डिसेंबर ८
दिनांक
(८ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनविसावे शतक
संपादन- १९१४ - पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलावर हल्ला चढविला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-हॉंगकॉंगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटिश वसाहत असलेल्या हॉंग कॉंगवर आक्रमण केले.
- १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो कॉंसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
- १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.
- १९६९ - ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले. ९३ ठार.
- १९७६ - ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.
- १९८० - मार्क चॅपमनने न्यू यॉर्क मध्ये डकोटा बिल्डींगच्या बाहेर जॉन लेननचा खून केला.
- १९९१ - रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
- १९९८ - ताद्जेना कत्तल - अल्जीरियात अतिरेक्यांनी ८१ लोकांना ठार केले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ६५ - होरेस, रोमन कवि.
- १५४२ - मेरी स्टुअर्ट, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडची राणी.
- १७०८ - फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८६१ - चार्ल्स लेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - अर्नी टोशॅक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१७ - इयान जॉन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - जॉर्ज फुलरटन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - प्रकाशसिंग बादल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री
- १९३६ - पीटर पार्फिट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - बस्टर फॅरर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - मेल्ट व्हान स्कूर, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ८९९ - कॉरिंथियाचा आर्नुल्फ.
- १६२६ - जॉन डेव्हीस, ब्रिटिश कवी.
- १६३२ - फेलिपे व्हान लान्सबर्ग, फ्लेमिश अंतराळतज्ञ.
- १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.
- १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - डिसेंबर १० - (डिसेंबर महिना)