यूरे काउंटी, कॉलोराडो
कॉलोराडोमधील काउंटी
(युरे काउंटी, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
यूरे काउंटी /ˈjʊəreɪ/ ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसारी येथील लोकसंख्या ४,८७४ होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर यूरे येथे आहे. [२] यूरे काउंटी पूर्णपणे पर्वतीय असून या काउंटीला अमेरिकेचे स्वित्झर्लंड असेही म्हणले जाते.
इतिहास
संपादनयूरे काउंटीची रचना १८ जानेवारी, १८७७ रोजी रोजी सान हुआन काउंटीमधून करण्यात आली. कॉलोराडोला राज्याचा दर्जा मिळाल्यावर तयार झालेली ही पहिली काउंटी होती. यूरे काउंटीला येथील चीफ यूरे या युट जमातीतील सरदाराचे नाव देण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी, १८८१ रोजी युरे काउंटीमधून डोलोरेस काउंटीची स्थापना झाली. तर २७ फेब्रुवारी, १८८३ रोजी यातून सान मिगेल काउंटीची रचना करण्यात आले.
चतुःसीमा
संपादन- उत्तर - मॉन्ट्रोज काउंटी
- ईशान्य - गुनिसन काउंटी
- आग्नेय - हिन्सडेल काउंटी
- दक्षिण - सान हुआन काउंटी
- नैऋत्य - सान मिगेल काउंटी
प्रमुख मार्ग
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 5, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.