकार असण्याचे कारण नाहीच! कारण जसे मी मागे म्हणालो तसे वैश्विक सत्यांवर प्रताधिकार आणता नसतो. 'पृथ्वी आपल्या आसा भोवती गोल फिरते' हे वाक्य विश्वकोशात असले तरी या वाक्यावर प्रताधिकार कसा आणता येईल? पारिभाषिक संज्ञा सारख्याच असाव्यात यात शंका नाही. तसेच या संज्ञा सगळीकडे सारख्याच वापरल्या जाव्यात या हेतुनेच तर्कतीर्थांनी त्या एकत्रीत केल्या होत्या. आज राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी विकि मार्फत मराठी जनतेने जरी विश्वकोशाची वेगळी चूल मांडली असली तरी त्यात याच संज्ञा वापरण्याला तर्कतीर्थ कधीच नाही म्हणणार नाहीत! त्यांचीही भावना ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे हीच! आपल्यापैकी कुणी वाईला रहात असेल तर योग्य व्यक्तिंची भेट घेउनही तसे विशद करून घेता येईल. त्यामुळे दाकुताच्या म्हणण्याला माझाही पाठींबा आहे. या संज्ञा युनिकोडीत झाल्या आणि त्याच वापरल्या गेल्या तर फार बरे होईल! आपला निनाद ००:४६, ६ फेब्रुवारी २००९ (UTC)
- प्रताधिकार असेल असे वाटत नाही; कारण या संज्ञा(च) वापरल्या जाव्यात हा उद्देश होता. त्यामुळे आपले प्रयत्न हे याचा प्रचार-प्रसार व्हावा या मुळ उद्देशाशी सुसंगत आहे.
तरीपण खात्री होईपर्यंत आपण मराठी विकीवरील लेखावर ठळक Banner लावून वरील PDF चा दुवा देणे हा तात्पुरता पर्याय चांगला आहे. जेणेकरून पारिभाषिक संज्ञा शोधण-यांना सोईचे राहिले. तुम्हाला काय वाटते? Dakutaa ०३:४२, ८ फेब्रुवारी २००९ (UTC)
संदर्भा सहित लेखन
संपादनविकिवर लेख लिहितांना संदर्भांचाही विचार व्हावाच! कारण इंग्रजी, जर्मन व इतर लेखांमध्ये विकिवर मोठ्या प्रमाणात संदर्भ आहेत. त्यामुळे त्या लेखांप्रमाणे संदर्भासहित येथे ही लिखाण व्हावे. संदर्भामुळे लिखाणाचा दर्जाही वाढतो. इंग्रजी (अथवा जी भाषा योग्य वाटत असेल ती) लेख येथे चिकटवून नंतर क्रमवार भाषांतर करत गेल्यास संदर्भ तसेच राखुन यशस्वी लेखन होउ शकते. मी हे नदी नावाचा लेख करतांना केले. व ते जमत गेले. त्यात काही योग्यरीतीने आले नसेल तर कृपया ते नदी च्या चर्चा पानावर कळवा! निनाद ०३:३४, ७ फेब्रुवारी २००९ (UTC)
विकिपीडिया:लोगो,लेखन चर्चा
संपादनमला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
- Request was made at [bugzill bug no.16857] bugzill has requested that,The image should be no bigger than 135 x 155 pixels, please fix it and reopen this bug. undersigned does not have requisite skills needed for the same please some one do help by providing needful change to bugzill
Thanks and regards
Mahitgar ०७:५८, ८ फेब्रुवारी २००९ (UTC) (Copyright image from Marathi Language wikipedia is being taken for using as matches with gramatically correct Sanskrit language wording and writing system.Image was posted by user user:कौस्तुभ on Marathi Language Wikipedia & commons as authorised logo for Marathi Language Wikipedia and the same is proposed tobe used on Sanskrit Language Wikipedia )
Image is updated
- at Sanskrit Wikipedia sa:चित्रं:Wiki.png
- at commons:File:Wikipedia-logo-sa.png
- at meta:Wikipedia_in_other_languages
समर्थन करोति Mahitgar ०९:२०, १ पौषमाघे २००९ (UTC)
Though I am not a great expert on Sanskrit, I do agree that second change to use "Sahay" instead of "upkar" makes sense. This is from my understanding of other indian languages , especially Hindi.
अहं समर्थन करोति| I agree with all the namespaces suggested, though I am not master or formally qualified in Sanskrit, but have studied sanskrit and am continuing studying it informally by reading scriptures and their translations, which has taught me a lot.--Dsvyas १२:५८, १४ पौषमाघे २००९ (UTC)
- मी काही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पहा. mr:चित्र:wiki1.png mr:चित्र:wiki3.png mr:चित्र:myWiki4.png - कोल्हापुरी १३:२९, ९ फेब्रुवारी २००९ (UTC)
मदत
संपादन[[nl:Bestand:Diafragma ademhaling.gif]] या चित्राचे मराठीकरण कोणी करू शकेल ??
गुगल मध्ये शोधात मराठी विकि चे लेख शेवटी का?
संपादनखालील संदेश कट्यारेंनी लिहिला -- नमस्कार, मी बरेचदा लेखन करण्याआधी विकिवरील शोधा प्रमाणे गुगलवरही शोध घेतो. (असे करणे उपक्रमावरून सोपे जाते!) मात्र दुर्दैवाने या शोधात मला नेहमीच हिंदी शोध निकाल दिसतात. एखादा शब्द अगदी खास मराठी म्हणजे 'कमळ' असा असेल तरच मराठी विकिचे लेख सापडतात. गुगल शोधा मध्ये हिंदी विकि नंतर चिठाजगत नि तत्सम नावे असलेले फालतु निकाल समोर येतात पण मराठी निकाल चटकन दिसतच नाहीत. असे गुगल मध्ये शोधात मराठी विकि चे लेख शेवटी का येतात? खरे म्हणजे हिंदी-मराठी विकिच्या लेखसंख्येत फार फरक नाहीये. मग हिंदी विकि गुगल ला प्यारा का आहे? (त्यातले हिंदी चित्रपट काढले तर कदाचित चांगल्या लेखांची संख्या मराठी पेक्षा कमीच भरेल, तरीही?) की मराठी विकि शोधयंत्रांच्या तांत्रिक गोष्टीत कमी पडतो आहे? जर आपण केले कष्ट मराठी माणसाला दिसणारच नसतील तर त्या सगळ्याचा काय उपयोग आहे? आपला चिंताग्रस्त
- याचे कारण म्हणजे मराठीतील लेखनाचा अभाव. मराठीभाषकांची संख्या अंदाजे ५ कोटी आहे, तर हिंदीभाषक ८-१० कोटी आहेत.
- काही कारणाने हिंदीभाषक आंतरजालावर देवनागरीत जास्त लेखन प्रकाशित करतात.
- अभय नातू ०४:२७, १२ फेब्रुवारी २००९ (UTC)
- 'मराठी विकि शोध' अशी खिडकी बनवून ठेवता येईल का? ही खिडकी मराठी संकेतस्थळांना (व इतरही) जोडता येईल. त्यातून खास मराठी विकिचे शोध सहजतेने घेता येतील. यामुळे मराठी विकिकडे येणारे लोकही वाढतील आणि आपण सगळे करत असलेले काम जास्त लोकांना उपयोगी पडेल. हा हिंदीच्या कचाट्यातून सुटण्याचा एक मार्ग मला दिसतो आहे.
निनाद ०२:३२, १५ फेब्रुवारी २००९ (UTC)