हेमा मालिनी

भारतीय राजकारणी
(हेमामालिनी या पानावरून पुनर्निर्देशित)

हेमा मालिनी (१६ ऑक्टोबर, इ.स. १९४८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहे. १९६८ सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७० च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७२ सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

हेमा मालिनी

लोकसभा सदस्य
मथुरा साठी
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील जयंत चौधरी

जन्म १६ ऑक्टोबर, १९४८ (1948-10-16) (वय: ७६)
अम्मनकुडी, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती धर्मेंद्र
अपत्ये इशा देओल, आहना देओल
धर्म [हिंदू धर्म ]

१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. इ.स. २००० मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आली.

हेमा मालिनीचे चरित्रग्रंथ

संपादन
  • Hema Malini: Beyond the Dream Girl (इंग्रजी, लेखक : राम कमल मुखर्जी)
  • Hema Malini: An Authorised Biography (इंग्रजी, लेखिका : भावना सोमय्या)

बाह्य दुवे

संपादन