कायोवा काउंटी, कॉलोराडो

कायोवा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या पूर्व भागात असलेली ही काउंटी कॅन्ससच्या सीमेशी लागून आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९८[१] ईड्स या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

ईड्समधील कायोवा काउंटी संयुक्त न्यायालय

इतिहास संपादन

या प्रदेशात राहणाऱ्या कायोवा जमातीच्या लोकांचे नाव काउंटीला देण्यात आले आहे.[३]

२९ नोव्हेंबर, १८६४ रोजी येथील सँड क्रीक या ओढ्याच्या किनाऱ्यावर वस्ती करून राहिलेल्या मूळच्या रहिवाशांवर कर्नल जॉन चिविंग्टनच्या नेतृत्वाखालील युरोपीय लोकांच्या जमावाने रात्रीच्या अंधारात हल्ला केला व शेकडो लोकांची हत्या केली.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 176.