टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक
(टाटानगर या पानावरून पुनर्निर्देशित)
टाटानगर जंक्शन हे झारखंड राज्याच्या जमशेदपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले टाटानगर हावडाखालोखाल दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक आहे. टाटानगर हे नाव प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांच्या आदरार्थ देण्यात आले आहे.
टाटानगर भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | जमशेदपूर, झारखंड |
गुणक | 22°46′07″N 86°12′06″E / 22.76861°N 86.20167°E |
मार्ग |
हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग आसनसोल-टाटानगर-खरगपूर मार्ग |
फलाट | ५ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९१० |
विद्युतीकरण | होय |
संकेत | TATA |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व रेल्वे |
स्थान | |
|
गाड्या
संपादनकोलकात्याहून महाराष्ट्राकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात.
- हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस
- हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस
- हावडा-बडबिल जन शताब्दी एक्सप्रेस
- नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
- हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस
- हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस
- टाटानगर-जम्मू तावी मुरी एक्सप्रेस