कॉलोराडोचे गव्हर्नर

कॉलोराडोचे गव्हर्नर हे अमेरिकेतील कॉलोराडो राज्याचे मुख्याधिकारी असतात. या पदान्वयी ते राज्यातील सशस्त्र सेनेचे सरसेनापती असतात. राज्याच्या विधानसभेने पारित केलेले कायदे मान्य करणे किंवा नाकारणे तसेच मान्य केलेले कायद्यांच पालन करविणे ही गव्हर्नरची बांधिलकी असते.

कॉलोराडो अमेरिकेचे राज्य होण्यापूर्वी कॉलोराडो प्रदेशाचे सात गव्हर्नर होउन गेले. यांची नेमणूक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे. कॉलोराडो राज्याची स्थापना झाल्यावर २०१७ सालापर्यंत ३६ गव्हर्नर झाले आहेत.

जॉन हिकेनलूपर हे २०१०-२०१८ कालावधीत गव्हर्नर होते. २०१९नंतर जॅरेड पोलीस हे गव्हर्नर आहेत.