ग्रँड काउंटी, कॉलोराडो

ग्रँड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १४,८४३ होती.[१] हॉट सल्फर स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२]

हॉट सल्फर स्प्रिंग्जमधील काउंटी न्यायालय

इतिहास

संपादन

ग्रँड काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी समिट काउंटीमधून करण्यात आली. या काउंटीचे नाव या प्रदेशातील ग्रँड लेक या सरोवराचे तसेच कॉलोराडो नदीच्या ग्रँड रिव्हर या जुन्या नावावरून देण्यात आले आहे.[३]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. January 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 141.