हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. कोलकाता व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,९६८ किमी लांबीचा मार्ग पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. खरगपूर, जमशेदपूर, रुरकेला, रायपूर, नागपूर, जळगाव इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग महाराष्ट्राच्या खानदेश व विदर्भ भौगोलिक प्रदेशांना उर्वरित भागासोबत जोडणारा मोठा दुवा आहे.
प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.
हावडा व मुंबई दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.