पिटकिन काउंटी, कॉलोराडो

कॉलोराडोमधील काउंटी

पिटकिन काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,५३८ होती. [] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर ॲस्पेन आहे. [] या काउंटीला नाव कॉलोराडोचे गव्हर्नर फ्रेडरिक वॉकर पिटकिनचे नाव देण्यात आले आहे. पिटकिन काउंटीचे दरडोई उत्पन्न अमेरिकेत सातव्या क्रमांकावर आहे. []

पिटकिन काउंटी न्यायालय

चतुःसीमा

संपादन

प्रमुख महामार्ग

संपादन

आयुर्मान

संपादन

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमधील अहवालानुसार पिटकिन काउंटीमधील रहिवाशांचे २०१४ मधील आयुर्मान 86.52 वर्षे होते, जे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे होतो. [] अमेरिकेतील प्रत्येक काउंटीपेक्षा पिटकिन काउंटीमधील पुरुष आणि स्त्रिया दोघेही जास्त काळ जगतात. जन्माच्या वेळी पुरुषांचे आयुर्मान ८५.२ वर्षे तर महिलांचे आयुर्मान ८८.२ वर्षे होते. [] समीट आणि ईगल काउंटी या दोन पिटकिन काउंटीला लागून असलेल्या काउंट्या आयुर्मानात देशात अनुक्रमे प्रथम आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

जून २०२१ च्या, यूएस न्यूझ अँड वर्ल्ड रिपोर्टच्या अहवालानुसार पिटकिन काउंटीचे आयुर्मान देशा चौथ्या क्रमांकाचे ९३.४ वर्षे इतके आहे. []

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "QuickFacts: Colorado, United States". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 5 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Household Income by County in the United States". Statistical Atlas. 10 February 2020 रोजी पाहिले.
  4. ^ Dwyer-Lindgren, Laura (8 May 2017). "Inequalities in Life Expectancy Among US Counties, 1980 to 2014". JAMA Internal Medicine. 177 (7): 1003–1011. doi:10.1001/jamainternmed.2017.0918. PMC 5543324. PMID 28492829.
  5. ^ "County Profile: Pitkin County Colorado," http://www.healthdata.org/sites/default/files/files/county_profiles/US/2015/County_Report_Pitkin_County_Colorado.pdf, accessed 2 Aug 2017
  6. ^ Cirruzzo, Chelsea (2021-06-30). "The 25 Counties With the Longest Life Expectancy". U.S. News & World Report. 2021-07-01 रोजी पाहिले.