शताब्दी एक्सप्रेस

(स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

शताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाड्या भारतीय रेल्वेने चालवलेल्या लांब पल्ल्याच्या जलदगती प्रवासी गाड्यांचा एक प्रकार आहे. या गाड्यांच्या सेवेने भारतातील महानगरे, व्यवसाय, तीर्थ क्षेत्र व प्रवासन या दृष्टीने महत्त्वाच्या शहरांशी जोडलेली आहेत. या गाड्या उगम स्थानावरून निघून दिवसा अखेरीस परत उगम स्थानावर येतात.

भोपाळच्या भोपाळ हबीबगंज रेल्वे स्थानकात, नवी दिल्लीला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस ट्रेन मधे प्रवासी चढत असताना.

या गाड्या भारतीय रेल्वेवरील सर्वाधिक वेगवान गाड्यांतील काही असून यांना मानाचे स्थान मिळते. बहुतेक शताब्दी एक्सप्रेस गाड्या ताशी १००-१३० किमी वेगाने धावतात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस काही टप्प्यांत ताशी १५० किमीचा वेग गाठते.

इतिहास

संपादन
 
शताब्दी एक्सप्रेसच्या वातानुकूलित कुर्सीयानातील आतील दृष्य

इ.स. १९९८ साली, पंडित जवाहरलाल नेहरू (भारताचे पहिले पंत प्रधान) याच्यां शंभराव्या जयंतीप्रीत्यर्थ शताब्दी एक्सप्रेस सेवा तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. पहिली गाडी नवी दिल्ली ते ग्वाल्हेर धावली. पुढे तिचा मार्ग झांसी जंशन आणि नंतर भोपाळ जंक्शन पर्यंत वाढवण्यात आला. आता तिचे नाव भोपाळ शताब्दी एक्सप्रेस असे ठेवण्यात आले आहे.

रेल्वे ट्रेन

संपादन

भोपाळ शताब्दी एक्सप्रेस भारतातील सगळ्यात वेगवान गाडी आहे. ही गाडी सरासरी ताशी ९३ किमी वेगाने दिल्लीभोपाळ दरम्यान धावते. आग्रानवी दिल्ली मधील काही टप्प्यांमध्ये ही गाडी ताशी १५० किमीचा वेग गाठते. रोजच्या प्रवासात शताब्दी एक्सप्रेसना इतर गाड्यांवर अग्रक्रम देण्यात येतो. कोणत्याही स्थानकावर शताब्दी एक्सप्रेसला सगळ्यात चांगल्या फलाटावर थांबवण्यात येते.

तत्सम गाड्या

संपादन

शताब्दी एक्सप्रेसची लोकप्रियता पाहून भारतीय रेल्वेने त्यासारख्या इतर गाड्या सुरू केल्या आहे.

स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस ही शताब्दी एक्सप्रेसपेक्षा अधिक सेवायुक्त आणि जास्त आरामदायक आहे.

जन शताब्दी एक्सप्रेस मध्ये फक्त दुसऱ्या वर्गाचे डबे असतात व वातानूकुलित नसतात.

गरीब रथ प्रकारच्या गाड्या शताब्दी एक्सप्रेस सारख्या असतात पण त्यातील डब्यात जास्त प्रवासी प्रवास करतात. वातानूकिलत असलेल्या या गाड्यांचे भाडे शताब्दी एक्सप्रेसपेक्षा कमी असते.

 
चंडीगढ स्थानकातून निघण्याच्या तयारीत असलेली शताब्दी एक्सप्रेस

शताब्दी एक्सप्रेस दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये कमीतकमी थांबे घेउन जलद सेवा पुरवतात. या पूर्णतः वातानुकुलित असतात व आरक्षणाशिवाय यातून प्रवास करता येत नाही. काही शताब्दी एक्सप्रेसना गाडी निघायच्या दोन तास आधी काही आरक्षित तिकिटे विकली जातात. सकाळी निघून रात्री परत येणाऱ्या या गाड्यांत बर्थ/स्लीपर नसतात तर वातानुकुलित खुर्च्या असलेले डबेच असतात. शिवाय एकतरी डबा प्रथमवर्गीय खुर्च्या असलेला असतो. या डब्यातील खुर्च्यांमध्ये अधिक जागा असते आणि खाणेपिणे इतर डब्यांपेक्षा वेगळे असते

या गाड्यांच्या तिकिटातच चहा/कॉफी, नाश्ता, पाण्याची बाटली, फळांचा रस, दोन्ही वेळची जेवणे तसेच वरचे खाणे समाविष्ट असते. याशिवाय काही गाड्यांत सिनेमा/दूरचित्रवाणी उपग्रहीय प्रक्षेपणाद्वारे बघता येते. मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा सर्वप्रथम देण्यात आली होती.

१९८८मध्ये सुरू झालेल्या या गाड्या भारतीय रेल्वेच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. त्यावेळी या गाडयांवर "गरीब देशात श्रीमंती मिरवणाऱ्या" गाड्या अशी टीका करण्यात आली होती. या गाड्या भारतीय रेल्वेच्या मानाने श्रीमंती व अतिजलद असल्या तरीही जागतिक मानकांप्रमाणे त्या कमीच पडतात.साचा:Fact

गंतव्य स्थळे

संपादन

शताब्दी एक्सप्रेस

संपादन
 
नवी दिल्लीपासून लखनौकडे निघालेली शताब्दी एक्सप्रेस

मार्ग

संपादन

सध्या एकूण २४ शताब्दी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.

गाडी नाव गाडी क्रमांक मार्ग अंतर
राणी कमलापती – नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस १२००१ राणी कमलापती (हबीबगंज)नवी दिल्ली ७०५ किमी
१२००२ नवी दिल्लीराणी कमलापती (हबीबगंज)
लखनऊ जंक्शन – नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस १२००३ लखनौ जंक्शननवी दिल्ली ५१२ किमी
१२००४ नवी दिल्ली — लखनौ जंक्शन
नवी दिल्ली – कालका शताब्दी एक्सप्रेस १२००५ नवी दिल्लीकालका ३०३ किमी
१२००६ कालका — नवी दिल्ली
चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस १२००७ चेन्नई सेंट्रलम्हैसूर ५०० किमी
१२००८ म्हैसूर — चेन्नई सेंट्रल
मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस १२००९ मुंबई सेंट्रलअहमदाबाद ४९१ किमी
१२०१० अहमदाबाद — मुंबई सेंट्रल
नवी दिल्ली कालका शताब्दी एक्सप्रेस १२०११ नवी दिल्लीकालका ३०३ किमी
१२०१२ कालका — नवी दिल्ली
नवी दिल्ली अमृतसर शताब्दी एक्सप्रेस १२०१३ नवी दिल्लीअमृतसर ४४८ किमी
१२०१४ अमृतसर — नवी दिल्ली
नवी दिल्ली अजमेर शताब्दी एक्सप्रेस १२०१५ नवी दिल्लीअजमेर ४४८ किमी
१२०१६ अजमेर — नवी दिल्ली
नवी दिल्ली देहरादून शताब्दी एक्सप्रेस १२०१७ नवी दिल्लीदेहरादून ३१५ किमी
१२०१८ देहरादून — नवी दिल्ली
हावडा रांची शताब्दी एक्सप्रेस १२०१९ हावडारांची ४२६ किमी
१२०२० रांची — हावडा
पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस १२०२५ पुणेसिकंदराबाद ५९७ किमी
१२०२६ सिकंदराबाद — पुणे
चेन्नई बंगळूर शताब्दी एक्सप्रेस १२०२७ चेन्नई सेंट्रलबंगळूर ३६२ किमी
१२०२८ बंगळूर — चेन्नई सेंट्रल
नवी दिल्ली अमृतसर स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस १२०२९ नवी दिल्लीअमृतसर ४४८ किमी
१२०३० अमृतसर — नवी दिल्ली
नवी दिल्ली अमृतसर शताब्दी एक्सप्रेस १२०३१ नवी दिल्लीअमृतसर ४४८ किमी
१२०३२ अमृतसर — नवी दिल्ली
नवी दिल्ली कानपूर शताब्दी एक्सप्रेस १२०३३ कानपूरनवी दिल्ली ४३७ किमी
१२०३४ नवी दिल्ली — कानपूर
जयपूर आग्रा शताब्दी एक्सप्रेस १२०३५ जयपूरआग्रा किल्ला २४१ किमी
१२०३६ आग्रा किल्ला — जयपूर
नवी दिल्ली लुधियाना शताब्दी एक्सप्रेस १२०३७ नवी दिल्लीलुधियाना ३२९ किमी
१२०३८ लुधियाना — नवी दिल्ली
काठगोदाम दिल्ली आनंद विहार शताब्दी एक्सप्रेस १२०३९ काठगोदामदिल्ली आनंद विहार २७१ किमी
१२०४० आनंद विहार — काठगोदाम
हावडा न्यू जलपैगुडी शताब्दी एक्सप्रेस १२०४१ हावडान्यू जलपैगुडी ५६१ किमी
१२०४२ न्यू जलपैगुडी — हावडा
नवी दिल्ली मोगा शताब्दी एक्सप्रेस १२०४३ नवी दिल्लीमोगा ३९८ किमी
१२०४४ मोगा — नवी दिल्ली
नवी दिल्ली चंदीगढ शताब्दी एक्सप्रेस १२०४५ नवी दिल्लीचंदीगढ ३२९ किमी
१२०४६ चंदीगढ — नवी दिल्ली
नवी दिल्ली बठिंडा शताब्दी एक्सप्रेस १२०४७ नवी दिल्लीबठिंडा २९९ किमी
१२०४८ बठिंडा — नवी दिल्ली
चेन्नई कोइंबतूर शताब्दी एक्सप्रेस १२२४३ चेन्नई सेंट्रलकोइंबतूर ४९७ किमी
१२२४४ कोइंबतूर — चेन्नई सेंट्रल
हावडा पुरी शताब्दी एक्सप्रेस १२२७७ हावडापुरी ५०२ किमी
१२२७८ पुरी — हावडा

जन शताब्दी एक्सप्रेस

संपादन
  1. भोपाळ-जबलपूर
  2. बंगळूर-हुबळी
  3. चेन्नाई-विजयवाडा
  4. मुंबई सी.एस.टी-औरंगाबाद
  5. नवी दिल्ली- उना
  6. नवी दिल्ली-देहरादून
  7. मुंबई सी.एस.टी-मडगांव
  8. हरिद्वार-अमृतसर
  9. तिरुवनंतपुरम-एर्नाकुलम
  10. हावरा-भुबनेश्वर
  11. नवी दिल्ली-कालका
  12. गुवाहाटी-जोरहाट
  13. लखनौ-नवी दिल्ली
  14. भोपाळ-नवी दिल्ली
  15. भोपाळ-जबलपूर
  16. हावरा-पाटणा
  17. हावरा-बारबील, टाटानगर मार्गी

भविष्य

संपादन
 
प्रथम वर्गाच्या वातानुकुलित डब्यातील आतले दृष्य

भारतात विमानी सेवेचे जाळे व सुविधा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात सुधारले आहेत. यामुळे शताब्दी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस सारख्या गाड्यांचे प्रवासी विमानी सेवेकडे आकृष्ट होण्याची शक्यता आहे. भारतात रेल्वेप्रवासासाठी भारतीय रेल्वे सोडून इतर पर्याय नसल्याने रेल्वेतील सेवा/सुविधा सुधारण्याकडे अधिक लक्ष पुरवले जात नाही. यामुळेही प्रवासी रेल्वेप्रवास सोडून विमानाने जाणे पसंत करतील.[]

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2008-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-21 रोजी पाहिले.