इ.स. १९८१
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(१९८१ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९७८ - १९७९ - १९८० - १९८१ - १९८२ - १९८३ - १९८४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
- फेब्रुवारी १० - लास व्हेगास येथे हॉटेलला आग. ८ ठार, १९८ जखमी.
- फेब्रुवारी १४ - आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील नाइट क्लबला लागलेल्या आगीत ४८ ठार.
- एप्रिल ११ - दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलीस जखमी.
- एप्रिल १२ - स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.
- एप्रिल २४ - आय.बी.एम.ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
- एप्रिल २७ - झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.
- मे १० - फ्रांस्वा मित्तरां फ्रांसचा राष्ट्राध्यक्षपदी.
- मे २५ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.
- जून ६ - भारताच्या बिहार राज्यात सहार्सा शहराजवळ मध्ये बागमती नदीवरील पुलावर रेल्वे गाडी घसरली. अधिकृत २६८ ठार, ३०० गायब. अनधिकृत आकडा - १,००० ठार.
- जून ७ - इस्रायेलने इराकची ओसिराक परमाणु भट्टी नष्ट केली.
- जुलै १७ - अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.
- जुलै ३१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू .
- ऑगस्ट ३ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतूक नियंत्रकांनी संप पुकारला.
- डिसेंबर १३ - पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
- डिसेंबर १ - युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
जन्म
संपादन- मे ४ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- जून ७ - ऍना कुर्निकोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
- जुलै ७ - महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ८ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.
- सप्टेंबर २६ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- सप्टेंबर २७ - लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - ब्रेन्डन मॅककुलम, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ९ - न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित.
- मार्च ६ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मार्च २७ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
- मे ११ - बॉब मार्ली, जमैकाचा संगीतकार.
- मे ३० - झिया उर रहमान, बांग्लादेशी राष्ट्रपती.
- डिसेंबर ४ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.