विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १५

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








मोबदल्याचे नवे झेंगट

संपादन
चावडी वर जागा शिल्लक न राहिल्याने Translating:Language_project येथे वाचावे ही नम्र विनंती.

Mahitgar ०८:४१, २७ जानेवारी २००८ (UTC)


सर्व विकिपीडिया सदस्य,

कळविण्यास आनंद होतो आहे की सदस्य:Mahitgar यांनी सांगितल्याप्रमाणे मी मोबदल्यासाठी claim दिला होता व त्याप्रमाणे मराठी विकिपीडियाला पहिला milestone गाठण्याबद्दल बक्षिस (मोबदला?) मंजूर झालेला आहे. कृपया Approved claim list येथे पहा.

आता मी दुसर्‍या माईलस्टोन साठी काम सुरू केलेले आहे. तरी इतरही सदस्यांनी या कामाला हातभार लावावा ही विनंती.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५७, ३१ जानेवारी २००८ (UTC)

वि.सू. आता मराठी विकिपीडियावरील सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या messagesचे भाषांतर पूर्ण झालेले आहे. तरी आपणांस एखाद्या messageमध्ये सुधारणा करावी वाटल्यास मला किंवा येथील प्रबंधकांशी संपर्क करावा ही विनंती. (कौस्तुभ)

Milestone 2 Dear Kaustubh Compliments to you ,The credit goes to you for this effort.Bye the way frankly I am translating any messages because simply I do not know where I can reffer which messages come at No. 2 level,If you know please do guide me.Saturday night and Sunday I will give more hours to this.

Usualy before putting in new terms I do lot of reasearch so may be I will be little slow in no.of messages. For shuddha lekhan check up we need to rope in more no of editors at the earliest because that is not my strong point. Mahitgar १४:१९, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

प्रिय विकिपीडियन मीत्रहो,

आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.

असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती

आपला नम्र Mahitgar १७:१४, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

only 344 translations are pending to acheiving level 2, can few more editors help us out there.Thanks and Regards Mahitgar १५:२४, १० फेब्रुवारी २००८ (UTC)
298 remaining

भाषांतर मॅरेथॉन

संपादन

मी थोड्याच वेळात मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासाठीय्या भाषांतर मॅरेथॉन उद्या रात्री पर्यंत करणार आहे.आमच्या सोबत या ठीय्या दौडीत अजून काही मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहभाग घेतला तर काम फत्ते लौकरात लौकर करता येईल.

वाट पहात आहे लौकर या !

Mahitgar १३:४१, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)

विकिमीत्रांनो १७६९ कोअर मेसेजेसची मजल गाठून आजची ठीय्या मॅरेथॉनला तात्पूरता विराम दिला आहे.अर्थात हि मजल गाठण्यात श्री.कौस्तूभ यांचेही मोठे सहकार्य लाभले,श्री. कौस्तूभना धन्यवाद.User:प्रणव कुलकर्णी‎ तसेच अभय नातूंनी पण थोडी साथ दिली तसेच येथी सर्व प्रचालकांचे प्रणाली संदेश भाषांतराचे कामही कामी आले ह्यामुळे सदस्यांना सर्व विकिपीडिया प्रणाली संदेश फक्त विकिपीडियातच नाही तर सर्व विकि सहप्रकल्पातही मराठीत दिसू शकतील तसेच कुणाला विकि सॉफ्टवेअर वापरून स्वत:चे संकेतस्थळ बनावायचे असेल तरी हा मराठी इंटरफेस वापरता येईल.अर्थात हा टप्पा गाठताना काही अडचणी जरूर होत्या त्या सदस्यांना जरूर जाणवणार आहेत ,पण असे म्हणतात गरज हि शोधाची जननी आहे.इतर सदस्यांना उत्तमोत्त्म शोध(उरलेल्या दोन टप्प्यांचा,आम्ही वापरलेल्या गहन संज्ञांचा आणि त्यातील घोडचूकांचा) घेण्याची संधी मीळो :) ही शुभेच्छा! Mahitgar १४:३७, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)

ट्रान्‍सलेटींग विकिच्या मुख्यपानाचे मराठीकरण पार पाडले आहे,तेथे ड्रॉपडाऊन मेन्यूत मराठी भाषा निवडावी. आता मराठी विकिपीडियावर मिळणारे मराठी वातावरण ट्रांसलेट विकिवर मिळाल्‍यामुळे संपादन करताना मस्त वाटत आहे.Mahitgar १५:२४, २५ फेब्रुवारी २००८ (UTC)

i know it is quite late to ask this, but why is our year has इ.स. 2008 prefix

what i feel by default it should have been assumed as it is इ.स. by using it all places it is messing a lot of stuff

we should be categorising years without the prefix and prefix only for years which is BC

even english wikipedia dont use AD by default. This should have gone a lot of discussion but can i know the exact reason why we are using the prefix

सुभाष राऊत २०:०८, २७ जानेवारी २००८ (UTC)

I think this policy was to distinguish the numbers from the years (e.g. 1000 and 1000 AD). I am not aware of another reason.

अभय नातू २२:२९, २७ जानेवारी २००८ (UTC)

p.s. This policy was in force long before I showed up here :-}

ok if we say it is to differentiate 1000 and 1000 AD then 1000 AD points to इ.स. १००० then where does 1000 point to? if we think इ.स.पू. १००० then where will 1000 BC point to. Initially i thought it should be reserved for marathi calendar year, but i cannot see any examples of the same. even though it is a big change but on long run it will be really difficult to change the same...
I hope to see comments from other members also, so that we come to know any new possibilities.

सुभाष राऊत ०५:४६, २८ जानेवारी २००८ (UTC)

then 1000 AD points to इ.स. १००० then where does 1000 point to?

What I meant is that the page १००० should have information about the number 1000 and इ.स. १००० should have information about the year 1000 AD. This scheme also allows us to have a वि.सं. १००० (विक्रम संवत), शि.रा.श. १००० (शिवराज्याभिषेक शक), शा.श. १००० (शालिवाहन शक) and any other calendar formats.

अभय नातू ०५:५२, २८ जानेवारी २००८ (UTC)

if that is case i feel the majority should win. how many articles do we have with numbers in the article name? wherever we deal with year it is difficult to get the इ.स. part. Also if we are going for year based calculation templates, it is difficult to create them.
सुभाष राऊत ०६:११, २८ जानेवारी २००८ (UTC)

मला आठवतंय पूर्वी झालेल्या चर्चेत सुद्धा हाच निष्कर्ष निघाला होता. एक आकडा म्हणून १००० ला नक्कीच महत्व आहे. त्यामुळे वर्षांचे नि:संदिग्धीकरण करण्यासाठी prefix आवश्यकच आहे. तरीसुद्धा एक शंका आहे की आकड्यांच्या पानात नक्की काय माहिती देता येईल. उदा. १००० ही पहिली चार आकडी संख्या आहे, वगैरे. कारण जर अशी पाने तयारच झाली नाहीत तर मात्र ही फार मोठी डोकेदुखी ठरू शकते. इतरही विकिपीडियांमध्ये संख्या पाने आढळत नाहीत (उदा. हिंदी) कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:०७, २८ जानेवारी २००८ (UTC)

इंग्लिश विकिपीडिया संख्यांच्या पानासाठी (number) हा प्रत्यय लावतो. तेथे १००० या संख्येबद्दलच्या लेखाचे शीर्षक en:1000 (number) असे आहे. तेथे प्रत्येक संख्येबद्दल पान नसले तरी असलेल्या पानांवर बरीच (रसभरीत) माहिती आहे.
अभय नातू ०६:१३, २८ जानेवारी २००८ (UTC)


कृपया या विषयावरील आपला कौल कौलपानावर नोंदवा.


इ.स. पुनर्निर्देशन

संपादन

सर्व विकिपीडिया सदस्य / प्रबंधक,

या विषयावर घेतलेल्या कौलाप्रमाणे चार पैकी तीन सदस्यांनी इ.स. च्या लेखांच्या शीर्षकात इ.स. असण्यास विरोध केला आहे. तर संकल्प यांनी नि:संदिग्धीकरणाचा पर्याय मान्य असल्याचे इथे नमूद केलेले आहे. यामुळे बहुमताने १००० (म्हणजेच इ.स. १०००) अशा नावाचे लेख तयार करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे. तरी याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या लेखांचे स्थानांतरण करण्याची आज्ञा मी हरकाम्या ला देत आहे. तरी इतरांचे अजून काही म्हणणे असल्यास चावडीवर मांडावे ही विनंती.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४९, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

i guess we are looking things differently. redirecting 1000 to e.s. 1000 is not what we are looking for. but the reverse way. and altogether get rid of e.s. 1000. wikipedians, correct me if this is correct.

सुभाष राऊत ०७:००, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

सुभाष, मला यातील तांत्रिकता लक्षात येत नाहीये. १००० --> इ.स. १००० व इ.स १००० --> १००० यामध्ये नक्की काय फरक आहे हे कृपया स्पष्ट करावे. जर इ.स. १००० हे वगळण्यात येणार असेल (जे की मला तरी वाटत नाही संयुक्तीक ठरावे) तर मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्थानांतरण (पुनर्निर्देशन नव्हे) करणे योग्य राहील. माझ्या मते कुठेही १००० असा दुवा दिला (लेखात अथवा साच्यात अथवा इतरत्र) तर तो इ.स. १००० ला पुनर्निर्देशित होणे अपेक्षित आहे.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:४७, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)
If productive and necessary one has to do, I do not mind decesion either way, My comcern remains we still do have very limited no of regular editors.For various resons I have seen All previous admins investing lot of time in these year related pages , so again some one investing time concerns me.

Mahitgar ०७:२९, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

If time investment is concerned current setting are more time consuming as per my point of view. For ex. when we are creating pages like Dinvishesh & date pages like February 26 it is taking more time to link [[इ.स. १९३८|१९३८]]. This is our concern. Also in sports related articles atleast 100 links are to be created which is confusing & time consuming.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:४७, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)
just to give example if someone is using year link 1000 it should lead to page 1000 and not e.s. 1000. thus correct way would be that all pages starting with e.s. should be redirected (स्थानांतर) to respective years. then later replace all links pointing to e.s. to respective years like e.s.1000 to 1000. when we are done with this we could think of removing redirecting e.s. pages.
i hope this clarifies.
abhay not sure why you are not commenting, you being the oldest member, could oppose/support/guide us.
सुभाष राऊत ०७:५६, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

Yes, now your point is clear. So I will reformat the comment. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१२, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

इ.स. पुनर्निर्देशन (पुढे चालू)

संपादन
Sorry to jump in at this late stage of discussion (was on an extended business/vacation trip with no access to the internet), but I believe it would be better to keep the original article at इ.स. १२३४ and have a redirect from १२३४-->इ.स. १२३४ if required. The article in question is about a year that is counted from an epoch, i.e., the supposed birth year of Jesus Christ. There are many ways of counting time/year and preferring A.D. over say शक संवत or विक्रम संवत or even शिवराज्याभिषेक संवत is not exactly logical. Even though A.D is accepted as the de facto standard, arguments can be made for any of the previosly mentioned systems.
Also, there are cases when a number page is necessary for special numbers, e.g. 1, 10, 100, 1000, ad nauseum, as well as mathematically significant whole numbers. Articles with year information for such numbers will not make sense. There also needs to be a scheme that will differentiate between number articles and redirects to the year articles. One option is to use १ (संख्या), १२१ (संख्या) and mention on the year page that हा लेख इ.स.चे वर्ष १२१ बद्दल आहे. १२१ संख्येबद्दलची माहिती १२१ (संख्या) येथे आहे. or some such.
Regardless of the tack we take in the above, it is imperative that we create disambiguation pages for each of these articles, e.g. १० (निःसंदिग्धीकरण), १२१ (निःसंदिग्धीकरण), listing the year page, the number page and any other article alluding to this number.
अभय नातू १५:२४, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)


I think the disambiguition of वि.सं., शा.श., शि.श. is not required as we will not be putting any additional information in the same. If required we can redirect the same to corresponding AD year. i.e. शके १९३० can be redirected to २००८.

Regarding disambiguition pages, we have to create disambiguition pages only for the articles which will be created (like Numbers 1, 10, 100, etc.) and not for all articles. So this may not be a major issue.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२४, २८ फेब्रुवारी २००८ (UTC)

परत एकदा

संपादन

दिनविशेष पानावर परत एकच दिनविशेष दिसत आहे. आजच्या पानात मी बदल करुन तीन दिनविशेष टाकले तरी एकच दिसतो. माझ्या पानावर main page purge करायची लिंक दिली होती. त्यानुसार शनिवार २६ जानेवारीला केलेले बदल लगेच दिसले. आज मात्र परिस्थिती जैसे थे आहे. ctrl-f5 करुन पाहिले!:) सौरभदा ०४:३२, २८ जानेवारी २००८ (UTC)

मला तुमचे बदल दिसत आहेत. इतकेच नाही तर त्या बदलात मी एक छोटा बदल केला होता तोही दिसत आहे.
अजून एक उपाय करून पहा -
माझ्या पसंती वर टिचकी द्या.
इतर वर टिचकी द्या
पाने सयी मध्ये ठेवू नका हा चौकोन check करा.
जतन करा वर टिचकी द्या.
आशा आहे त्याने फरक पडेल.
अभय नातू ०४:३५, २८ जानेवारी २००८ (UTC)
धन्यवाद अभय, आता मला बदल दिसत आहेत. आशा करतो ते पुढेही दिसत राहतील.तात्काळ दखल घेतल्याबद्दल आभार. सौरभदा ०५:०८, २८ जानेवारी २००८ (UTC)
technically this is happening because in wikipedia if output of a template A is dependent on output of template B, and if we make changes to template B, output of B changes but it wont change the anything in Template A as it is still using cache version.
solution to this is
1. recompile or just resave template A, but in our case we dont have edit rights to mainpage thus go for second option.
2. use following link to purge main page [{{fullurl:मुखपृष्ठ|action=purge}}] [१] p.s. you save this link to your space to reuse it

सुभाष राऊत ०५:५४, २८ जानेवारी २००८ (UTC)


हा शुद्ध वेडेपणा

संपादन

ई.स. बदलून आपण मोठ्या कष्टाने इ.स. केले. आता हे बदलून नुसता आकडा लिहून त्याचा अर्थ इ.स. समजणे ही प्रगती नसून परागती आहे. इ.स. लिहिण्याने काय नुकसान होते आहे? नुसता आकडा लिहायचा आणि त्याचा अर्थ इसवी सन घ्यायचा हे अनाकलनीय आहे. असे करणे म्हणजे मला शुद्ध वेडेपणा वाटतो. असे काही करण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. दुसर्‍या भाषेतील एखाद्या विकिपीडियावर असे असले म्हणजे मराठीत तसे असलेच पाहिजे असे नाही. इंग्रजीमध्ये शाळा, संस्था, चर्च, चौक यांची नावे लिहिताना स्कूल, इन्स्टिट्यूशन, चर्च, स्क्वेअर हे शब्द गाळता येतात, मराठी तसे करणे अपवादात्मक असते. त्यामुळे इ.स. गाळणे हे मराठीच्या संस्कृती-प्रकृतीशी विसंगत आहे.-J- J १२:२२, २९ फेब्रुवारी २००८ (UTC)

आजच्या दिनविशेषात ऑलिव्हर क्रॉमवेलच्या दिनविशेषात काही घोळ झालाय का? त्यात असे म्हंटले आहे की ऑलिव्हर क्रॉमवेलचा शिरच्छेद करण्यात आला. मात्र तो दोन वर्षांपूर्वीच मरण पावला होता. म्हणजे मेल्यावर त्याचा परत एकदा शिरच्छेद करण्यात आला काय? मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अजून एक दिनविशेष वाढवला आहे तरी त्याबद्द्ल दुसरा एखादा कमी करावा लागेल? सौरभदा ०६:३०, ३० जानेवारी २००८ (UTC) ता.क. इंग्लिश विकीवर खात्री केल्यावर काही घोळ नसल्याचे कळले तरी मला वाटतं थोडी वाक्यरचना नीट करायला हवी. पहिल्यांदा वाचताना नीट अर्थबोध होत नाही.सौरभदा ०६:३२, ३० जानेवारी २००८ (UTC)

खरोखर घोळ वाटत आहे. मला वाटते की जास्तीच्या दिनविशेषांसाठी इंग्रजी विकीप्रमाणे सबपेजेस तयार करावीत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:१४, ३० जानेवारी २००८ (UTC)

Yes, Cromwell was beheaded 2 years *after* he was dead...that's what makes the fact more interesting. As for links to dinavishesH from front-page, the entire dinavishesH is included on the front page. English wikipedia does the same thing.

Creating sub-pages is a good idea when the dinavishesH gets longer than a few lines. Considering that most days of the year, dinavishesH has not even one line (except for the template itself,) I'd not worry about it much. If you feel a particular day's dinavishesH (for example - Wikipedia:दिनविशेष/फेब्रुवारी १) will misalign the front page, create a sub-page for that day (Wikipedia:दिनविशेष/फेब्रुवारी १/अधिक माहिती, then trim the dinavishesH to a few most important lines and give a link to the अधिक माहिती sub-page at the bottom of the main dinavishesH page.

Abhay Natu २२:०७, ३१ जानेवारी २००८ (UTC)

वृत्त्तपत्रांमधील माहितीबाबत

संपादन

कॉपीराईट कायदा लागू होतो का? म्हणजे काही वेळा पेपरांत लेखकाचे नाव नसलेले छोटे छोटे माहितीपर लेख असतात. अशी माहिती थेट कॉपी पेस्ट करून विकिपीडियावरील लेखांत चांगली भर घालता येईल. तरी याबाबत काय धोरण आहे? अशावेळेस त्या वर्तमानपत्राचा देखील दुवा द्यावा लागेल काय? मला तरी असं वाटतं की अशी माहिती सर्वांना वापरण्यास मुभा असते.व कोणी त्याबाबत आक्षेप घेणार नाही. सौरभदा ०३:३९, ३१ जानेवारी २००८ (UTC)

Marathi Wikipedia takes copyright very seriously. We do not publish any copyrighted material without explicit permission from them. Mainly because Wikipedia's licensing states that anything published or contributed here is public domain, unless a more restrictive notice accompanies such works. Copy-pasting material published somewhere else is explicitlly prohibited. Newspaper material is copyrighted and is generally owned by the publisher (or in some cases, contributors.) However, you can transcribe the information you read somewhere else in your own words. You should always cite the source of such information.
There are also other ways copyrighted material can be published on the wikipedia. One way is with restricted license. For example, Shri Sumitr Madgulkar has given us permission to publish Geet Ramayan here but it is not under GPL. The permission is restricted to this site only, which means that publishing Geet Ramayan here is legal, but copying the text from here without explicit permission from the original owner of copyright (Mr. Madgulkar) is prohibited.
Abhay Natu २२:१४, ३१ जानेवारी २००८ (UTC)

मासिक सदर

संपादन

मासिक सदर अजुन बदलेले नाही. प्रबंधक मंडळी इथे लक्ष द्या.

सुभाष राऊत ०८:०९, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

भुबनेश्वर की भुवनेश्वर?

संपादन

भुबनेश्वर हा ओरिसात केला जाणारा उच्चार आहे. व चा उच्चार तेथे ब असा केला जातो.मला वाटते मराठीत भुवनेश्वरच असायला हवे!सौरभदा १०:५२, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

I do feel the same way. anyone differ?

सुभाष राऊत २०:५९, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

Languages like Punjabi,Bengali,Oriya,Asamesse accent seems to convert pronounciations व चा उच्चार तेथे ब as rightly said by User सौरभदा .But originations of these words are very much Sankrit and since in Marathi language accent and pronounciation has no change in this respect It is better we retain भुवनेश्वर with a note in intro para in bracket we mention their local pronounciation.

Mahitgar ११:१९, २ फेब्रुवारी २००८ (UTC)

भुवनेश्वरचा उच्चार ओरिसाच्या खेड्यांपाड्यांतून कदाचित आणखीही वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल. मुंबईचे नाव लोक म्हंबई, म्हमई. मुम्बै, बंबई अशा अनेक प्रकारे उच्चारतात. म्हणून आपण 'विकि'च्या पानावर हे सर्व उच्चार द्यायला पाहिजेत? लिखाणाद्वारे आपण आपले विचार आणि माहिती दुसर्‍याला पोचवीत असतो, आपल्या मनातले उच्चार नाही. तेव्हा भुवनेश्वर जसे लिहिले जाते, तसेच ते इथे आले पाहिजे, केवळ काही स्थानिक माणसे भुबनेशर म्हणतात म्हणून तसे येऊ नये. आता बंगालीत व आणि ब हे दोन उच्चार असले तरी दोघांचे लिखाण सारखेच असते, तिथे आपण काय करणार आहोत? मराठीत 'च'छ,ज,झ,फ' चे दोनदोन उच्चार आहेत तिथे? त्यामुळे 'विकि'वर फक्त शुद्ध लेखीस्वरूपातील शब्दच आला पाहिजे असे माझे ठाम मत आहे.---J--J १२:४०, २९ फेब्रुवारी २००८ (UTC)

हरकाम्या साठी BOT Flag

संपादन

I'd like to ask for permission to run the bot हरकाम्या here, and to get it flagged as bot.

  • Bot Operator: User:Kaustubh
  • Purpose: शुद्धलेखन, व इतर कामे
  • Software: pywikipediabot तसेच AWB
  • Details: It mostly runs manually-assisted, occasionally in automatic mode.


Thank you! --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:२०, ५ फेब्रुवारी २००८ (UTC)

Bot status granted.
अभय नातू ००:०७, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)
Thank you very much. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:२४, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)

तारीख देताना

संपादन

कृपया लेखांमध्ये तारीख द्यायची असल्यास महिना आधी व नंतर दिनांक द्यावा.जसे की फेब्रुवारी ५ . ५ फेब्रुवारी असे दिल्याने अजून वेगळी पाने तयार होत आहेत. खरेतर ५ फेब्रुवारी हेच योग्य वाटते पण आता सर्वत्र बदल करणे शक्य नसावे!सौरभदा १३:४४, ५ फेब्रुवारी २००८ (UTC)

५ फेब्रुवारी, १ जानेवारी, इ. पाने ही फेब्रुवारी ५, जानेवारी १, इ. कडे पुनर्दिर्देशने आहेत.
अभय नातू ००:०४, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ

संपादन

कधी दिनविशेषांची संख्या वाढल्यावर मासिक सदराखाली बरीच जागा मोकळी राहत आहे तरी पुढे वाचा च्या अगोदर मासिक सदर या लेखातील काही अजून माहिती मुखपृष्ठावर घ्यावी. तसेच आ.हे.मा.आ.का. या सदरात एका एका वाक्याची वाढ करण्याऐवजी काही ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सेट बदलण्यात यावा असे वाटते.सौरभदा ०८:२५, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)

सध्या आ.मा.आ.का? मध्ये घालण्यासाठी पुरेसा मजकूर उपलब्ध नाही. म्हणून एक एक ओळ घालीत आहोत. जर आपणांस काही माहिती वाढवायची असेल तर इथे वाढवावी.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:२२, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ/धूळपाटी

संपादन

i have created template {{मुखपृष्ठ/आजचे छायाचित्र}} to show the picture of the day as seen on commons.

this can be used to add Picture of the day below featured article

for eg please check the मुखपृष्ठ/धूळपाटी

सुभाष राऊत ११:०७, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

छान! आवडले!सौरभदा ११:१५, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ

संपादन

New main page arrangment is very interesting and I guess we can make some more changes in front page, to make it more dynamic and attactive. आजचे छायाचित्र concept is also good

Maihudon ११:२०, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)

One suggestion - The आजचे छायाचित्र can be placed in full width below FA, Dinvishesh & आ.मा.आ.का. without disturbing the arrangement of these three. I have made slight changes, if not required please revert back. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:२५, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)


मला वाटते १ मार्चला मुखपृष्ठ बदलावे. इतर सदस्यांचे काय म्हणणे आहे? कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:०२, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)

Another design

संपादन

मुखपृष्ठ/धूळपाटी/१ retains current layout except to add today's picture, move sister-projects box up and compact the निवेदन box. Apart from dynamic content, redesign should also focus on maximizing screen real-estate.

More suggestions are welcome.

अभय नातू ०१:०८, ४ मार्च २००८ (UTC)

Returning the sysop rights

संपादन

Dear All,

I am returning my administrator rights on this site.
Since long time, I could not spend any time for Marathi Wikipedia, despite holding the administrator rights.
I hope somebody who is more active, will be a better choice than me.
I will continue to contribute as a regular user.
With regards,

Harshalhayat १४:५५, ९ फेब्रुवारी २००८ (UTC)

Harshal,

Hope all is well with you. I'd have hoped you continue to contribute to Marathi Wikipedia. However, this is a free enterprise and does not pay the bills.

If you must return the rights, you have to make the request on meta. As a bureaucrat, I can make new sys ops, but can not take away the rights.

Regards,

अभय नातू १८:२१, ९ फेब्रुवारी २००८ (UTC)

नवीन लेख

संपादन

नवीन सदस्यांना नवीन लेख बनविणे सोयीचे व्हावे म्हणून मी नवीन लेख बनवा हे पान तयार केलेले आहे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५४, १६ फेब्रुवारी २००८ (UTC).

वि.सू. प्रबंधक मंडळी, या पानाचा डावीकडील साधनपेटी मध्ये दुवा देता येईल का? (कौस्तुभ)

तारखेचे दुवे

संपादन

मला वाटते की तारखांचे दुवे तयार करावेत. उदा. ०१/०१/२००८ --> १ जानेवारी २००८ या प्रमाणे. कृपया इतर सदस्यांनी आपली मते मांडावीत.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:१०, १६ फेब्रुवारी २००८ (UTC)

प्रत्येक विशिष्ट दिवसांचे पान तयार करण्यासाठी त्या दिवसांबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. उदा. ०१/०१/२००८ या दिवशी अनेक घटना घडलेल्या असतील पण ०२/०१/२००८ रोजी महत्त्वाचे असे काहीच नसेल. अशाने असंख्य रिकामी पाने तयार होतील. याकरिताच विकिपीडियावर प्रत्येक दिवसाचे असे एक पान आहे. आत्तापर्यंत त्या तारखेला घडलेल्या घटनांची वर्षनिहाय यादी तेथे असते. तसेच प्रत्येक वर्षाचे एक पान असते ज्यावर त्या वर्षातील घटना इत्यादिची नोंद असते. तरी असे प्रत्येक दिवसाचे पान करणे मला (आत्तातरी) सयुक्तिक वाटत नाही.

अभय नातू ०३:४३, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)

या संदर्भात इतर सदस्यांना विनंती आहे (Specially Subhash & Don) to review {{cite web}} & {{cite journal}} templates. These templates are generating links like this. If possible please modify the same to [[०१/०१]]/[[२००८]]. Then we can think of redirecting 01/01 to 1 January & so on... कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१८, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)
i need to check this in more detail or may be rework on it. for now use "accessdate = जानेवारी २२|accessyear=२००८"
सुभाष राऊत ०९:४२, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)
  • Relegated to ( This term is related to sports leagues where one team will be promoted or relegated depending on the performance)

Maihudon १०:५२, १८ फेब्रुवारी २००८ (UTC)

सोपवणे, टाकणे, हवाली करणे, ताब्यात देणे, स्वाधीन करणे  ?
  • माझ्या माहितीप्रमाणे promotion - पदोन्नती व relegation - पदावनती असे आहे. मला वाटते संकल्प या बाबतीत अधिक मार्गदर्शन करू शकेल. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:५०, २० फेब्रुवारी २००८ (UTC)
  • Franchises - Related to Indian Premier league e.g. IPL Mumbai can it be called team.
Definition by Google Define
Definition by en wiktionary
Vaze kosh returned result null
Sanskrit Shbdaksh Return for team :दल,गण; Returns केलिक for word sporting
ShabdabaMdh synonim for Team is 'Sangh'
My own take is भिडू or जोडीदार or जोडीलाorगट orटोळी orपथकorगोविंदा ,कंपू

Mahitgar ११:४७, २१ फेब्रुवारी २००८ (UTC)

संपादन

साचा:मराठी शब्द सुचवा

संपादन

कृपया साचा तज्ज्ञां कडून साचा:मराठी शब्द सुचवा तपासून व योग्य सुधारणा करून हवा आहे.खास करून या साच्याने पानाचे आपोआप वर्गीकरण करून त्या वर्गीकरणात चपखल मराठी शब्द हवे असलेल्या लेखांची नोद पहाण्याची व्यवस्था व्हावी असा मनोदय होता.पण मला हे वर्गीकरणाचे काम व्यवस्थीत जमत असल्याचे दिसत नाही.

धन्यवाद

Mahitgar १३:०९, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)

सदस्य:सुभाष राऊत यांनी साच्यात योग्य ते बदल केलेले आहेत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:२१, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)

मुखपृष्ठ

संपादन

मार्च महिन्यात मुखपृष्ठ बदलण्याची इच्छा आहे.

त्या साठी मुखपृष्ठ (सुभाष राऊत/temp/1) तयार केले आहे.

जर tables दिसत नसतील तर कृपया CTRL+F5 press करावे. या पानाबद्दल आपली मत्ते इथे मांडावी.

सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

  पाठिंबा- बदल चांगला आहे. मुखपृष्ठ निर्वाह कसे काम करतो हे नवीन सदस्यांना अधीक व्यवस्थीत समजावे म्हणून निर्वाह पान अजून व्यवस्थीत अपडेट करावयास हवे आहे,त्याकरिता निर्वाह पानास पूर्ण सूरक्षीत ठेवण्याची आवश्यकता आहे काय या बद्दल विचार व्हावा. - Mahitgar
not sure about the exact reason behind making it secure, for the time being prepare the text then we would replace the main article. सुभाष राऊत ०९:१२, २५ फेब्रुवारी २००८ (UTC)
  पाठिंबा- मस्तच.. फक्त आजचे छायाचित्रच्या खाली थोडीशी मोकळी जागा दिसते आहे, तिथे काहीतरी केले पाहिजे असे वाटते.. - Kaustubh
that column is having variable length because of image size, din vishesh size, i guess we can still manage with it. सुभाष राऊत ०९:१०, २५ फेब्रुवारी २००८ (UTC)
if we increase the dinvishesh that it should be compensate. सुभाष राऊत ०३:४५, २६ फेब्रुवारी २००८ (UTC)
  पाठिंबा- very Interesting.. - maihudon


Request bot flag for Alexbot

संपादन

I request the bot flag for Alexbot:

Operator:zh:User:Alexsh
Programming Language:Pywikipedia SVN
Functions:Interwiki(+autonomous), double redirect fix, featured article interwiki link.
Other languages:All statistics in here

Thank you--Alexsh १९:२७, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)

Bot status granted.

अभय नातू ०४:२६, २५ फेब्रुवारी २००८ (UTC)

काय हे असेच करायचे असते ?

संपादन

मी नवीन नामविश्व दालन आणि दालन चर्चा करिता १३०४६ येथे विनंतीनोंदवली पण अजून नेमके कळाले नाही की मी ते बरोबर पद्धतीने केले आहे?

त्या शिवाय Wikipedia ( विकिपीडिया ) , Help (साहाय्य),Help_Talk (साहाय्य_चर्चा),MediaWiki(मिडियाविकि),MediaWiki_Talk मिडियाविकि_चर्चा नामविश्वांचे मराठीकरण पूर्ण झाले नाही त्याची विनंती करावयाची का? आणि हो तर कशा स्वरूपात?

Mahitgar ०८:३५, २५ फेब्रुवारी २००८ (UTC)

पटियाला की पतियाला

संपादन

पटियाला की पतियाला?


सुभाष राऊत ०९:५१, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

माझ्या मते पटियाळा बरोबर आहे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:०४, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)
In Marathi newspapers, I've read 'पतियाळा' more often. Also, Hindustani classical music-related critiques use words 'पतियाळा घराणे' to denote 'Patiala Gharana'(Patiala Tradition) of Hindustani music.
--संकल्प द्रविड (चर्चा) १०:१५, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

With all due respect, I do not put a lot of credence into what current Marathi newspapers use. These are sources that routinely use bastardized versions of original spellings, with no regard to original pronunciations, not to mention clobbered up phrases from foreign languages that make no sense in the context to which they refer.

The best source for pronunciation is a native speaker of language spoken in areas of concern, in this case, Punjabi.

अभय नातू १५:०८, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)

पतियाळाच बरोबर

संपादन

स्थानिक लोकांच्या उच्चाराला महत्त्व देण्याचे काही कारण नाही. खेड्यापाड्यारील लोक विविध उच्चार करत असतात. जे मराठीत वर्षानुवर्षे रूढ आहे ते प्रमाण लिखाण. त्यामुळे पतियाळा, पतियाळा घराणे हे शुद्ध लिखाण! पटियाला, पतियाला अशा प्रकारे लिहिण्याचा विचारसुद्धा मनात आणू नये.--J--J ०६:३९, ६ मार्च २००८ (UTC)

पतियाळा असो किंवा पटियाला, पण स्थानिक लोकांच्या उच्चाराला महत्त्व देण्याचे काही कारण नाही हे आपले विधान आश्चर्यकारक आहे!!! मला वाटते याबद्दल आपली आधीही चर्चा झाली होती की मुंबई बरोबर कि बॉम्बे? स्थानिक लोकांच्या उच्चाराला महत्त्व येथे द्यावे कि नाही? एखाद्या (स्थळाच्या) नावाची मोडतोड करण्याचा परवाना आपल्याला (येथे आपल्याला म्हणजे आपण सगळे, आदरार्थी बहुवचन नव्हे) कोणी दिला? काही अपवाद (पॅरिस, पारी - आभार:संकल्प, इ.)वगळले तर एतद्देशीय नावांत बदल करणे उचित नाही हे माझे मत अजूनही ठाम आहे.
अभय नातू ०६:४५, ६ मार्च २००८ (UTC)
ता.क. एखादी चूक रूढ झाली तरीही चूकच असते.
अभय, तुमच्या स्थानिक उच्चाराला महत्त्व देण्याच्या ठाम मताबद्दल सादर सहानुभूती बाळगूनही एक दुरुस्ती सुचवाविशी वाटते. उच्चारांबद्दल/लेखनाबद्दल विचार करताना मराठीत बर्‍याच प्रमाणात रूढ असलेल्या लेखनाला दुर्लक्षू नये(जसे पॅरिस). तुम्ही हिंदुस्तानी संगीताबद्दल मराठीत झालेले लिखाण, समीक्षा पाहिल्यात तर त्यात एकोणिसाव्या-विसाव्या शतकात मराठीत रूढ असलेल्या ’पतियाळा’ या लेखनाचा वापर दिसतो. त्याअर्थी या शब्दाचा वापर पूर्वीपासून मराठीत होतोय आणि यापुढेही होत राहील. वाटल्यास मुख्य शीर्षक काय असावे याबाबत तज्ज्ञ मंडळींकडून खुलासा करवून घेता येईल. परंतु, त्याबाबत काहीही निर्णय झाला तरीही किमान पुनर्निर्देशित शीर्षकांमध्येतरी ’पतियाळा’ हे लेखन वापरले जावे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०७:१७, ६ मार्च २००८ (UTC)

There is no reason to not use redirections to articles with alternate spellings. In fact, it is encouraged. Also, I have no objections against using a word if it has become part of a phrase - such as पतियाळा घराणे, but care must be taken so the tail does not wag the dog.

त्याअर्थी या शब्दाचा वापर पूर्वीपासून मराठीत होतोय आणि यापुढेही होत राहील In this context, you are correct, the usage will/shold be पतियाळा घराणे, but that does not mean that name of place is पतियाळा. I do not know if it is either of the two, but to perpetuate an error (if this is an error) is sheer foolhardiness.

अभय नातू १५:५१, ६ मार्च २००८ (UTC)

(पंजाबी:ਪਟਿਆਲਾ) असे लिहीले जाते. पंजाबीत मराठी प्रमाणेच ट,ळ,आणि ण आढळतात, पण जसे त्यांनी पंजाबीत लिहीले आहे त्यावरून पंजाबी प्रमाणे पटिआला बरोबर असावे असे वाटते, पतिआला-पतियाळा हा उच्चार हिंदी लोकांनी त्यातील ट चे त केले असावे आणि पतियाला मराठीत आल्यावर त्यातील ल चा ळ झाला असावा. एनी वे, मराठी विकिपीडियात पटिआला पान पंजाबी उच्चारास अनुसरून पतियाळाकडे पुर्ननिर्देशीत करावे. मात्र हिंदी उच्चारणातील सध्याचे पान शक्यतर वगळावे (अप्रस्तुत असल्यामुळे, हिंदीचा विरोध म्हणून नव्हे)

Mahitgar ०८:३६, ९ मार्च २००८ (UTC)

ग्रामनामांचे किंवा देशनामांचे स्थानिक उच्चार

संपादन

स्थानिक भाषेत जे उच्चार असतात ते मराठीत लिहिता येतीलच असे नाही. जर्मनीला बहुधा डॉइच्लान्ट किंवा असेच काहीतरी म्हणतात. जर्मन भाषेत ऑ चा उच्चार इंग्रजी किंवा मराठीतल्या ऑ सारखा नाही. त्यामुळे कितीही प्रयत्‍न केला तरी मराठी लिपीत जर्मन आपल्या देशनामाचा जसा उच्चार करतात तसा लिहिता येणे शक्य नाही. फार काय कालिकतला मल्याळी भाषेत जे काही म्हणतात ते मराठीत लिहिता येणार नाही. कारण त्यात येणारे अक्षर देवनागरी लिपीत नाही. अशी अनेक ग्रामनामे केरळात आहेत. जपानला आपण कधीही निप्पॉन म्हणणार नाही. इंग्रजीतला टी चा उच्चार मराठीतल्या ट सारखा नाही; त्याचा उच्चार ट आणि त यांच्या दरम्यानचा आहे. त्यामुळे इंग्लंडमधील कुठलेही टी अक्षर असलेल्या गावाचे नाव मराठीत लिहिता येणार नाही. परत, टी शब्दाच्या सुरुवातीला आली तर तिचा उच्चार ठ होतो. उदाहरणार्थ ठॉक्‌ म्हणजे मराठी टॉक्‌. शिवाय प्रत्येक इंग्रजी व्यंजनान्त नाव इंग्ल्न्डमध्ये जसे उच्चारले जाते तसे मराठीत लिहायचे म्हटले तर प्रत्येक शब्दाच्या अखेरच्या व्यंजनाचा पाय मोडावा लागेल. एकूण काय, स्थानिक उच्चाराला काडीइतकीही किंमत देण्याचे कारण नाही, नामाचे मराठीच्या संस्कृती-प्रकृती-प्रवृत्तीशी साजसे रूपांतर करून तेच नाव मराठीत लिहायला हवे.-J १९:०१, ११ मार्च २००८ (UTC) .


First off, I agree that not all given names can be transliterated into Marathi/devnagari. In such cases, an approximation must be adopted. However, that does not give you or anyone the license to say "स्थानिक उच्चाराला काडीइतकीही किंमत देण्याचे कारण नाही". That's sheer contempt for anything that's foreign. If you stick to this opinion of yours, you have absolutely no right to demand that Mumbai be called Mumbai. Bhave must accept being called 'bhev' and Malavika as 'malaavikaa'.
As for 'halant' words, there's a rule in Marathi that addresses this and it must be followed.
"नामाचे मराठीच्या संस्कृती-प्रकृती-प्रवृत्तीशी साजसे रूपांतर करून तेच नाव मराठीत लिहायला हवे"
Whose marathi संस्कृती, which प्रकृती and what प्रवृत्ती? Is there uniformity in defining this? If you argue the 'official' Marathi, it has no imperative to do what you suggst.
"उदाहरणार्थ ठॉक्‌ म्हणजे मराठी टॉक्‌"
With all due respect to you sir, thanks for the joke. I fail to grasp the relevance here though.
अभय नातू १९:२३, ११ मार्च २००८ (UTC)

मुंबईची स्थानिक माणसे?

संपादन

मुंबईची स्थानिक माणसे कोण? आगरी? कोळी? ती तर मुंबईला म्हमई म्हणतात. आज मुंबईची बहुसंख्य प्रजा बिगर-मराठी आहे. त्यातले उत्तर भारतीय बंबई म्हणतात. मुंबईत एक मुंबै नावाची बॅंन्क आहे. म्हणजे तिचे सभासद असलेल्या जाती मुंबईला मुंबै म्हणतात. आज पश्चिमी प्रसारमाध्यमातून मुंबईचा उच्चार सररास मम्बाय असा ऐकू येतो. पोर्तुगीजांनी जेव्हा ब्रिटिशांना सात बेटे दिली तेव्हा बॉम्बेची सात बेटे दिली असा उल्लेख आहे. ब्रिटिशांनी बॉम्बे वसवली, मुंबई नाही. पूर्वीही आणि आजही पुण्याची तरुण मुले मुंबईला बॉम्बे म्हणतात. हां! बॉम्बेतल्या एका बेटावर मुंबाई नावाच्या देवीचे देऊळ होते. तिच्या दर्शनाला जाणारी माणसे मम्बाईला जातो म्हणत, त्यावरून देऊळ असलेल्या त्या प्रदेशाला लोक मुंबई म्हणू लागले, ह्यात तथ्य असू शकेल. पण, मुळात पोर्तुगीजांनी दिली आणि ब्रिटिशांनी वाढवली ती बॉम्बे! ता. क. क्वीन्स इंग्रजीत शब्दाच्या सुरुवातीला आलेल्या ट चा उच्चार ठ होतो, महाराष्ट्रीय इंग्रजीत ट. --J १७:५०, १२ मार्च २००८ (UTC)

गुजराती विकिपीडियाला मदत

संपादन

गुजराती विकी पानांवर साच्यांची कमतरता दिसून येत आहे. उदा. महर्षी यांनी केलेले योगदान पाहा... http://gu.wikipedia.org/wiki/Special:Contributions/Maharshi675

येथील एखाद्या तज्ञाने थोडी मदत केली तर ही माहिती एखाद्या साच्यात बसवता येईल.

शुद्धलेखन

संपादन

१. वरच्या मथळ्यात प्रति-क्री-या छापले आहे , ते प्रतिक्रिया करावे.

२. शुद्धलेखन म्हणजे व्याकरणाच्या व भाषेच्या प्रमाण नियमांनुसार केलेले लेखन. अर्थात, बोलीभाषेला प्रमाण आणि लिखित व्याकरण नसू शकेल, त्यामुळे बोलीभाषेत लिहिताना 'जसे ऐकू येते तसे लिखाण हा अर्थ घ्यावा लागेल.

३. 'शुद्ध लेखन' असे तोडून लिहिले तर त्याचा अर्थ 'फक्त लेखन आणि इतर काही नाही' असा होईल. उदा. तो शुद्ध भिक्षुक किंवा शुद्ध वैदिक आहे.(त्याला व्याकरण, मीमांसा इ. काही अवगत नाही.). तू शुद्ध गाढव आहेस. ते शुद्ध लेखनावर जगतात, वगैरे. त्यामुळे आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थाने 'शुद्ध लेखन' असे शब्द तोडून लिहिता येणार नाहीत.

३. लेखन शुद्ध आहे/असावे.- इथे आपल्याला हवा तो अर्थ मिळतो.

४. अशुद्धलेखन असा शब्द मराठीत नसावा. तो अशुद्धलेखन करतो, किंवा अशुद्धलेखनावर टीका करतो.-ह्या वाक्यांना अर्थ नाही. त्याचे लेखन अशुद्ध आहे, किंवा तो तिच्या शुद्धलेखनावर/अशुद्ध लेखनावर/लेखनाच्या शुद्धाशुद्धतेवर टीका करतो.-हे बरोबर. त्यामुळे अशुद्धलेखन असे जोडून न लिहिता 'अशुद्ध लेखन' असे तोडून लिहिणे योग्य होईल.--J--J ०६:२७, ६ मार्च २००८ (UTC)

Please corrects the sports names at सदस्य:Maihudon/temp.

ALl these are olympic sports.

Maihudon ०८:४६, ७ मार्च २००८ (UTC)

MHD, मी काही बदल केलेत; तपासून बघा. तसेच, ती नावे ’ऑलिंपिक खेळ (..)’ अशी कंसात का लिहिली आहेत ते कळले नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०९:२२, ७ मार्च २००८ (UTC)
ती नावे ’ऑलिंपिक खेळ (..)’ अशी कंसात का लिहिली आहेत ते कळले नाही
No specific intention, I think we can creat pages like ऑलिंपिक खेळ .. instead of ऑलिंपिक खेळ (..), which seems more
appropriate at the moment.
१०:१०, ७ मार्च २००८ (UTC)
  • 2008 Australian Grand Prix - २००८ ऑस्ट्रेलियन ग्रँड प्री

Maihudon ०५:०३, १७ मार्च २००८ (UTC)

Wikipedia to विकिपीडिया

संपादन
At bugzilla I have requested for change of Namespace Wikipedia be changed to marathi विकिपीडिया . Presently we do have quite a good no of aricles wrongly written as विकिपीडिया: and these are coming in Main Namespace as of now.

Is any body aware what happens to the articles whch are written in main namespace as of now with prefix विकिपीडिया: do we need to transfer these articles temporalily under different heading or those will remain safe during the time change takes place.

Thanks and regards

Mahitgar १०:५८, ९ मार्च २००८ (UTC)

मुखपृष्ठ व विकित अनेक चांगले बदल झाले आहेत. सर्व विकिकरांना धन्यवाद व अभिनंदन.महाराष्ट्र एक्सप्रेस १५:५६, १४ मार्च २००८ (UTC)


Wikipedia to विकिपीडिया लवकर होण्यासाठी सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी बगझिला इथे भेट देऊन तसेच नवीन सदस्य नोंदणी करून या बग साठी आपले मत द्यावे.

Edit Wars Vs Constructive editing

संपादन
Right now there is good opportunity for those, who like edit wars, at an english wikipedia article en: Religious violence in India
By the way I began and is working on a constructive article en:Religious harmony in India to give justice to positive side of Indian Life , wish and request all to join me in bringing up this english article .Thanks and Regards Mahitgar १७:२२, १४ मार्च २००८ (UTC)