क्लियर क्रीक काउंटी, कॉलोराडो

क्लियर क्रीक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडो मधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९,०८८ होती.[] जॉर्जटाउन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[] ही काउंटी रॉकी माउंटनमध्ये असून डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.

जॉर्जटाउनमधील अग्निशमन केन्द्र

इतिहास

संपादन

क्लियर क्रीक काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. गिलपिन काउंटी आणि क्लियर क्रीक काउंटी या दोनच कॉलोराडोच्या काउंट्यांच्या सीमा बदलेल्या नाहीत. या काउंटीला यातून वाहणाऱ्या क्लियर क्रीक नदीचे नाव देण्यात आलेले आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र १८६१-१८६७ दरम्यान आयडाहो स्प्रिंग्ज येथे होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 8, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 25, 2014 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)