नमस्कार,
दोन दिवसांपूर्वी मराठी विकिवर फिरतांना मला आढळले की मराठी नात्यांसदर्भातील केवळ आई हा लेख विकिवर आहे.
मराठी नाती इंग्रजीच्या तुलनेत अतीशय गुंतागुंतीची असल्यामुळे त्यावर मराठी विकिपीडियावर स्वतंत्र लेख असावेत.
मी खाली नात्यांची एक यादी बनविली आहे.
कृपया ती तपासावी. मला सर्व नात्यांबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, (या प्रकल्पानंतर ती होईलच.. :) ) त्यामुळे खाली चुका असणे शक्य आहे तसेच काही नाती टाकायची विसरलो असेन.
तसेच काही नात्यांना प्रदेशानुसार/जातीनुसार/बोलीभाषेनुसार अनेक नावे असू शकतात. ती नावेपण इथे टाकावी.
तसेच हे लेख विकिवर असावेत का फक्त विक्शनरीवर शब्दाची व्याख्या असावी याची चर्चापण करण्यात यावी.
याचा एक Family Tree स्वरूपातील साचा बनवीत आहे. त्याबाबतीतपण काही सूचना असतील तर कळवाव्या.
आपल्या सूचनांच्या प्रतिक्षेत.
क्षितिज पाडळकर ०५:००, २० डिसेंबर २००८ (UTC)

सामान्य नाती संपादन

  • आई
  • वडील
  • मुलगा
  • मुलगी
  • नातू - मुलाचा मुलगा
  • नात - मुलाची मुलगी

  • पती किंवा नवरा
  • पत्नी किंवा बायको

  • आजोबा - वडिलांचे वडील
  • आज्जी - वडिलांची आई, आईची आई
  • आजोबा किंवा नाना - आईचे वडील

  • बहीण
  • भाऊजी - बहिणीचा नवरा
    • भाचा - बहिणीचा मुलगा
    • भाची - बहिणीची मुलगी

  • भाऊ
  • वहिनी - भावाची बायको
    • पुतणा - भावाचा मुलगा
    • पुतणी - भावाची मुलगी

  • काका - वडिलांचे भाऊ
  • काकू - काकांची बायको
    • चुलत भाऊ - काकांचा मुलगा
    • चुलत बहीण - काकांची मुलगी

  • आत्या - वडिलांची बहीण
  • मामा - आत्याचा नवरा
    • आत्येबहीण - आत्याची मुलगी
    • आत्येभाऊ - आत्याचा मुलगा

  • मामा - आईचा भाऊ
  • मामी - मामाची बायको
    • मामे बहीण - मामाची मुलगी
    • मामे भाऊ - मामाचा मुलगा

  • मावशी - आईची बहीण
  • काका / मावसा - मावशीचा नवरा
    • मावस बहीण (?) - मावशीची मुलगी
    • मावस भाऊ (?) - मावशीचा मुलगा

  • सासू - पती/पत्नीची आई
  • सासरा - पती/पत्नीचे वडील
  • दीर - नवर्‍याचा भाऊ
  • नणंद (?) - नवर्‍याची बहीण
  • मेव्हणा - बायकोचा भाऊ
  • मेव्हणी - बायकोची बहीण
  • सून - मुलाची बायको
  • जावई - मुलीचा नवरा
  • नातसून - नातवाची बायको
  • नातजावई (?) - नातीचा नवरा
  • व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
  • व्याहीण (??) - सुनेची/जावयाची आई
  • साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
  • जाऊ -मोठ्या दिराची बायको
  • भाऊजाई- लहान दिराची बायको

साचा झलक संपादन

मराठी नाती (वडिलांकडील)
                     

 

 

                     
                      आजोबा आज्जी                      
                                                   
                                                   
 

 

 

           

 

 

           

 

 

 
  काकू काका             वडील आई             मामा आत्या  
                                                   
                                                   

 

   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   

 

चुलत बहीण     चुलत भाऊ   भाऊजी बहीण   मी   भाऊ वहिनी   आत्येबहीण     आत्येभाऊ
                                                   
                                                   
           

 

   

 

   

 

   

 

           
            भाचा     भाची     पुतणा     पुतणी            

चर्चा संपादन

कृपया आपल्या सूचना/मत/चर्चा इथे मांडा

नंदावा / आत्योबा ही नावे वापरली जातात आणी जास्त specific aahet


अतिशय स्तुत्य आणि नवीन कल्पना आहे. गुंतागुंत वाढवायची असेल तर 'सावत्र' नाती घालता येतील !

साचा चर्चा संपादन

कृपया साच्यासंदर्भातील आपल्या सूचना/मत/चर्चा इथे मांडा

  • हा साचा मी HTML Tables वापरून बनविला आहे.
  • मराठीत अनेक नाती असल्यामुळे ती सर्व एका पानावर (साच्यामध्ये) बसविणे अवघड आहे. त्यामुळे खालील विभाग करण्याचा माझा विचार आहे.
    • वडिलांकडील (काका-आत्या-आजोबा)
    • आईकडील (मामा-मावशी)
    • मुलाकडील (मुलं-सून-जावई-व्याही)
    • पती-पत्नीमधील (सासू-सासरे-मेव्हणा-दीर)
  • हा साचा IE, Firefox व Google Chrome वर बरोबर दिसत आहे. Netscape व इतर विचरकांवर बघितले नाही.
  • पण.....हा साचा बराच मोठा झाला आहे आणि जटिलपण :( त्यामुळे इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.
    • एक पर्याय म्हणजे, नात्यांचे चित्र बनविणे व ImageMap वापरून लेखांशी जोडणे....यामध्ये जागा कमी लागेल. तसेच हेच विभाग ठेवता येतील.

क्षितिज पाडळकर ०२:३८, २१ डिसेंबर २००८ (UTC)

http://en.wikipedia.org/wiki/File:Relatives_Chart.svg

हे उपयोगी पडेल.

सुभाष राऊत ०८:३७, २४ डिसेंबर २००८ (UTC)

धन्यवाद सुभाष,
याचा खूप उपयोग होईल, मला असेच काहीतरी बनवायचे आहे.
फक्त मराठी नाती खूप जास्त असल्यामुळे त्यांना कमीत कमी जागेत कसे बसवावे याचा विचार चालू आहे.
तसेच, एकदा नात्यांची यादी नक्की झाली की मग मी वरील चित्रासारखे चित्र बनवेल.
क्षितिज पाडळकर ०७:४८, २५ डिसेंबर २००८ (UTC)